Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » जेव्हा महसूल मंत्री विखे पाटील नगर जिल्ह्यात वाळू उपसा करणाऱ्या बोटी पकडतात
प्रशासन

जेव्हा महसूल मंत्री विखे पाटील नगर जिल्ह्यात वाळू उपसा करणाऱ्या बोटी पकडतात

महसूल, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दौऱ्या दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांसमोर घडला प्रकार
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar23/10/2022Updated:23/10/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
नेवासे तालुक्याच्या पाहणी दौऱ्यात राज्याच्या महसूलमंत्र्यांना प्रवरासंगम पासून काही अंतरावरील मंगळापूर गावात चक्क वाळू उपश्यासाठी वापरल्या जाणाऱ्या दोन लोखंडी बोटी आढळून आल्या. मंत्र्यांच्या दौऱ्यातच वाळू तस्करीचा मुद्दा समोर आल्याने संतापलेल्या विखे पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघाडणी बोटी जप्त करून गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.

अहमदनगरचे पालकमंत्री आणि राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्री पदाचा पदभार स्वीकारताच वाळूतस्करी प्रश्नी लक्ष घातले. विखे पाटील यांच्या भूमिकेमुळे वाळू तस्करांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मंत्री विखे जिल्हाधिकारी आणि अधिकाऱ्यांसह नेवासे तालुक्यातील नुकसानीची पाहणी करत होते या पाहणे दरम्यान त्यांना प्रवरा संगम पासून काही अंतरावर असलेल्या मंगळापुर येथे दोन लोखंडी बोटी दिसून आल्या त्यामुळे त्यांनी आपला ताफा थांबवत बोटी असलेल्या वस्तीवर जात जिल्हाधिकाऱ्यांसह स्थानिक अधिकाऱ्यांना विचारणा केली मात्र समाधानकारक उत्तर न मिळाल्याने संतापलेल्या विखे यांनी स्वतः माहिती घेण्यास सुरुवात केली. यामुळे अधिकाऱ्यांचं वस्तीवरील स्थानिक नागरिकांचे देखील तारांबळ उडाली असल्याचे दिसून आले.

वाळू उपसा करण्यासाठी या बोटीचा वापर होत असल्याचे मंत्री विखे यांच्या लक्षात आल्याने त्यांनी अधिकाऱ्यांनी यापूर्वीच संबंधित बोटी जप्त का केल्या नाही अशी विचारणा केली. यावर निरुत्तर असलेल्या अधिकाऱ्यांकडे कोणतेही उत्तर नव्हते. त्यामुळे त्यांनी तहसीलदार आणि प्रांत अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले. तसेच दोन्ही बोटी जप्त करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. स्थानिक नागरिकांना विचारणा केली असता त्यांनी देखील माहिती देण्यास टाळाटाळ केल्याने ज्यांची वस्ती आहे त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्याच्या सूचना पोलीस निरीक्षकांना दिल्या.

मंत्र्याचा रूद्र अवतार पाहून वस्तीवरील रहीवाशी आमच्या बोटी नसल्याचे सांगू लागले. तुमच्या बोटी नाहीतर तुम्ही लावू कशा दिल्या. या प्रश्नांनंतर या रहीवाशांपैकी एका तरुणाने पुढे येवून नावे सांगायला सुरूवात केली. परंतू नावे सांगताना त्याचीही भंबेरी उडाली. पोलीसांनी काही नावे घेवून या तरुणाचा मोबाईल जप्त करून त्याला पुढील माहीतासाठी पोलीस स्टेशनला बोलावून घेतले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 144
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

जिल्हा पोलीस दलात फेरबदल, संगमनेर शहर, घारगाव पोलीस निरीक्षकांच्या बदल्या; आर्थिक गुन्हे शाखेला मिळाले नवे पोलीस निरीक्षक, वादग्रस्त एलसीबीत बदल नाही

13/08/2024

काम झाले तर रस्ता वाहतुकीला सुरू करण्याची मागणी

12/08/2024

अहमदनगर जिल्ह्यात १९ ऑगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश, यासाठी असेल बंदी

09/08/2024
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

By Annant Ppangarkar16/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहराच्या पायाभूत सुविधा विकासाला चालना देण्यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांच्या…

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.