Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमधील अकोले बायपासवरील भाजीबाजार हटवला; पोलीस आणि भाजीपाला विक्रेत्यांमध्ये प्रचंड हायव्होल्टेज ड्रामा, एक ताब्यात
महाराष्ट्र संवाद विशेष

संगमनेरमधील अकोले बायपासवरील भाजीबाजार हटवला; पोलीस आणि भाजीपाला विक्रेत्यांमध्ये प्रचंड हायव्होल्टेज ड्रामा, एक ताब्यात

सुरुवातीला पालिका कर्मचारी आणि विक्रेत्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली, परंतु काही वेळातच या वादाचे पर्यावसान थेट धक्काबुक्कीत झाले
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar01/06/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर:

शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी आणि अतिक्रमणमुक्त मोहिमेअंतर्गत संगमनेर नगरपालिका प्रशासनाने आज मोठी कारवाई केली. अकोले बायपासवरील बीएड कॉलेजसमोरील अनधिकृत भाजीपाला मार्केट पालिकेच्या पथकाने पूर्णपणे हटवले. मात्र, या कारवाई दरम्यान पालिका कर्मचारी, पोलीस आणि भाजीपाला विक्रेत्यांमध्ये प्रचंड हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला.

अतिक्रमण हटाव मोहिमेला हिंसक वळण लागून पोलीस आणि विक्रेत्यांमध्ये जोरदार झटापट झाली. यात दोन कर्मचाऱ्यांचे कपडे फाटल्याची धक्कादायक घटना घडली असून, पोलिसांनी एका विक्रेत्याला ताब्यात घेतले असून त्याने मद्यप्राशन केले असल्याचे बोलले जात आहे.

संगमनेर नगरपालिकेने शहरातील वाहतुकीला अडथळा ठरणारे रस्ते आणि चौक मोकळे करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. शहरातील पेटीत हायस्कूल परिसरातील चौकात आणि अकोले बायपासवर मोठ्या प्रमाणावर भाजीबाजार भरत असल्याने येथे दररोज प्रचंड वाहतूक कोंडी होत होती. यावर तोडगा म्हणून पालिकेने या विक्रेत्यांना मेडिकल हॉस्पिटलसमोरील पर्यायी जागेवर स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला होता.

यासंदर्भात चर्चा करण्यासाठी पालिका प्रशासनाने भाजी विक्रेत्यांना कार्यालयात बैठकीसाठी बोलावले होते. परंतु, पर्यायी जागा मान्य नसल्याने विक्रेत्यांनी या बैठकीकडे पाठ फिरवली. विक्रेत्यांच्या या भूमिकेनंतर पालिका प्रशासनाने थेट कारवाईचा बडगा उगारण्याचे निश्चित केले.

दुपारच्या सुमारास पालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक आणि पोलिसांचा मोठा फौजफाटा अचानक अकोले बायपासवर धडकला आणि त्यांनी दुकाने हटवण्यास सुरुवात केली. अचानक झालेल्या या कारवाईमुळे विक्रेते आक्रमक झाले. सुरुवातीला पालिका कर्मचारी आणि विक्रेत्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली, परंतु काही वेळातच या वादाचे पर्यावसान थेट धक्काबुक्कीत झाले. यावेळी उपस्थित असलेल्या पोलिसांशी काही विक्रेत्यांनी थेट पंगा घेतला. यामध्ये झालेल्या तीव्र झटापटीत दोन पोलीस कर्मचाऱ्यांचे कपडे फाटले.

या गोंधळात पोलिसांवर हात टाकणाऱ्या एका भाजीपाला विक्रेत्याला पोलिसांनी जागीच चोप देत ताब्यात घेतले आणि शासकीय गाडीत टाकले. हा संबंधित विक्रेता दारूच्या नशेत धुंद होता आणि पोलिसांच्या गाडीत बसवल्यानंतर तो ‘जय श्रीराम’च्या घोषणा देत होता. या खळबळजनक घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान, पालिकेने केलेल्या या बळाचा वापर करून केलेल्या आणि पोलिसांकडून झालेल्या कारवाईचा भाजीपाला विक्रेत्यांनी तीव्र निषेध केला आहे. या प्रकरणी पोलीस आता कायदेशीर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 891
अतिक्रमण मोहीम झटापट पोलीस विक्रेते वाद
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

By Annant Ppangarkar16/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहराच्या पायाभूत सुविधा विकासाला चालना देण्यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांच्या…

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.