Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

एसएमबीटीचा स्तुत्य उपक्रम | दोन वर्षात २४ डोहाळे जेवण; मोफत १८ हजार सोनोग्राफी आणि दोन हजार महिलांच्या प्रसूती

25/10/2026

संजय गांधी नगर अन् वडारवस्तीच्या घरांचे उतारे नागरिकांच्या नावावर करण्याची आमदार अमोल खताळ यांची ग्वाही; शिवसेना शाखेच्या उद्घाटनाप्रसंगी आश्वासन

25/10/2026

संगमनेरात प्रवरा नदीपात्रात खाकीची जरब! टिप्परसह १५ लाखांची वाळू पकडली, दोघांवर गुन्हा दाखल

25/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » एसएमबीटीचा स्तुत्य उपक्रम | दोन वर्षात २४ डोहाळे जेवण; मोफत १८ हजार सोनोग्राफी आणि दोन हजार महिलांच्या प्रसूती
आरोग्य

एसएमबीटीचा स्तुत्य उपक्रम | दोन वर्षात २४ डोहाळे जेवण; मोफत १८ हजार सोनोग्राफी आणि दोन हजार महिलांच्या प्रसूती

यादरम्यान महिलांचा आत्मविश्वास वाढवला जातो, तसेच काय काळजी घ्यायला हवी याबाबतची माहिती दिली जाते
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar25/10/2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-
ग्रामीण भागातील गरजू महिलांच्या आरोग्याला प्राधान्य देत, माता व बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी एसएमबीटी हॉस्पिटलच्या वतीने एक अत्यंत दिलासादायक उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या माध्यमातून एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये गर्भवती महिलांसाठी नॉर्मल म्हणजेच प्राकृतिक प्रसूती असो वा सिझेरियन (शस्त्रक्रिया) असो, दोन्ही प्रकारच्या प्रसूती पूर्णपणे मोफत केल्या जात आहेत. केवळ प्रसूतीच नव्हे, तर गरोदरपणाच्या नऊ महिन्यांच्या काळात गर्भाची योग्य वाढ, प्रकृतीची तपासणी आणि कोणत्याही गुंतागुंतीशिवाय प्रसूती व्हावी, यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या चारही सोनोग्राफी तपासण्या देखील पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
हॉस्पिटलच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत पाच हजाराहून अधिक एएनसी रुग्ण महिलांनी प्रसूतीपूर्व सेवांचा लाभ घेतला आहे; तर माता व बालकाच्या सुरक्षेसाठी अठरा हजाराहून अधिक सोनोग्राफी पूर्णपणे मोफत करण्यात आल्या आहेत. गर्भवती महिलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यासाठी आणि त्यांना मानसिक आधार देण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेल्या दोन वर्षांपासून अनोख्या डोहाळे जेवणाचे कार्यक्रम याठिकाणी पार पडले आहेत. यादरम्यान महिलांचा आत्मविश्वास वाढवला जातो, तसेच काय काळजी घ्यायला हवी याबाबतची माहिती दिली जाते. हॉस्पिटलच्या मोफत सुविधांच्या माध्यमातून आजवर दोन हजाराहून अधिक लाभार्थ्यांना थेट लाभ मिळाला आहे.
केवळ वैद्यकीय उपचार करून न थांबता, एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये गर्भवती महिलांच्या सर्वांगीण आरोग्यासाठी व्यापक स्वरूपात जनजागृती मोहीम राबवली जात आहे.
गर्भधारणा राहिल्यापासून ते बाळ जन्माला येईपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले जाते. यामध्ये गर्भसंस्कारांचे महत्त्व, बाळाचा बौद्धिक व मानसिक विकास, गरोदरपणात घ्यावयाची काळजी, नियमित व्यायाम, आहारविषयक समुपदेशन, उच्च जोखमीची गर्भधारणा (हाय रिस्क प्रेग्नन्सी), अकाली जन्मलेले बाळ, एनआयसीयू (NICU) सुविधा, बालशस्त्रक्रिया, लसीकरण तसेच रक्ताल्पता (ॲनिमिया) टाळण्यासाठी आवश्यक असलेल्या सकस आहाराविषयी सविस्तर माहिती दिली जाते.बारीक-सारीक गोष्टींवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून विशेष लक्ष केंद्रित केले जात असल्याने महिलांमध्ये आत्मविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सरकार गर्भवती मातांचा आणि जन्मत: बालमृत्यू रोखण्यासाठी ठोस पावले उचलत आहेत. ग्रामीण भागातील हे प्रमाण कमी करण्यासाठी एसएमबीटी हॉस्पिटलच्या वतीने नवोपक्रम राबवत हे प्रमाण कमी करण्यासाठी हातभार लावला जात आहे. या संपूर्ण लोककल्याणकारी मोहिमेला यशस्वी करण्यासाठी ठिकठीकाणी असलेल्या आरोग्यमित्रांच्या माध्यमातून हे काम अधिक प्रभावी केले जात आहे. ग्रामीण भागातील गरजू महिलांचा शोध घेऊन त्यांना वेळेवर तपासणीसाठी हॉस्पिटलपर्यंत, त्यांच्या प्रसूतीपूर्व व प्रसूतीनंतरच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करणे, हे काम आरोग्यमित्र अतिशय निष्ठेने करत आहेत. त्यांच्या या सक्रिय सहभागामुळे आज जिल्ह्यातील शेकडो महिलांना या मोफत आरोग्य सुविधांचा थेट लाभ मिळत आहे.
सामान्य कुटुंबांवर उपचारासाठी येणारा हजारो रुपयांचा कर्जाचा बोजा यामुळे टळला असून, सुरक्षित आणि आनंदी बाळंतपणाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरत आहे. या सर्व प्रवासात केवळ माताच नव्हे, तर जन्माला येणाऱ्या नवजात अर्भकापासून ते सोळा वर्षांपर्यंतच्या बालकांच्या आरोग्याचीही तितकीच काळजी घेतली जात आहे. एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये शून्य ते १६ वर्षांच्या बालकांसाठी लागणारे सर्व प्रकारचे वैद्यकीय उपचार पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मुलांच्या आरोग्यात कोणतीही तडजोड होऊ नये म्हणून तज्ज्ञ बालरोग तज्ज्ञांच्या देखरेखीखाली विविध आजारांवर उपचार, मोफत औषधोपचार आणि आवश्यक त्या आरोग्य तपासण्या केल्या जातात.
डोहाळे जेवणातून अनेक हेतू सफल-
गरोदरपणात महिलांच्या आरोग्याची काळजी अत्यंत महत्त्वाची असते. अनेक गर्भवतींना गर्भधारणेचा काळ कसा घालवावा काय काळजी घ्यावी याची कल्पना नसते. यातूनही अनेक अडचणी त्यांच्या प्रसूतीवेळी होतात. त्यामुळे महिलांना साध्या सोप्या बारीक सारीक गोष्टी समजून सांगण्यासाठी डोहाळे जेवण अतिशय चांगला पर्याय आहे. एकीकडे सर्वांचे डोहाळे पुरवले जातात तर दुसरीकडे सर्वाधिक काळजी घेण्याच्या दिवसांत त्यांना याबाबतचे पुरेशी माहिती दिली जाते. यासोबतच स्रीरोग विभागातील विद्यार्थ्यांना आपण कुठे काम करतो? कुणासाठी करतो? भविष्यात डॉक्टर सर्वजण व्हाल पण माणुसकी करुणा आणि सहानुभूती रुग्णांच्या प्रती कशी असावी याचा धडा विद्यार्थ्यांना देण्यात आम्हाला यश येत आहे.
-डॉ. किरण राजोळे, स्त्रीरोगतज्ज्ञ आणि विभागप्रमुख, एसएमबीटी हॉस्पिटल
शून्य ते १६ वर्षांच्या बालकांवर मोफत उपचार-
मातांच्या मोफत प्रसूतीसोबतच त्यांच्या बालकांच्या आरोग्यालाही आम्ही तितकेच प्राधान्य दिले आहे. जन्मापासून ते सोळा वर्षांपर्यंतच्या मुला-मुलींवर होणारे सर्व प्रकारचे उपचार, संसर्गजन्य आजारांवरील औषधोपचार आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवा एसएमबीटीमध्ये पूर्णपणे मोफत उपलब्ध आहेत. कुपोषणमुक्तीपासून ते लहान मुलांच्या विविध आजारांवर अत्याधुनिक उपकरणांच्या साहाय्याने आणि तज्ज्ञ बालरोगतज्ज्ञांमार्फत उपचार केले जातात. बालकांचे आरोग्य निरोगी आणि सुरक्षित ठेवणे हेच आमचे मुख्य ध्येय आहे.
-सचिन बोरसे, संचालक, आरोग्यसेवा, एसएमबीटी हॉस्पिटल.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 120
आरोग्यसेवा एसएमबीटी हॉस्पिटल गर्भवती महिला नाशिक न्यूज माता-बाल आरोग्य मोफत प्रसूती मोफत सोनोग्राफी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

