Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

जयहिंद कला महोत्सव: १२ हजार विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; कौशल्यपूर्ण शिक्षणासाठी उपक्रम राज्यासाठी दिशादर्शक – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

08/09/2026

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

08/09/2026

आज मंगळवार, ०८ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

08/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » प्रणयाराधन पडले महागात! संगमनेरमध्ये नर-मादी बिबट्याची जोडी एकाच पिंजऱ्यात जेरबंद
महाराष्ट्र संवाद विशेष

प्रणयाराधन पडले महागात! संगमनेरमध्ये नर-मादी बिबट्याची जोडी एकाच पिंजऱ्यात जेरबंद

सहसा एका पिंजऱ्यात एकच बिबट्या अडकतो, मात्र एकाच वेळी ही जोडी जेरबंद झाल्याने वनविभागाचे अधिकारीही अवाक झाले आहेत.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar18/12/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज):

संगमनेर तालुक्यामध्ये बिबट्यांची मोठी दहशत सुरू असतानाच एका दुर्मिळ घटनेत नर आणि मादी बिबट्याची जोडी वनविभागाच्या पिंजऱ्यात एकाच वेळी अडकल्याची घटना घडली आहे. मिलनाच्या उद्देशाने एकत्र आलेली ही जोडी जेरबंद झाल्याने परिसरात या घटनेची मोठी चर्चा सुरू आहे.
मिर्झापूर (संगमनेर) येथील ‘गणेश मळा’ परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांचा वावर वाढला होता. काही दिवसांपूर्वीच एका बिबट्याने शेतकऱ्याच्या दुभत्या जनावरावर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले होते. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण होते. ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेत वनविभागाने या परिसरात पिंजरा लावला होता.
बुधवारी (१७ डिसेंबर) पहाटेच्या सुमारास, भक्ष्याच्या शोधात किंवा मिलनाच्या ओढीने आलेले हे नर-मादी बिबट्यांचे जोडपे वनविभागाच्या पिंजऱ्यात अडकले. सहसा एका पिंजऱ्यात एकच बिबट्या अडकतो, मात्र एकाच वेळी ही जोडी जेरबंद झाल्याने वनविभागाचे अधिकारीही अवाक झाले आहेत.
डिसेंबर ते मार्च: बिबट्यांचा विणीचा काळ- वन्यजीव अभ्यासकांच्या मते, बिबट्यांचा कोणताही निश्चित असा प्रजनन काळ नसला तरी, डिसेंबर ते मार्च हा काळ त्यांच्या प्रजननासाठी अत्यंत अनुकूल मानला जातो. याच काळात नर आणि मादी एकत्र फिरताना दिसतात. जेरबंद झालेले हे दोन्ही बिबट्या अंदाजे दीड वर्षांचे असून, ते शिकार करण्यास सक्षम आहेत.
मिर्झापूर परिसरात बिबट्यांची दहशत- मिर्झापूरसारख्या लहान गावात १५ ते १७ बिबट्यांचा वावर असावा, अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. ग्रामीण भागात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेतकरी आणि शाळकरी मुलांमध्ये भीतीचे सावट आहे. 
दिवसाढवळ्या बिबटे दर्शन देत असल्याने आम्हाला घरची दारे बंद करून राहावे लागते, अशी व्यथा स्थानिक शेतकरी साहेबराव वलवे यांनी व्यक्त केली.
वनविभागाची कार्यवाही- पहाटे ही जोडी पिंजऱ्यात अडकल्याची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोन्ही बिबट्यांना सुरक्षितपणे ताब्यात घेतले असून, त्यांची वैद्यकीय तपासणी करून पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,822
बिबट्या
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

रविवार विशेष — पुणे–नाशिक रेल्वे : २५ दिवस संपले, आता प्रश्न फक्त कमिटीचा नाही… सरकारच्या इच्छाशक्तीचा आहे! एक संगमनेरकर म्हणून काही थेट प्रश्न…

30/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
क्रिडा व कला

जयहिंद कला महोत्सव: १२ हजार विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; कौशल्यपूर्ण शिक्षणासाठी उपक्रम राज्यासाठी दिशादर्शक – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

By Annant Ppangarkar08/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन : शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी जयहिंद लोकचळवळीच्या…

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

08/09/2026

आज मंगळवार, ०८ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

08/09/2026

राजापूर जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समिती रद्द करण्याची नागरिकांची मागणी

07/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.