Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » जिल्हा पोलीस दलात फेरबदल, संगमनेर शहर, घारगाव पोलीस निरीक्षकांच्या बदल्या; आर्थिक गुन्हे शाखेला मिळाले नवे पोलीस निरीक्षक, वादग्रस्त एलसीबीत बदल नाही
प्रशासन

जिल्हा पोलीस दलात फेरबदल, संगमनेर शहर, घारगाव पोलीस निरीक्षकांच्या बदल्या; आर्थिक गुन्हे शाखेला मिळाले नवे पोलीस निरीक्षक, वादग्रस्त एलसीबीत बदल नाही

वाचा कोणाच्या कोठे झाल्या बदल्या
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar13/08/2024Updated:13/08/2024No Comments5 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मंगळवार, १३ ऑगस्ट

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्हा पोलीस दलात मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहे. सोळा पोलीस निरीक्षकांसह अकरा सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि दहा पोलीस उपनिरीक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी सोमवारी संध्याकाळी बदल्यांचे हे आदेश काढले.

नव्या बदल्यांमध्ये आर्थिक गुन्हे शाखेला नवे पोलीस निरीक्षक मिळाले असून या शाखेचा पदभार आता नितीन चव्हाण यांच्याकडे सोपविला जाणार आहे. तर जिल्ह्यात वादग्रस्त ठरलेल्या आणि अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांच्या उपोषणानंतर चर्चेत आलेल्या एलसीबीमध्ये (स्थानिक गुन्हे शाखा) मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही. फेरबदलांमध्ये या शाखेत बदल होण्याची चिन्हे होती, मात्र या शाखेचा कार्यभार अद्यापही पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्याकडेच आहे. तर नव्या फेरबदलात सायबर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

संगमनेर शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांची बदली कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून शहर पोलीस ठाण्यात आता जिल्हा विशेष शाखेतून बदलून येणारे पोलीस निरीक्षक बापूसाहेब शांताराम महाजन यांची नियुक्ती करण्यात आली असल्याने महाजन आता शहर पोलीस ठाण्याचे नवे पोलीस निरीक्षक असतील. याशिवाय घारगाव पोलीस ठाण्यात वादग्रस्त ठरलेले पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांची बदली जिल्हा विशेष शाखेत करण्यात आली असून त्यांच्या जागी शेवगाव पोलीस येथून पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे पदभार घेतील.

वाचा जिल्हा पोलीस दलातील नवे फेरबदल…

  • पोलीस निरीक्षक समाधान चंद्रभान नागरे यांची बदली अहमदनगर नियंत्रण कक्षातून शेवगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
  • पोलीस निरीक्षक दिगंबर हरी भदाणे यांची बदली शेवगाव पोलीस ठाण्यातून घारगाव (संगमनेर) पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
  • घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष बाबुराव खेडकर यांची बदली जिल्हा विशेष शाखेत करण्यात आली आहे.
  • संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान हरिभाऊ मथुरे यांची बदली कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
  • अहमदनगर जिल्हा विशेष शाखेत कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक बापूसाहेब शांताराम महाजन संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे नवे पोलीस निरीक्षक असतील.
  • भरोसा सेलचे पोलीस निरीक्षक दौलत शिवराम जाधव जिल्हा विशेष शाखेत पोलीस निरीक्षक म्हणून काम पाहतील.
  • कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप बाळासाहेब देशमुख यांची बदली शिर्डीच्या वाहतूक नियंत्रण शाखेत करण्यात आली आहे.
  • शिर्डी वाहतूक नियंत्रण शाखेतील पोलीस निरीक्षक राजेंद्र जगन्नाथ इंगळे यांची बदली ए. एच. टी. यु. अहमदनगर या शाखेकडे करण्यात आली आहे.
  • तर ए. एच. टी. यु. शाखेतील पोलीस निरीक्षक नंदकुमार विष्णू दुधाळ यांची बदली पोलीस अधीक्षकांचे वाचक पोलीस निरीक्षक म्हणून करण्यात आली आहे.
  • शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मोरेश्वर लक्ष्मण पेंदाम यांची बदली सायबर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
  • जिल्हा विशेष शाखेतील पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांची बदली अहमदनगर शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडे करण्यात आली.
  • पोलीस अधीक्षकांचे वाचक पोलीस निरीक्षक असलेले पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांच्याकडे आता अहमदनगरच्या आर्थिक गुन्हे शाखेचा कार्यभार देण्यात आला आहे.
  • नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक मोहन बोरसे अकोले पोलीस ठाण्याचे नवे पोलीस निरीक्षक असतील.
  • नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक किरण शिंदे श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे नवे पोलीस निरीक्षक असतील.
  • अकोले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुलाबराव राजाराम पाटील यांची बदली नियंत्रण कक्षात करण्यात आली आहे.
  • श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांची देखील बदली नियंत्रण कक्षात करण्यात आली आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या पुढील प्रमाणे…

