Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

रविवार विशेष लेख — निवडणूक आयोग: गेंडा आणि गेंड्याची कातडी!

18/10/2026

रविवार, १८ ऑक्टोबर —- वाचा तुमचे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

18/10/2026

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर तालुका व शहर काँग्रेसच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर; अजय फटांगरे, सोमेश्वर दिवटे आणि अमोल शेलकर यांच्यावर मोठी जबाबदारी
यश / निवड / पुरस्कार

संगमनेर तालुका व शहर काँग्रेसच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर; अजय फटांगरे, सोमेश्वर दिवटे आणि अमोल शेलकर यांच्यावर मोठी जबाबदारी

पक्षाचा लढाऊ चेहरा म्हणून ओळखले जाणारे अमोल भारत शेलकर यांची संगमनेर तालुका काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar18/07/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
संगमनेर:
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ‘संघटन सृजन अभियान’ अंतर्गत संगमनेर तालुका आणि शहर काँग्रेस कमिटीच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत. पक्षाने नव्या आणि जुन्या फळीचा मेळ घालत आगामी काळासाठी आपली नवी टीम मैदानात उतरवली आहे. या नव्या नियुक्त्यांनुसार, संगमनेर तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाची महत्त्वाची जबाबदारी अजय नारायण फटांगरे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. तर, शहराध्यक्ष म्हणून सोमेश्वर सूर्यभान दिवटे यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवत त्यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे. याचसोबत पक्षाचा लढाऊ चेहरा म्हणून ओळखले जाणारे अमोल भारत शेलकर यांची संगमनेर तालुका काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मान्यतेने, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष ॲड. गणेश पाटील यांनी अधिकृतपणे या नियुक्त्यांची घोषणा केली आहे. प्रदेश काँग्रेसने राबवलेल्या संघटन सृजन अभियानांतर्गत राज्यभरात निरीक्षकांमार्फत स्थानिक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांशी सखोल संवाद साधला होता. या संवादातून आणि मिळालेल्या शिफारशींचा अभ्यास करूनच या निवडी निश्चित करण्यात आल्या आहेत.
नवनियुक्त पदाधिकारी हे पक्षाशी दीर्घकाळापासून जोडलेले आहेत. तालुकाध्यक्ष अजय फटांगरे यांनी युवक काँग्रेसपासून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली असून, त्यांनी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्षपद आणि जिल्हा परिषदेचे सभापतीपद यशस्वीपणे सांभाळले आहे. शहराध्यक्ष पदावर कायम राहिलेले सोमेश्वर दिवटे हे देखील युवक काँग्रेसच्या माध्यमातून सक्रिय झाले असून, सध्या ते नगरसेवक म्हणून शहरातील संघटनात्मक कामात आघाडीवर आहेत. तर कार्याध्यक्ष अमोल शेलकर हे २०१० पासून पक्षात कार्यरत असून, विविध जनआंदोलनांमधील त्यांच्या सक्रिय सहभागामुळे पक्षाने एका नव्या दमाच्या तरुण नेतृत्वाला संधी दिली आहे.
या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात यांनी अभिनंदन केले आहे. काँग्रेसचा शाश्वत, लोकशाहीवादी आणि राज्यघटना वाचवणारा विचार जनसामान्यांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी ही नवी टीम अत्यंत जोमाने कार्य करेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
या निवडींबद्दल माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, युवक काँग्रेसच्या नेत्या डॉ. जयश्रीताई थोरात, पांडुरंग पाटील घुले, रणजीतसिंह देशमुख यांच्यासह काँग्रेसच्या विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,592
अजय फटांगरे अमोल शेलकर काँग्रेस पदाधिकारी निवडी संघटन सृजन अभियान सोमेश्वर दिवटे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026

मजबुरी का नाम मोदी, मजबुती का नाम महात्मा गांधी!

02/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
रविवार विशेष

रविवार विशेष लेख — निवडणूक आयोग: गेंडा आणि गेंड्याची कातडी!

By Annant Ppangarkar18/10/20260

प्रवीण पुरो- भारतीय संविधानाने घटनात्मक अधिकार दिलेल्या कोणत्याही संस्थेवर पक्षपातीपणाचा वा राजकीय वरदहस्ताचा आरोप झाला,…

रविवार, १८ ऑक्टोबर —- वाचा तुमचे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

18/10/2026

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.