Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

राजहंस मिल्क पार्लर चोरी प्रकरण: संगमनेर पोलिसांकडून अवघ्या काही तासांत दोन चोरट्यांना बेड्या

04/09/2026

अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचा दणका; २० लाखांचा वाळू तस्करांचा मुद्देमाल जप्त

04/09/2026

आज शुक्रवार, ०४ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

04/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » नदीपात्रात वाहून गेलेल्या विजय कुटेचा मृतदेह चौथ्या दिवशी सापडला; शहरावर शोककळा
श्रद्धांजली

नदीपात्रात वाहून गेलेल्या विजय कुटेचा मृतदेह चौथ्या दिवशी सापडला; शहरावर शोककळा

विजय कुटे हे सिद्धकला हॉस्पिटलमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करत होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar29/08/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – 

गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला प्रवरा नदीत वाहून गेलेल्या विजय संभाजी कुटे (वय ४२, रा. रंगार गल्ली) यांचा मृतदेह आज, शुक्रवारी सकाळी तब्बल चौथ्या दिवशी संगमनेर तालुक्यातील खराडी गावाजवळ नदीपात्रात आढळून आला. या घटनेने रंगार गल्ली आणि चव्हाणपुरा परिसरात शोककळा पसरली आहे.

गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला, मंगळवारी रात्री ९ ते १० च्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली होती. विजय कुटे हे नेहमीप्रमाणे सिद्धकला हॉस्पिटलमध्ये सुरक्षारक्षक म्हणून कामावर जात असताना, संगमनेर खुर्दकडे जाणाऱ्या प्रवरा नदीच्या छोट्या पुलावरून नदीत फुले टाकत होते. याच वेळी त्यांचा तोल जाऊन ते नदीच्या प्रवाहात वाहून गेले.

कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला, मात्र ते सापडले नाहीत. त्यानंतर प्रशासनाने आणि स्थानिक नागरिकांनी त्यांचा शोध घेण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले. ड्रोनद्वारेही शोध मोहीम राबवण्यात आली होती. नदीला पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने शोध घेण्यात अडथळे येत होते, यामुळे तीन दिवसांपासून त्यांची कोणतीही माहिती मिळत नव्हती.

अखेर आज सकाळी साडेअकराच्या सुमारास नदीपात्रात एका शेताजवळ एका व्यक्तीचा मृतदेह स्थानिक नागरिकांना आढळला. त्यांनी तात्काळ प्रशासनाला माहिती दिली. रेस्क्यू टीम आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर रुग्णवाहिकेद्वारे तो घुलेवाडी येथील शासकीय कुटीर रुग्णालयात पुढील कारवाईसाठी पाठवण्यात आला. तिथे मृत व्यक्तीची ओळख पटली.

विजय कुटे हे सिद्धकला हॉस्पिटलमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करत होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. हालाखीच्या परिस्थितीतून गेलेल्या त्यांच्या कुटुंबावर या दुर्दैवी घटनेने मोठा आघात झाला आहे. संगमनेर शहर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,322
पाण्यात बुडून मृत्यू प्रवरा नदी विजय कुटे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन; माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले…

04/08/2026

धार्मिक कार्यानंतर नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू

10/06/2026

खाणीतील पाण्यात बुडून दोन सख्या भावांचा अंत; संगमनेर तालुक्यातील तिगाववर शोककळा

23/05/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

राजहंस मिल्क पार्लर चोरी प्रकरण: संगमनेर पोलिसांकडून अवघ्या काही तासांत दोन चोरट्यांना बेड्या

By Annant Ppangarkar04/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: संगमनेर शहराजवळील कोल्हार-घोटी रस्त्यावरील समनापूर फ्लॉवर मार्केट चौफुली येथील…

अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचा दणका; २० लाखांचा वाळू तस्करांचा मुद्देमाल जप्त

04/09/2026

आज शुक्रवार, ०४ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

04/09/2026

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.