  • पाथर्डी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांची बदली भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
  • भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यातील सहाय्य पोलीस निरीक्षक योगेश राजगुरू यांची बदली नियंत्रण कक्षात करण्यात आली आहे.
  • सोनई पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष परशराम शेळके यांची बदली कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
  • कर्जत पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय श्रीकृष्ण माळी यांची बदली सोनई पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
  • नियंत्रण कक्षातील सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सुरेश सपकाळे यांची बदली अहमदनगरच्या अर्ज शाखेकडे करण्यात आली आहे.
  • जिल्ह्यात नव्याने आलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक रमीज हजरत मुलाणी यांना कर्जत पोलीस ठाण्यात नियुक्ती देण्यात आली.
  • जळगाव येथून बदलून आलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश निवृत्ती गोंटला यांना जामखेड पोलीस ठाण्यात नियुक्ती देण्यात आली.
  • नंदुरबार येथून बदलून आलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे यांची बदली उपविभागीय पोलीस अधीक्षक शिर्डी यांच्याकडे वाचक म्हणून करण्यात आली आहे.
  • नगरच्या टीएमसीत कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक पवार यांची बदली नगरच्या अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे बदली करण्यात आली.
  • शिर्डी पोलीस ठाण्यातून सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप हजारे यांची बदली शिर्डीच्या वाहतूक नियंत्रण शाखेकडे करण्यात आली आहे.
  • नियंत्रण कक्षात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पेश आसाराम दाभाडे यांची बदली संगमनेर पोलीस उपाधीक्षक कार्यालयात करण्यात आली आहे.

पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या पुढील प्रमाणे…

  • भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला पोलीस उपनिरीक्षक शुभांगी मोरे यांची बदली लोणी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
  • लोणी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले योगेश बाबासाहेब शिंदे यांची बदली भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात करण्यात आली.
  • नियंत्रण कक्षात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक तुळशीराम रामचंद्र पवार यांची बदली बेलवंडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
  • ए. एच. टी. यु. शाखेतील पोलीस उपनिरीक्षक प्रियंका दादासाहेब आठरे यांची बदली नगरच्या भरोसा सेलमध्ये करण्यात आली आहे.
  • नक्षल सेलमध्ये नियुक्ती असलेले मात्र संगमनेर शहर पोलीस, पोलीस उपाधीक्षक कार्यालय, घारगाव पोलीस ठाणे येथेच कार्यरत असलेले निवांत जाधव आता शनिशिंगणापूर मंदिरामध्ये व्हीआयपींचा प्रोटोकॉल सांभाळतील.
  • नियंत्रण कक्षातील पोलीस उपनिरीक्षक उमेश पतंगे यांची बदली टी.एम.सी.मध्ये करण्यात आली आहे.
  • नाशिक येथून बदलून आलेले पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे यांना नगरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात नियुक्ती देण्यात आली आहे.
  • नाशिक येथून बदलून आलेले उपनिरीक्षक दीपक शेषराव पाठक यांना शेवगाव येथे पोलीस उपाधीक्षकांच्या कार्यालयात नियुक्ती देण्यात आली आहे.
  • नाशिक येथून बदलून आलेले पोलीस उपनिरीक्षक सतीश डौले यांना श्रीरामपूर पोलीस उपाधीक्षकांच्या कार्यालयात नियुक्ती देण्यात आली.
  • नाशिक येथून बदलून आलेले उपनिरीक्षक योगेश चाहेर यांना सायबर पोलीस ठाण्यात नियुक्ती देण्यात आली.

अप्पर पोलीस अधीक्षकांकडे वाचक म्हणून बदली करण्यात आलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक पवार यांच्याकडे पुढील आदेश होईपर्यंत प्रभारी अधिकारी म्हणून दहशतवाद विरोधी शाखेचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. टी एम सी शाखेकडे बदली झालेले पोलीस उपनिरीक्षक उमेश पतंगे यांच्याकडे प्रभारी अधिकारी म्हणून बीडीएस या पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. जिल्हा विशेष शाखेत नियुक्ती झालेले पोलीस उपनिरीक्षक महेश शिंदे यांच्याकडे प्रभारी अधिकारी म्हणून नक्षल सेलचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,787
पोलीस बदल्या
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

धुळ्यात ४० हजार रुपयांची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक साईनाथ तळेकर आणि पोलीस शिपाई रंगेहात जाळ्यात; तळेकर काही काळ संगमनेर शहर पोलीस ठाण्यात होते कार्यरत

04/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शिक्षण

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

By Annant Ppangarkar13/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- सण-उत्सवांमध्ये वाढणारा डीजेचा कर्णकर्कश आवाज आणि लेझर लाईट्सचा अतिवापर मानवी आरोग्यासाठी…

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

मंगळवार, १३ ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमची रास आज काय सांगते

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.