सोमवार, १२ ऑगस्ट
संगमनेर शहरालगत असलेल्या म्हाळुंगी नदीवरील राजापूर गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या सिमेंट काँक्रीट करण्याचे काम पूर्ण होऊन पंधरा-वीस दिवसांचा अवधी उलटला आहे. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीला पूर्ववत सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.
रस्ता वाहतुकीसाठी बंद असल्याने शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांचे मोठे हाल होत आहे. दूरच्या असलेल्या पर्यायी रस्त्याचा त्यांना वापर करावा लागत आहे. संगमनेर गावठाणातील शाळेतील मुलांना जायला-यायला त्रास होत असून मेडिकव्हर हॉस्पिटल पासून ये-जा करावी लागत आहे. या परिसरातील नागरिकांना देखील त्रास होत आहे.
सदरचा रस्ता हा संगमनेर (संग्रामनगर)-ढोलेवाडी-राजापूरला जोडला गेलेल्या ब्रिजचा असल्याने व त्याचे काम पूर्णत्वास गेल्याने संबंधितांनी याकडे लक्ष घालत हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी केली जात आहे.


