Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमध्ये ईदनिमित्त काळ्या फिती बांधून सामूहिक नमाज पठण
धार्मिक

संगमनेरमध्ये ईदनिमित्त काळ्या फिती बांधून सामूहिक नमाज पठण

द्वेष पसरवणारे लोक कोणत्याही धर्माचे किंवा जातीचे नसतात. त्यांचा उद्देश फक्त समाजात दंगल घडवणे आणि तेढ निर्माण करणे हा असतो
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar31/03/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, दि. ३१ मार्च – प्रतिनिधी

आज रमजान ईदच्या निमित्ताने संगमनेर येथील ईदगाह मैदानावर मुस्लिम धर्मगुरु अब्दुल रकीब अब्दुल वहाब पिरजादे यांच्या मार्गदर्शनाखाली सामूहिक नमाज पठण करण्यात आले. यावेळी मुस्लिम बांधवांनी वक्फ बोर्डाविरोधात केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचा निषेध म्हणून हाताला काळ्या फिती बांधून नमाज पठण केले.

नमाज पठणानंतर उपस्थित मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आणि स्थानिक प्रशासनाचे आभार मानले. या सामूहिक नमाज पठणाला संगमनेर तालुक्यातील अनेक मुस्लिम बांधव उपस्थित होते.

दरम्यान काळ्या फिती लावून करण्यात आलेल्या नमाज पठणाविषयी विचारणा केली असता धर्मगुरु पिरजादे म्हणाले, “केंद्र सरकारने वक्फ बोर्डाविरोधात घेतलेला कायदा मुस्लिम समाजाच्या हितासाठी धोकादायक आहे. या कायद्यामुळे मुस्लिम समाजाला नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. त्यामुळे आम्ही काळ्या फिती बांधून निषेध व्यक्त केला आहे.”

काही दिवसांपूर्वीच आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुस्लिम समाजाच्या भावना व्यक्त करणारे पत्र पाठवले आहे. ‘सौगात ए मोदी’ या उपक्रमाचे आम्ही स्वागत करतो. मात्र समाजात द्वेष पसरवणाऱ्या समाजकंटकांवर वेळीच कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे. द्वेष पसरवणारे लोक कोणत्याही धर्माचे किंवा जातीचे नसतात. त्यांचा उद्देश फक्त समाजात दंगल घडवणे आणि तेढ निर्माण करणे हा असतो, असे सांगत धर्मगुरु पिरजादे यांनी पंतप्रधान मोदींना समाजकंटकांवर वेळीच कारवाई करण्याचे आवाहन केले. “जर पंतप्रधान मोदींनी अशा समाजकंटकांवर वेळीच कारवाई केली, तर तीच आमच्यासाठी ईदची खरी भेट असेल,” असे ते म्हणाले.

पिरजादे सय्यद रकीब सय्यद वहाब कादरी, फकीम पीरजादे दिलमिर पीरजादे, मन्नान पीरजादे, अजर पीरजादे, जामील पीरजादे, कासिफ खान, हैदर जहागीरदार, बख्तीयार सय्यद, काशाना सय्यद, शाहरुख शेख, जमीर शेख, शौकत पठाण, वसिल सय्यद, फैसल सय्यद आदींसह मुस्लिम समाजातील समाज बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,048
काळ्या फिती संगमनेर सामूहिक नमाज पठण
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

नेपाळमधील महाप्रलयात संगमनेरचे ४५ पर्यटक सुखरूप; उंच ठिकाणावर असल्याने टळला मोठा अनर्थ, आज लुंबिनीतून निघून उद्या भारतात परतणार!

28/08/2026

अश्विनाथ गड हे सामाजिक एकतेचे प्रतीक : माजी मंत्री बाळासाहेब थोरात

27/08/2026

संगमनेरचा ईद ए मिलाद जुलूस शांततेत पार; आयोजक, नागरिक आणि पोलीस प्रशासनाचे कौतुक!

27/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

By Annant Ppangarkar01/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  (विशेष प्रतिनिधी): संगमनेर शहरातील खांडेश्वर मंदिरात दर्शनासाठी आलेल्या एका…

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026

आज मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

01/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.