Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

राजहंस मिल्क पार्लर चोरी प्रकरण: संगमनेर पोलिसांकडून अवघ्या काही तासांत दोन चोरट्यांना बेड्या

04/09/2026

अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचा दणका; २० लाखांचा वाळू तस्करांचा मुद्देमाल जप्त

04/09/2026

आज शुक्रवार, ०४ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

04/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पोलिसांची मोठी कारवाई: कत्तलीसाठी चालवलेल्या गोवंशासह तिघांना पकडले; ८ लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हेगारी

पोलिसांची मोठी कारवाई: कत्तलीसाठी चालवलेल्या गोवंशासह तिघांना पकडले; ८ लाखांचा मुद्देमाल जप्त

कारवाईत २ लाख २२ हजार रुपये किमतीची जनावरे आणि ६ लाख रुपये किमतीची दोन वाहने, असा एकूण ८ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar05/06/2026Updated:05/06/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | शिर्डी:

राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असतानाही अत्यंत निर्दयपणे कत्तलीच्या उद्देशाने गोवंशाची वाहतूक करणाऱ्या दोन पिकअप वाहनांवर शिर्डी पोलिसांनी धाडसी कारवाई केली. सावळीविहीर जवळ सापळा रचून केलेल्या या कारवाईत पोलिसांनी ६ जनावरांची सुटका केली असून, एकूण ८ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

गंगापूरच्या दिशेने गोवंशाची बेकायदेशीर तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांना मिळाली होती. त्यांच्या सूचनेनुसार उपविभागीय अधिकारी अमोल भारती आणि पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने सावळीविहीर परिसरात पाळत ठेवून सापळा रचला.

यावेळी गंगापूरच्या दिशेने जाणाऱ्या दोन महिंद्रा पिकअप वाहनांना (क्रमांक एमएच २१ एक्स ६९५३ आणि एमएच २० डीई ७८२२) पोलिसांनी अडवून त्यांची तपासणी केली. या दोन्ही वाहनांमध्ये अत्यंत दाटीवाटीने आणि निर्दयपणे भरलेली ६ गोवंश जनावरे व वासरे आढळून आली. पोलिसांनी तत्परता दाखवत सर्व जनावरांची सुटका केली. या कारवाईत २ लाख २२ हजार रुपये किमतीची जनावरे आणि ६ लाख रुपये किमतीची दोन वाहने, असा एकूण ८ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी सलीम महम्मद सय्यद (वय ५०, रा. रांजणगाव), हरीभाऊ दशरथ गायके (वय ४६, रा. धानेगाव) आणि अमीर मुन्नील सय्यद (वय २६, रा. रांजणगाव, सर्व ता. गंगापूर) या तिघांना ताब्यात घेऊन अटक केली आहे. पोलीस कर्मचारी प्रल्हादसिंग सुदर्डे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध ‘महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम’ आणि प्राण्यांना निर्दयतेने वागवण्यास प्रतिबंध करणाऱ्या कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शिर्डी पोलीस करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 485
गोवंश कारवाई शिर्डी पोलीस
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

राजहंस मिल्क पार्लर चोरी प्रकरण: संगमनेर पोलिसांकडून अवघ्या काही तासांत दोन चोरट्यांना बेड्या

04/09/2026

अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचा दणका; २० लाखांचा वाळू तस्करांचा मुद्देमाल जप्त

04/09/2026

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

राजहंस मिल्क पार्लर चोरी प्रकरण: संगमनेर पोलिसांकडून अवघ्या काही तासांत दोन चोरट्यांना बेड्या

By Annant Ppangarkar04/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: संगमनेर शहराजवळील कोल्हार-घोटी रस्त्यावरील समनापूर फ्लॉवर मार्केट चौफुली येथील…

अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचा दणका; २० लाखांचा वाळू तस्करांचा मुद्देमाल जप्त

04/09/2026

आज शुक्रवार, ०४ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

04/09/2026

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.