Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लेझर लाईट, प्रेशर हॉर्न आणि कार्बन डायऑक्साइड वायूच्या वापरावर बंदी!
प्रशासन

गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लेझर लाईट, प्रेशर हॉर्न आणि कार्बन डायऑक्साइड वायूच्या वापरावर बंदी!

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar04/09/2025No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अहिल्यानगर – 

गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी महत्त्वाचा आदेश जारी केला आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ (१) नुसार मिळालेल्या अधिकारांचा वापर करून, त्यांनी जिल्ह्यात लेझर लाईट, प्रेशर हॉर्न (दबाव हॉर्न) आणि कार्बन डायऑक्साइड वायूच्या वापरावर ८ सप्टेंबरपर्यंत पूर्णपणे बंदी घातली आहे.

हा आदेश बुधवारपासून (३ सप्टेंबर) लागू झाला आहे आणि तो ८ सप्टेंबर २०२५ पर्यंत अमलात राहणार आहे. मिरवणुकांमध्ये काही मंडळांकडून मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या या वस्तूंमुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि आजारी व्यक्तींच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.

या साधनांच्या वापरामुळे श्वसन संस्थेला हानी पोहोचणे, हृदयाचे ठोके वाढणे, कानाच्या पडद्याला तसेच लहान मुलांच्या डोळ्यांना कायमचे नुकसान होण्याची शक्यता आहे. यामुळे सार्वजनिक शांतता आणि सुरक्षिततेला बाधा पोहोचू शकते, असेही जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही जिल्हा प्रशासनाने दिला आहे. नागरिकांनी शांततापूर्ण वातावरणात सण साजरे करावेत, असे आवाहनही करण्यात आले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 713
जिल्हाधिकारी प्रशासन लेझर बंदी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026

५० लाखांची कथित खंडणी अन् प्रशासकीय अनागोंदी: मुख्याधिकारी सक्तीच्या रजेवर, जिल्हाधिकाऱ्यांची कठोर कारवाई; नायब तहसीलदार मोहसीन शेख यांच्याकडे अतिरिक्त पदभार

24/09/2026

अन्न व औषध प्रशासनाची संगमनेरमध्ये कारवाई: २.६० लाखांचे संशयास्पद ‘काऊ घी’ जप्त, तर भेसळप्रकरणी दुग्ध केंद्राचा परवाना निलंबित

22/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- खाजगी बँकेच्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी सतत फोन करून धमकावणे, घरी येऊन…

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.