Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » दूधगंगा पतसंस्था गैरव्यवहार: ठेवीदारांची सहनिबंधकाकडे प्रदीप कुटेंचा फेर-ऑडिट अर्ज फेटाळण्याची व ठेवी परत करण्याची मागणी
आर्थिक

दूधगंगा पतसंस्था गैरव्यवहार: ठेवीदारांची सहनिबंधकाकडे प्रदीप कुटेंचा फेर-ऑडिट अर्ज फेटाळण्याची व ठेवी परत करण्याची मागणी

मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटे यांचा मुलगा प्रदीप कुटे हे संस्थेचे फेर-ऑडिट करण्याची मागणी करून चौकशीच्या कामात अडथळे निर्माण करत असल्याचा आरोप ठेवीदारांनी केला आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar12/07/2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्तसेवा 

संगमनेर, प्रतिनिधी: 

संगमनेर येथील दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदार संघर्ष समितीने नाशिक विभागाचे विभागीय सहनिबंधक (सहकारी संस्था) नाशिक यांच्याकडे धाव घेतली आहे. प्रदीप भाऊसाहेब कुटे यांनी दाखल केलेला फेर-ऑडिट अर्ज (रिव्हिजन अर्ज ९७/२०२४) त्वरित फेटाळून लावण्यात यावा आणि ठेवीदारांच्या अडकलेल्या ठेवी तात्काळ परत करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. मुंबई उच्च न्यायालयातील रिट याचिका क्रमांक १२६०४/२०२४ च्या अनुषंगाने हे निवेदन देण्यात आले आहे.

८१ कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप आणि ठेवीदारांचे हाल

ठेवीदारांनी दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये तब्बल ८१ कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आरोप केला आहे. संस्थेचे चेअरमन, व्यवस्थापक आणि इतर २१ आरोपी या गैरव्यवहारात सामील आहे. गोरगरीब शेतकरी, शेतमजूर, टपरीधारक आणि छोटे व्यावसायिक अशा अनेक सर्वसामान्य लोकांनी आपल्या कष्टाची कमाई मुलांचे शिक्षण, लग्न, आजारपण आणि दैनंदिन गरजांसाठी भविष्याची तरतूद म्हणून या पतसंस्थेत जमा केली होती.

ठेवीदारांनी अनेकदा प्रयत्न करूनही त्यांना त्यांचे पैसे परत मिळालेले नाहीत, यामुळे त्यांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. या त्रासातून आतापर्यंत १० ठेवीदारांनी आत्महत्या केल्याचा तर, काही ठेवीदारांचा उपचारासाठी पैसे उपलब्ध न झाल्याने अपुऱ्या उपचारामुळे मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप ठेवीदार संघर्ष समितीने केला आहे.

मुख्य आरोपींच्या मुलाचा फेर-ऑडिट अर्ज

मुख्य आरोपी भाऊसाहेब दामोधर कुटे हे ३२ वर्षांपासून संस्थेचे संस्थापक चेअरमन होते. त्यांचेच पुत्र प्रदीप भाऊसाहेब कुटे यांनी फेर-ऑडिटसाठी अर्ज केला आहे. ठेवीदारांच्या मते, प्रदीप कुटे हे ठेवीदार नसून, या गैरव्यवहारातील एक आरोपी आहेत. अर्जात नमूद गैरव्यवहार केलेला निधी पद्धतशीरपणे हस्तांतरित करण्यात आला असून, प्रदीप कुटे हे त्याचे मुख्य लाभार्थी आहेत. संगमनेर तालुक्यातील वडझरी येथे प्रदीप कुटे यांनी खरेदी केलेली शेतजमीन हे त्याचेच उदाहरण म्हणून दाखवण्यात आले आहे. व्यवस्थापक भाऊसाहेब विठ्ठल गुंजाळ यांच्या खात्यातून त्यांच्या पत्नी वर्षा भाऊसाहेब गुंजाळ यांच्या खात्यात, तेथून चेअरमन भाऊसाहेब कुटे यांच्या पत्नी शकुंतला भाऊसाहेब कुटे यांच्या नावावर, आणि शकुंतला कुटे यांच्या खात्यातून वडझरी गावातील शेतीच्या मालक गोडगे यांच्या खात्यात निधी वर्ग करून ती शेतजमीन मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटे यांचा मुलगा प्रदीप कुटे यांच्या नावावर करण्यात आल्याचे ठेवीदारांनी नमूद केले आहे. वडील भाऊसाहेब कुटे यांच्याप्रमाणेच मुलगा प्रदीप कुटे हे देखील या ८१ कोटी रुपयांच्या अपहारास आणि बेहिशोबी मालमत्ता जमा करण्यास जबाबदार असल्याचे ठेवीदारांचे म्हणणे आहे.

तपास थांबवण्याचा प्रयत्न आणि प्रशासकीय आदेशाचा भंग

जिल्हा विशेष लेखापरीक्षक आर. एफ. निकम यांनी २०१६ ते २०२१ या कालावधीचे ऑडिट केले आहे, ज्यात ८१ कोटी रुपयांचा अपहार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. असे असतानाही, मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटे यांचा मुलगा प्रदीप कुटे हे संस्थेचे फेर-ऑडिट करण्याची मागणी करून चौकशीच्या कामात अडथळे निर्माण करत असल्याचा आरोप ठेवीदारांनी केला आहे. याशिवाय, सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, पुणे यांनी २० मार्च २०२४ रोजी आरोपीचा नव्याने लेखापरीक्षण करण्याचा अर्ज अमान्य करण्याचा आदेश पारित केला आहे.

आत्मदहनाचा इशारा

या गंभीर परिस्थितीमुळे, ठेवीदारांनी विभागीय सहनिबंधकांना कुटे यांचा फेर-ऑडिट अर्ज अमान्य करण्याची विनंती केली आहे. जर फेर-ऑडिट अर्ज मंजूर करण्यात आला, तर पतसंस्थेचे सर्व ठेवीदार कार्यालयासमोर आत्मदहन आणि आमरण उपोषण करतील. याची सर्वस्वी जबाबदारी कार्यालयावर राहील असेही त्यांनी म्हटले असल्याची माहिती ठेवीदार संघटनेचे मोहन लांडगे यांनी दिली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 2,126
आत्मदहन इशारा दूध गंगा पतसंस्था निवेदन
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांनी वेधले ऊर्जा राज्यमंत्र्यांचे लक्ष; मेंढवन उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी

10/10/2026

दुष्काळग्रस्तांकडून सक्तीची वीज बिल वसुली थांबवा; अन्यथा आंदोलन — शिवसेना ठाकरे शहर प्रमुख अमित चव्हाण

08/10/2026

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे एस.टी. पास शुल्क पूर्णपणे माफ करा; आमदार अमोल खताळ यांची परिवहन मंत्र्यांकडे मागणी

06/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

By Annant Ppangarkar16/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिला गर्भवती केल्याच्या अत्यंत गंभीर आरोपाखाली गेली…

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026

घारगाव बहुचर्चित खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! मुख्य आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय… न्यायालयीन युक्तिवादात काय घडले वाचा सविस्तर

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.