Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

सोशल मीडिया रिल्सच्या प्रभावापासून दूर राहून तरुणांनी ‘गुंतवणूक भान’ जपावे : सुनील कडलग

09/09/2026

आज बुधवार, ०९ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » कॅन्सर निदानासाठी एसएमबीटी हॉस्पिटलचा पुढाकार; २५ हजारांपर्यंतच्या तपासण्या आता पूर्णतः मोफत
आरोग्य

कॅन्सर निदानासाठी एसएमबीटी हॉस्पिटलचा पुढाकार; २५ हजारांपर्यंतच्या तपासण्या आता पूर्णतः मोफत

इगतपुरी तालुक्यातील नंदी हिल्स येथील एसएमबीटी हॉस्पिटलच्या कॅन्सर इन्स्टिट्युटमध्ये कर्करोग निदानासाठी लागणाऱ्या तपासण्या आता मोफत करण्यात आल्या आहेत.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar25/01/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

नाशिक | प्रतिनिधी
कर्करोगाचा धोका सातत्याने वाढत असतानाच, या आजाराच्या उपचारांमधील सर्वात मोठा अडसर हा निदानासाठी लागणारा खर्च ठरत आहे.भारतात कर्करोगाची लक्षणे असलेल्या सुमारे ६० टक्क्यांहून अधिक रुग्णांकडे प्राथमिक तपासण्यांसाठी आवश्यक पैसे नसतात, तर महाराष्ट्रातही हीच परिस्थिती असून सुमारे ५५ ते ६० टक्के रुग्ण केवळ आर्थिक कारणांमुळे निदानास विलंब करतात. परिणामी, अनेक रुग्ण तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यात उपचारासाठी दाखल होतात. ही गंभीर बाब लक्षात घेऊन इगतपुरी तालुक्यातील नंदी हिल्स येथील एसएमबीटी हॉस्पिटलच्या कॅन्सर इन्स्टिट्युटमध्ये कर्करोग निदानासाठी लागणाऱ्या तपासण्या आता मोफत करण्यात आल्या आहेत.
कर्करोग सदृश्य लक्षणे असलेल्या रुग्णांना २५ हजार रुपयांपर्यंतच्या तपासण्या पूर्णतः मोफत केल्या जात असून,या सुविधेचा लाभ आतापर्यंत हजारो रुग्णांनी घेतल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. ही सेवा सोमवार ते शनिवार या कालावधीत उपलब्ध असून रुग्ण थेट बाह्यरुग्ण विभागात किंवा आदिवासी व दुर्गम भागात आयोजित आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून प्राथमिक तपासणी करून या योजनेचा लाभ घेऊ शकतात. मुंबईच्या प्रख्यात टाटा मेमोरियल हॉस्पिटलसोबत झालेला करार आणि या ठिकाणी पूर्णवेळ उपलब्ध असलेले टाटाचे तज्ज्ञ डॉक्टर्स यामुळे एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कर्करोग उपचार सुविधा ग्रामीण भागातच उपलब्ध झाल्या आहेत.
एसएमबीटी कॅन्सर इन्स्टिटयूटमध्ये टाटा मेमोरियलच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञ डॉक्टरांची अनुभवी टीम कार्यरत आहे.यामध्ये मेडिकल ऑन्कोलॉजीसाठी डॉ. संदीप इशी, सर्जिकल ऑन्कोलॉजीसाठी डॉ. विनायक शेनगे व डॉ. अंबरीश चॅटर्जी, बालरोग कर्करोगासाठी डॉ. पिंकी शाह–काळे, तर हेमॅटो ऑन्कोलॉजीसाठी डॉ. गिरीश बदरखे रुग्णांना सेवा देत आहेत. या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आजवर हजारो रुग्णांवर यशस्वी उपचार व शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. ग्रामीण आणि आदिवासी भागातील नागरिकांचे आरोग्य सुधारण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असलेल्या एसएमबीटी हॉस्पिटलने रक्त तपासण्या, बायोप्सी, सीटी स्कॅन आणि एमआरआय यांसारख्या महागड्या तपासण्यांचा खर्च स्वतः उचलल्यामुळे रुग्णांना वेळेत उपचार मिळणे शक्य होत आहे.
केवळ सामान्य कर्करोगच नव्हे, तर रक्तविकारांशी संबंधित मायलोमा आणि ल्युकेमिया यांसारख्या आजारांवरही येथे उपचार केले जात आहेत.अत्यंत खर्चिक मानल्या जाणाऱ्या बोन मॅरो ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया अल्पदरात केल्या जात असून, आधुनिक उपचारपद्धतींपैकी एक असलेली ‘कार-टी सेल थेरपी’ देखील येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त २६ पेक्षा अधिक सुपर स्पेशालिटी सेवा एकाच छताखाली कार्यरत असून, २०० पेक्षा अधिक बेड्सचा आयसीयू बॅकअप, १७ अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर्स आणि २४ तास तज्ज्ञ सेवा येथे सज्ज आहेत.

लवकरच एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये पेट स्कॅन आणि रेडिएशन थेरपी सुविधा सुरू होणार असून, यामुळे कर्करोग निदान अधिक अचूक आणि उपचार अधिक प्रभावी ठरणार आहे. एसएमबीटी हॉस्पिटल हे सर्वसमावेशक कर्करोग केअर सेंटर म्हणून काम करत असून, लवकर निदान झाल्यास कर्करोग पूर्णपणे बरा होऊ शकतो.
– सचिन बोरसे, सीओओ, एसएमबीटी हॉस्पिटल

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 404
एसएमबीटी हॉस्पिटल कॅन्सर सचिन बोरसे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

19/07/2026

मध्यरात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रुग्णालयात दाखल; आगामी दौरे आणि कार्यक्रम तूर्तास पुढे ढकलले

04/07/2026

केमिकलयुक्त दूषित पाण्यामुळे बदापूर येथील शेती धोक्यात; विहिरींचे पाणी दूषित, तलावातील मासे मृत

11/06/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आर्थिक

सोशल मीडिया रिल्सच्या प्रभावापासून दूर राहून तरुणांनी ‘गुंतवणूक भान’ जपावे : सुनील कडलग

By Annant Ppangarkar09/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – सोशल मीडियावरील रिल्स, भ्रामक ट्रेंड आणि ऑनलाइन चर्चांच्या…

आज बुधवार, ०९ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

शिंदेवाडी जिल्हा परिषद शाळेत ‘एक विद्यार्थी, एक बेंच’ उपक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद; आठवडाभरात ६८ हजारांच्या लोकसहभागातून ४० बेंचचे लोकार्पण

08/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.