Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर तालुक्यात ७५ टक्के पेरण्या पूर्ण; पाऊस लांबल्याने शेतकरी चिंतेत, दुबार पेरणीचे संकट

July 18, 2026

संगमनेर तालुका व शहर काँग्रेसच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर; अजय फटांगरे, सोमेश्वर दिवटे आणि अमोल शेलकर यांच्यावर मोठी जबाबदारी

July 18, 2026

जंतरमंतरवर हायव्होल्टेज ड्रामा: सोनम वांगचुक रुग्णालयात दाखल; अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात… रात्री काय घडलं!

July 18, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » भीषण अपघात; ट्रक आणि मजुरांच्या पिकअपची समोरासमोर धडक, दोघांचा मृत्यू तर १५-२० जखमी
अपघात

भीषण अपघात; ट्रक आणि मजुरांच्या पिकअपची समोरासमोर धडक, दोघांचा मृत्यू तर १५-२० जखमी

स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी जखमींना वाहनातून बाहेर काढून तातडीने ओतूर आणि आळेफाटा येथील विविध रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरDecember 30, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

जुन्नर (पुणे): 

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील अहिल्यानगर-कल्याण महामार्गावर आज मंगळवारी सकाळी हृदयद्रावक घटना घडली आहे. डुंबरवाडी गावच्या हद्दीतील हॉटेल अभिजित जवळ मजुरांनी भरलेली पिकअप आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण समोरासमोर धडकेत दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला असून, १५ ते २० जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामुळे महामार्गावर रक्ताचा सडा पडला होता आणि परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, आज मंगळवारी (दिनांक ३० डिसेंबर) सकाळी नऊ वाजेच्या सुमारास मजुरांचे पिकअप वाहन ओतूरकडून आळेफाट्याच्या दिशेने जात होते. याच वेळी आळेफाटा बाजूकडून ओतूरच्या दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकने पिकअपला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की पिकअपचा अक्षरशः चक्काचूर झाला असून, त्यातील मजूर रस्त्यावर फेकले गेले. या अपघातात दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एका मजुराची प्रकृती अद्याप चिंताजनक आहे.

अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. तात्काळ ओतूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी आणि डुंबरवाडी टोल नाक्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी जखमींना वाहनातून बाहेर काढून तातडीने ओतूर आणि आळेफाटा येथील विविध रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या भीषण अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. मात्र, महामार्ग प्रशासनाने क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून बाजूला हटवली असून आता वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. भरधाव वेग आणि नियंत्रणाबाहेर गेलेली वाहने यामुळे हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. ओतूर पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत असून मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,418
अपघात जुन्नर पिकअप
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

दिंडीच्या ट्रकने धडक दिल्याने तीन वारकरी महिलांचा मृत्यू तर चौघी जखमी

July 13, 2026

कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; दर्शन घेऊन परतणारे बोटा येथील ५ भाविक गंभीर जखमी

June 11, 2026

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात: जोर्वे येथील रावसाहेब काकड यांचा मृत्यू; शरदनाना थोरात यांच्यासह तिघे जखमी, प्रकृती स्थिर

June 8, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

संगमनेर तालुक्यात ७५ टक्के पेरण्या पूर्ण; पाऊस लांबल्याने शेतकरी चिंतेत, दुबार पेरणीचे संकट

By अनंत पांगारकरJuly 18, 20260

संगमनेर: तालुक्यात जून महिना कोरडा गेल्यावर जुलैच्या सुरुवातीला झालेल्या पावसामुळे खरिपाच्या पेरण्यांना वेग आला असून,…

संगमनेर तालुका व शहर काँग्रेसच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर; अजय फटांगरे, सोमेश्वर दिवटे आणि अमोल शेलकर यांच्यावर मोठी जबाबदारी

July 18, 2026

जंतरमंतरवर हायव्होल्टेज ड्रामा: सोनम वांगचुक रुग्णालयात दाखल; अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात… रात्री काय घडलं!

July 18, 2026

आज, शनिवार १८ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 18, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.