Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

04/09/2026

संगमनेर बस स्थानक परिसरात कारवाई; एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या तरुणासह २ लाख ७ हजारांच्या मुद्देमाल पकडला

04/09/2026

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे ‘नाट्य परिषद करंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन; १८ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

04/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमधील ‘मेडीकव्हर’चा काळा धंदा चव्हाट्यावर! महात्मा फुले योजनेच्या नावाखाली लाच मागणारे ‘रॅकेट’ लाचलुचपतच्या जाळ्यात, दोघांवर गुन्हा दाखल!
गुन्हेगारी

संगमनेरमधील ‘मेडीकव्हर’चा काळा धंदा चव्हाट्यावर! महात्मा फुले योजनेच्या नावाखाली लाच मागणारे ‘रॅकेट’ लाचलुचपतच्या जाळ्यात, दोघांवर गुन्हा दाखल!

रुग्णांच्या परिस्थितीचा असा फायदा घेणाऱ्या आणि शासकीय योजनांचा बट्ट्याबोळ करणाऱ्या या लाचखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता संगमनेर शहरातून जोर धरू लागली आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar21/07/2026Updated:21/07/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
संगमनेर | अनंत पांगारकर
गरीब आणि गरजूंना मोफत वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी शासनाने सुरु केलेल्या ‘महात्मा फुले जन आरोग्य योजने’चा संगमनेरमधील मेडीकव्हर हॉस्पिटलने साफ बट्ट्याबोळ चालवला आहे. गोरगरिबांच्या आरोग्याचा खेळ खंडोबा करत त्यांच्याकडून उघडपणे लाचेची उकळपटी करणाऱ्या मेडीकव्हर हॉस्पिटलमधील दोन बड्या धटिंगणांचा खरा चेहरा आता समोर आला आहे. रुग्णाच्या आईवर उपचार करण्यासाठी आणि तिचे ऑपरेशन या योजनेतून करून देण्यासाठी तब्बल २० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या डेटा एंट्री ऑपरेटर सुभाष धाडवड आणि त्याला खतपाणी घालणारा हॉस्पिटलचा मॅनेजर सुजित गायकवाड या दोघांच्या मुसक्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) आवळल्या असून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातील धक्कादायक प्रकार असा की, महात्मा फुले योजनेअंतर्गत मोफत उपचार मिळणे हा रुग्णाचा हक्क असतानाही, आरोपी सुभाष धाडवड याने रुग्णाच्या नातेवाईकांकडे २० हजार रुपये लाचेची मागणी केली. एवढ्यावरच न थांबता, ही लाचेची रक्कम दिली नाही तर कसलेही बिल मिळणार नाही अशी धमकीवजा हुसकावणीही त्याने दिली.
संतापलेल्या तक्रारदाराने जेव्हा याबाबत हॉस्पिटलचा मॅनेजर सुजित गायकवाड याच्याकडे विचारणा केली, तेव्हा मदत करण्याऐवजी मॅनेजर महाशयांनी ‘जे ठरले आहे त्यात एक रुपयाही कमी होणार नाही’ असा दम भरत या लाचखोरीचे थेट समर्थन केले.
आरोग्यसेवेच्या नावाखाली सुरू असलेल्या या लुटमारीविरोधात तक्रारदाराने तातडीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. अहिल्यानगर एसीबीच्या पथकाने २२ मे २०२५ रोजी केलेल्या लाच मागणी पडताळणीदरम्यान या दोन्ही आरोपींचा काळा कारभार आणि लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक छाया देवरे आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली असून, पोलीस उपअधिक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
रुग्णांच्या परिस्थितीचा असा फायदा घेणाऱ्या आणि शासकीय योजनांचा बट्ट्याबोळ करणाऱ्या या लाचखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता संगमनेर शहरातून जोर धरू लागली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,206
अहिल्यानगर एसीबी लाचखोरी लाचलुचपत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर बस स्थानक परिसरात कारवाई; एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या तरुणासह २ लाख ७ हजारांच्या मुद्देमाल पकडला

04/09/2026

राजहंस मिल्क पार्लर चोरी प्रकरण: संगमनेर पोलिसांकडून अवघ्या काही तासांत दोन चोरट्यांना बेड्या

04/09/2026

अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचा दणका; २० लाखांचा वाळू तस्करांचा मुद्देमाल जप्त

04/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

By Annant Ppangarkar04/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: श्रीराम फायनान्सकडून घेतलेल्या कर्जाच्या हप्त्याचा चेक बाऊन्स झाल्याप्रकरणी समशेरपूर…

संगमनेर बस स्थानक परिसरात कारवाई; एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या तरुणासह २ लाख ७ हजारांच्या मुद्देमाल पकडला

04/09/2026

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे ‘नाट्य परिषद करंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन; १८ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

04/09/2026

राजहंस मिल्क पार्लर चोरी प्रकरण: संगमनेर पोलिसांकडून अवघ्या काही तासांत दोन चोरट्यांना बेड्या

04/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.