Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

दुष्काळाची पाहणी करण्यासाठी उद्या केंद्रीय पथक अहिल्यानगर जिल्ह्यात; शेती व पाणी परिस्थितीचा घेणार आढावा

08/10/2026

एक सशक्त आणि अष्टपैलू अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला; संगमनेरमधून या नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

08/10/2026

ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

08/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » एक सशक्त आणि अष्टपैलू अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला; संगमनेरमधून या नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली
श्रद्धांजली

एक सशक्त आणि अष्टपैलू अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला; संगमनेरमधून या नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे, काँग्रेस नेत्या जयश्री थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी वाहिली श्रद्धांजली
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar08/10/2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-
ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री नाना पाटेकर यांचे गुरुवारी पहाटे गोव्यात निधन झाले. यांच्या निधनानंतर सर्वत्र शोककळा पसरली. या पार्श्वभूमीवर नानांना संगमनेर मधून राजकीय नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
राज्याचे माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी नानांच्या निधनाबद्दल दुःख दुःख व्यक्त केले असून ते म्हणाले, मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर आपल्या सशक्त अभिनयाची अमीट छाप उमटविणारे, दमदार संवादफेक आणि रोखठोक स्वभावामुळे रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री नाना पाटेकर यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीतील एक सशक्त आणि अष्टपैलू अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांच्या अभिनयातील ताकद, भारदस्त आवाज, परखड विचार आणि सामाजिक बांधिलकी कायम स्मरणात राहील.
सामान्य कुटुंबातून आलेल्या नाना पाटेकर यांनी आपल्या असामान्य प्रतिभेच्या जोरावर मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. ‘भालू’, ‘नटसम्राट’, ‘अंकुश’, ‘प्रहार’, ‘तिरंगा’ आणि ‘क्रांतिवीर’ यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका आजही रसिकांच्या स्मरणात आहेत. ‘प्रहार’मधील त्यांचा कसदार अभिनय आणि ‘क्रांतिवीर’मधील त्यांचे प्रभावी संवाद अनेक पिढ्यांच्या मनावर कोरले गेले आहेत.
नाना पाटेकर यांनी केवळ अभिनयाच्या माध्यमातूनच नव्हे, तर सामाजिक कार्यातूनही आपली वेगळी ओळख निर्माण केली. दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी नाम फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी केलेले कार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रसिद्धी आणि स्टारडमपासून दूर राहत साधी जीवनशैली जपत त्यांनी समाजातील प्रश्नांवर सातत्याने परखड भूमिका घेतली. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीबरोबरच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक विश्वाची मोठी हानी झाली आहे. नाना पाटेकर हे केवळ अभिनेते नव्हते, तर आपल्या संवेदनशीलतेने समाजमनाला स्पर्श करणारे व्यक्तिमत्त्व होते, अशी भावना व्यक्त केली.
नाना पाटेकर आणि मराठी मातीचे नाते कायम राहील – आमदार सत्यजित तांबे
नाना पाटेकर आणि मराठी मातीचे नाते कायमचे राहील. मराठी चित्रपटांमधील त्यांच्या विविधांगी भूमिका रसिकांच्या मनात कायम जिवंत राहतील. हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘क्रांतिवीर’ हा त्यांच्या कारकिर्दीतील विशेष लक्षवेधी चित्रपट ठरला. त्यांच्या प्रत्येक संवादामागे सामाजिक वास्तवाची जाणीव आणि विचारांची धार होती.
‘क्रांतिवीर’चे संवाद आणि नाना पाटेकर हे समीकरण कायम स्मरणात राहील – युवा नेत्या डॉ. जयश्रीताई थोरात
नाना पाटेकर आणि ‘क्रांतिवीर’मधील संवाद हे जणू एक समीकरणच बनले होते. आपल्या भारदस्त आवाजातून आणि दमदार अभिनयातून त्यांनी सर्वसामान्यांच्या मनातील भावना पडद्यावर मांडल्या. गरिबांचा, वंचितांचा आणि सर्वसामान्यांचा आवाज म्हणून त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली.
साधी राहणी, स्पष्टवक्तेपणा आणि ‘आपल्यातीलच एक माणूस’ अशी त्यांची प्रतिमा होती. त्यांच्या चित्रपटांतील संवाद केवळ मनोरंजन करणारे नव्हते, तर समाजाला विचार करायला लावणारे होते. लोकशाही, सामाजिक न्याय आणि सामान्य माणसाच्या हक्कांसाठी त्यांचे अनेक विचार आजही प्रेरणादायी आहेत. त्यांचा भारदस्त आवाज, सशक्त अभिनय आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्व रसिकांच्या मनात कायम जिवंत राहील.
अभिनयासोबत समाजकार्यातही नाना पाटेकरांचे मोठे योगदान – माजी आमदार डॉ. सुधीर तांबे
नाना पाटेकर यांनी अभिनय क्षेत्रात मोठे योगदान दिलेच; मात्र त्यांची सामाजिक बांधिलकीही तितकीच उल्लेखनीय होती. चित्रपटसृष्टीतील मोठे स्टार असूनही त्यांनी अत्यंत साधे राहणीमान जपले. प्रसिद्धीच्या झगमगाटापासून दूर राहून सर्वसामान्य माणसाशी असलेले नाते त्यांनी कायम जपले.
नाना पाटेकर हे केवळ अभिनेते नव्हते, तर संवेदनशील, दिलदार आणि समाजाच्या प्रश्नांशी नाते जोडलेले व्यक्तिमत्त्व होते. शेतकरी, दुष्काळग्रस्त आणि गरजूंसाठी त्यांनी केलेले कार्य त्यांच्या सामाजिक जाणिवेची साक्ष देते. त्यांच्या निधनाने अभिनय क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्राचीही मोठी हानी झाली आहे. सर्वसामान्यांच्या मनात घर करणारा हा आपला माणूस आज आपल्यातून निघून गेला.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 129
जयश्री थोरात बाळासाहेब थोरात श्रद्धांजली सत्यजित तांबे सुधीर तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

08/10/2026

तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात यांचा एक फोन आणि सोयाबीनला ४ हजार रुपयांची मदत; दुष्काळात शेतकऱ्यांना जाणवू लागली अनुभवी नेतृत्वाची उणीव

07/10/2026

सूचकांच्या एका निर्णयाने जिल्हा बँकेच्या निवडणुकीला नवा ट्विस्ट; संगमनेर-राहात्यातील समीकरणे घडली, विखे-देशमुखांच्या गुलालाचा मार्ग मोकळा?

06/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
नैसर्गिक आपत्ती

दुष्काळाची पाहणी करण्यासाठी उद्या केंद्रीय पथक अहिल्यानगर जिल्ह्यात; शेती व पाणी परिस्थितीचा घेणार आढावा

By Annant Ppangarkar08/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अहिल्यानगर जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश्य परिस्थितीची केंद्र शासनाने गंभीर दखल घेतली…

एक सशक्त आणि अष्टपैलू अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला; संगमनेरमधून या नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

08/10/2026

ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

08/10/2026

गुरुवार, ०८ ऑक्टोंबर —- जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

08/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.