19/07/2026

मध्यरात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रुग्णालयात दाखल; आगामी दौरे आणि कार्यक्रम तूर्तास पुढे ढकलले

04/07/2026

केमिकलयुक्त दूषित पाण्यामुळे बदापूर येथील शेती धोक्यात; विहिरींचे पाणी दूषित, तलावातील मासे मृत

11/06/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आरोग्य

एसएमबीटीचा स्तुत्य उपक्रम | दोन वर्षात २४ डोहाळे जेवण; मोफत १८ हजार सोनोग्राफी आणि दोन हजार महिलांच्या प्रसूती

By Annant Ppangarkar25/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- ग्रामीण भागातील गरजू महिलांच्या आरोग्याला प्राधान्य देत, माता व बालमृत्यूचे प्रमाण…

संजय गांधी नगर अन् वडारवस्तीच्या घरांचे उतारे नागरिकांच्या नावावर करण्याची आमदार अमोल खताळ यांची ग्वाही; शिवसेना शाखेच्या उद्घाटनाप्रसंगी आश्वासन

25/10/2026

संगमनेरात प्रवरा नदीपात्रात खाकीची जरब! टिप्परसह १५ लाखांची वाळू पकडली, दोघांवर गुन्हा दाखल

25/10/2026

“सगळे पुढारी पैसे खातात…” संगमनेरात मंदिराच्या बांधकामावरून राडा, चष्मा फोडला अन् शर्ट फाडला! पोलिसांत तक्रार दाखल!

25/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.