Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांची अखेर बदली, शासनाने दिली प्रतिनियुक्ती; संगमनेरचे मुख्याधिकारी पद रिक्तच!
प्रशासन

संगमनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांची अखेर बदली, शासनाने दिली प्रतिनियुक्ती; संगमनेरचे मुख्याधिकारी पद रिक्तच!

कोकरे यांचा संपूर्ण कार्यकाल प्रशासकीय कालावधीत गेल्याने त्यांचा नगरसेवकांशी फारसा संबंध आला नाही. त्यामुळे थेट निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यात होती मात्र त्यांच्या निर्णयाला सातत्याने लगाम घातला गेल्याचे बोलले जाते.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar24/09/2025Updated:24/09/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp
संगमनेर – संगमनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक रामदास कोकरे यांची मुदतीपूर्वीच येथून बदली करण्यात आली आहे. राज्य शासनाने त्यांची कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेमध्ये उपायुक्त पदावर प्रतिनियुक्ती केली आहे. आपल्या कामाचा ठसा संगमनेरमध्ये उमटवू न शकणारे कोकरे राजकीय दबावामुळे संगमनेरमध्ये नाराज असल्याची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून प्रशासकीय वर्तुळामध्ये होती. बदलीच्या प्रतीक्षेत असलेल्या अनेक अधिकाऱ्यांमध्ये कोकरे यांचा समावेश होता. त्यांच्या रिक्त जागेवर अद्याप कोणाची नियुक्ती करण्यात आलेली नाही.
राज्यातील अनेक शहरांमध्ये आपल्या कामाचा ठसा उमटविणारे कोकरे संगमनेरमध्ये मात्र आपल्या कामाचा ठसा उमटवू शकले नाही. ते कचऱ्याच्या समस्येवर प्रभावी मार्ग काढतील अशी अपेक्षा संगमनेरकरांना होती. त्यांनी सुरुवातीपासून तसे प्रयत्नही केले. मात्र, त्यांच्या कामकाजात होणाऱ्या हस्तक्षेपामुळे ते येथे फारशी प्रभावी कामगिरी करू शकले नाही. तसेच शहरातील फ्लेक्स कारवाईसह अन्य काही विषयांवरूनदेखील ते अडचणीत सापडले असल्याची चर्चा शहरात होती.
त्यामुळे कोकरे यांनी शहरातील फ्लेक्स कारवाईवर मौन बाळगले होते. त्यांच्या कार्यकाळात शहरात सर्वत्र फ्लेक्स युद्ध रंगले होते. असे असले तरी एक चांगला अधिकारी म्हणून आपली प्रतिमा त्यांनी जनसामान्यांमध्ये निर्माण केली होती.
कोकरे यांचा संपूर्ण कार्यकाल प्रशासकीय कालावधीत गेल्याने त्यांचा नगरसेवकांशी फारसा संबंध आला नाही. त्यामुळे थेट निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यात होती मात्र त्यांच्या निर्णयाला सातत्याने लगाम घातला गेल्याचे बोलले जाते. त्यातच संगमनेरच्या बदललेल्या राजकीय पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसापासून ते नाराज असल्याचे देखील चर्चा होती.
अखेरीस राज्य शासनाने कोकरे यांची संगमनेरमधून बदली केली आहे त्यांना प्रतिनियुक्तीवर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या उपायुक्त पदावर पाठविण्यात आले असून त्यांच्या प्रतिनियुक्तीचा कालावधी दोन वर्षांसाठी आहे. कोकरे यांच्या बदलीने संगमनेरचे मुख्याधिकारी पद रिक्त झाले असून या पदावर शासनाने अद्याप कोणाचीही नियुक्ती केलेली नाही. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पार्श्वभूमीवर आता संगमनेरचे मुख्याधिकारी पद किती काळ रिक्त राहते, प्रभारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती होते हे लवकरच समोर येणार आहे.
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,473
बदली रामदास कोकरे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

उसनवारीवरील कर्मचाऱ्यांना १० सप्टेंबरपर्यंत मूळ विभागात पाठवा; मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर मुख्य सचिवांचे कडक आदेश

25/08/2026

राज्यात खळबळ..! तहसीलदार निलंबित; ‘ते’ प्रकरण भोवलं

14/08/2026

स्वातंत्र्यदिनी भंडारदरा, कळसूबाई फिरण्याचा प्लॅन आहे? आधी पोलिसांचे ‘हे’ नवीन वाहतूक नियम नक्की वाचा!

12/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

By Annant Ppangarkar30/08/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर : खरीप हंगामातील पिकांची वाढती गरज आणि पिण्याच्या…

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026

वाळू तस्करांवर कारवाई, ट्रॅक्टरसह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक तर तिघे फरार

30/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.