Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » काँग्रेस पक्षाध्यक्षपद निवडणुकीसाठी अहमदनगर जिल्ह्यात अवघे १७ मतदार
राजकारण

काँग्रेस पक्षाध्यक्षपद निवडणुकीसाठी अहमदनगर जिल्ह्यात अवघे १७ मतदार

सर्वाधिक पाच मतदार संगमनेरमध्ये
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar14/10/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अहमदनगर | महाराष्ट्र संवाद न्यूज

एकीकडे चेंबूर पोट निवडणुकीचा विषय राज्यभर चर्चिला जात आहे. तर दुसरीकडे येत्या १७ ऑक्टोबरला होणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. अहमदनगर जिल्ह्यात या निवडणुकीसाठी सतरा मतदार पात्र असून त्यापैकी सर्वाधिक पाच मतदार संगमनेरमधील आहे.

तब्बल २२ वर्षांनी काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे आणि शशी थरूर यांच्यात चुरशीची लढत होत असून या निवडणुकीपासून गांधी परिवार प्रथमतः दूर राहिला आहे. अध्यक्षपदाचे प्रबळ दावेदार समजले जाणारे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी अचानकपणे निवडणूक रिंगणातून माघार घेतल्याने खर्गे आणि थरूर यांच्यात सरळ लढत होत आहे. यामुळे यावेळी काँग्रेसला बिगर गांधी घराण्याचा अध्यक्ष मिळेल.

अध्यक्षपदासाठी निवडणूक अंतिम टप्प्यात आली असली तरी खासदार राहुल गांधी देशभर भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने पदभ्रमंती करत आहे. त्यांच्या यात्रेला नागरिकांचा मिळणारा पाठिंबा लक्षात घेता विरोधी भाजपमध्ये निराशेचे वातावरण आहे.

१७ ऑक्टोबरला अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मुंबईत प्रदेश काँग्रेस कार्यालयात मतदान होणार आहे. त्यानंतर दिल्लीत मतमोजणी होईल. महाराष्ट्रात ५६५ प्रदेश प्रतिनिधींना मतदानाचा अधिकार आहे. यात नगर जिल्ह्यातील १७ जणांचा समावेश आहे. मतदार यादीतील ५६५ मतदारांमध्ये नगर शहरातील एक व नगर जिल्हा ग्रामीण भागातून १६ मतदार आहेत.

ग्रामीण भागातून असलेल्या मतदारांमध्ये संगमनेरातील पाच मतदारांचा समावेश आहे. यात काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ गटनेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे, युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, एकविरा फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष, कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्री थोरात आणि प्रदेश सचिव सचिन गुंजाळ यांचा समावेश आहे.

तर शेजारच्या अकोले तालुक्यातून प्रदेश प्रवक्त्या उत्कर्षा रुपवते या एकमेव मतदार, अहमदनगर शहरातून माजी शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण आणि प्रदेश सरचिटणीस विनायक देशमुख, श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे आणि प्रतिनिधी करण ससाणे, प्रदेश सरचिटणीस असलेले श्रीगोंद्याचे  हेमंत ओगले आणि राजेंद्र नागवडे, कर्जतचे असलेले नगर ग्रामीण काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके आणि उपाध्यक्ष कैलास शेवाळे, नगर तालुक्याचे माजी अध्यक्ष संपतराव म्हस्के, शिर्डीचे डॉ. एकनाथ गोंदकर आणि पारनेरचे ज्ञानदेव वाफारे यांचा मतदारांमध्ये समावेश आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 135
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- खाजगी बँकेच्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी सतत फोन करून धमकावणे, घरी येऊन…

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.