Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मकर संक्रांतीपूर्वीच संगमनेरमध्ये रणकंदन; नायलॉन मांजा विरोधात ‘हे’ संघटन रस्त्यावर! मुख्याधिकारी, पोलीस निरीक्षकांकडे ही आक्रमक मागणी
सामाजिक

मकर संक्रांतीपूर्वीच संगमनेरमध्ये रणकंदन; नायलॉन मांजा विरोधात ‘हे’ संघटन रस्त्यावर! मुख्याधिकारी, पोलीस निरीक्षकांकडे ही आक्रमक मागणी

केवळ माणसेच नव्हे, तर आकाशात उडणारे मुके पक्षीही या मांजात अडकून जायबंदी होतात किंवा मृत्युमुखी पडतात
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar02/01/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी- 
येणाऱ्या मकर संक्रांतीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात पतंगबाजीचा उत्साह वाढत असला तरी, नायलॉन मांजाचा धोका पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या जीवघेण्या नायलॉन मांजाची विक्री व वापरावर शहरात कडक बंदी घालून दोषींवर गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी ‘राहुल गांधी समर्थक संघाच्या’ (RGSS) वतीने संगमनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी देविदास गोरे, पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांना सविस्तर निवेदन देण्यात आले.
RGSSने दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, नायलॉन मांजा हा प्लास्टिक मिश्रित आणि अविघटनशील असल्याने तो सहजासहजी तुटत नाही. दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या गळ्याला हा मांजा अडकून गंभीर दुखापत होण्याच्या किंवा मृत्यू होण्याच्या घटना दरवर्षी घडत असून मानवी जीव धोक्यात आला आहे. केवळ माणसेच नव्हे, तर आकाशात उडणारे मुके पक्षीही या मांजात अडकून जायबंदी होतात किंवा मृत्युमुखी पडतात. पर्यावरणाच्या दृष्टीनेही हा मांजा अत्यंत घातक असून तो अनेक वर्षे निसर्गात तसाच राहत असल्याने प्रदूषणाचा मोठा धोका निर्माण झाला आहे.
सर्वोच्च न्यायालय आणि राष्ट्रीय हरित लवादाने (NGT) नायलॉन मांजाच्या विक्रीवर आणि वापरावर देशभरात बंदी घातली असली, तरीही शहरात छुप्या पद्धतीने याची विक्री होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाने तातडीने शहरातील पतंग विक्रीच्या दुकानांची तपासणी करून नायलॉन मांजा जप्त करावा, तसेच विक्रेत्यांवर आणि वापरणाऱ्या व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करावेत अशी मागणी करण्यात आली आहे.
यासोबतच, नगर परिषदेने शहरात ध्वनिक्षेपकाद्वारे किंवा फलकांद्वारे जनजागृती करावी आणि ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या नायलॉन मांजाच्या विक्रीवरही लक्ष ठेवून त्यावर नियंत्रण मिळवावे, अशी आग्रही मागणी संघाने केली आहे. प्रशासनाने या विषयाचे गांभीर्य ओळखून त्वरित पावले उचलली नाहीत, तर नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर होईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
निवेदन देताना राम अरगडे, प्रकाश कडलग, अरुण चव्हाण, अमोल शेलकर, अरुण जाधव, रवींद्र हासे, कल्याण जोर्वेकर, प्रवीण हासे, सतीश खताळ, शंतनू भालेकर, मोहसीन शेख यांसह संघटनेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 815
RGSS कारवाई दयानंद गोरे मांजा राहुल गांधी समर्थक संघ समीर बारवकर
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

संगमनेरमध्ये डीजे नियमांचे उल्लंघन; ६ जणांवर गुन्हा दाखल

25/09/2026

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहरालगतच्या गुंजाळवाडी परिसरात अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावर स्थानिक गुन्हे…

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.