Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आदेश न पाळणाऱ्या तलाठ्यावर शिस्तभंगाची कारवाई करा; प्रांताधिकाऱ्यांचे तहसीलदारांना आदेश
प्रशासन

आदेश न पाळणाऱ्या तलाठ्यावर शिस्तभंगाची कारवाई करा; प्रांताधिकाऱ्यांचे तहसीलदारांना आदेश

महसूल मंत्र्यांच्या आदेशाची पायमल्ली करत वाळू तस्करीला पाठीशी घालणाऱ्या तलाठी, कोतवाल, तस्करी करणाऱ्या संबधीत खडी क्रेशन मालक-चालकावर कारवाई करा : साहेबराव वलवे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar29/10/2022Updated:29/10/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

वाळू तस्करी करणारा डंपर पकडल्यानंतर त्याची माहिती मिळूनदेखील कारवाई न करता उलट तस्करांबरोबर संधान साधणाऱ्या धांदरफळचे तलाठी मुळे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जनसेवा समता युवक संघटनेचे अध्यक्ष साहेबराव वलवे यांनी करताच प्रांताधिकाऱ्यांनी तातडीने वलवे यांच्या तक्रारीची दखल घेत तहसीलदार अमोल निकम यांना तलाठी मुळे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश दिले आहे.

प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांना यासंदर्भात वलवे यांनी शुक्रवारी एक निवेदन दिले असून त्यात त्यांनी म्हटले की, वलवे गुरुवारी सायंकाळी त्यांच्या गावी जात होते. यावेळी ६ वाजून ४० मिनीटांनी त्यांना भोकनळ वस्तीपासून धांदरफळकडे वाळू तस्करी करणारा एक डंपर जातांना दिसला. त्यांनी याची माहिती प्रांताधिकारी डॉ. मंगरुळे यांना कळविली होती.

त्यानंतर वलवे यांना तलाठी मुळे यांचा फोन आला. त्यांनी वलवे यांना सांगितले की, मी घुलेवाडी फाट्यावर असून तुम्ही संबधीत डंपर थांबवून ठेवा, मी पोहोचतो. मात्र रात्री साडेनऊ वाजेपर्यत कुणीही कारवाईसाठी वलवे यांनी सांगितलेल्या ठिकाणी पोहोचले नाही. संबधीत डंपर चालकाकडे मुदत संपलेला गौणखनिज परवाना असल्याचे वलवे यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे वलवे यांनी तशी कल्पना तलाठी मुळे यांना दिली होती. मात्र मुळे यांनी नंतर फोन बंद करुन उलट वाळू तस्करांबरोबर संधान साधले व त्यांना मदत होईल, अशी भुमिका घेतल्याचे लक्षात आल्यावर वलवे यांनी तशी कल्पना प्रांताधिकारी डॉ. मंगरुळे यांना दिली.

डंपर थांबवून ठेवण्याचा प्रयत्न केला असता चालकाने डंपर वलवे यांच्या अंगावर घालत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांच्यासोबत असलेल्या २०-२५ लोकांवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा. कामगार तलाठी मुळे यांना निलंबीत करुन त्यांनी अवैध मार्गाने कमविलेल्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी निवेदनाद्वारे वलवे यांनी केली होती.

प्रांताधिकाऱ्यांनी तहसिलदारांना दिले ‘हे’ आदेश

साहेबराव वलवे यांनी व्हॉटस्अपद्वारे तक्रार केली. २७ ऑक्टोंबरला सायंकाळी ६.४१ वाजता निमज येथे वॉश सॅन्डची गाडी अडविलेबाबत कळविले होते. वलवे यांचा संदेश प्राप्त झाल्यानंतर तलाठी मुळे यांना कळवूनही ते घटनास्थळी पोहोचले नाही. वारंवार सांगुनही तलाठी घटनास्थळी पोहोचले नसल्याच्या तक्रारीत तथ्य दिसून येते त्यामुळे सदरच्या घटनेची चौकशी करुन तलाठी यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही आपल्या स्तरावर करण्यात यावी. कारवाईचा अहवाल प्रांताधिकाऱ्यांकडे सादर करावा तसेच गौणखनिज परवान्याची वैधता तपासून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी तहसिलदार अमोल निकम यांना दिले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 170
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

जिल्हा पोलीस दलात फेरबदल, संगमनेर शहर, घारगाव पोलीस निरीक्षकांच्या बदल्या; आर्थिक गुन्हे शाखेला मिळाले नवे पोलीस निरीक्षक, वादग्रस्त एलसीबीत बदल नाही

13/08/2024

काम झाले तर रस्ता वाहतुकीला सुरू करण्याची मागणी

12/08/2024

अहमदनगर जिल्ह्यात १९ ऑगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश, यासाठी असेल बंदी

09/08/2024
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

By Annant Ppangarkar16/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहराच्या पायाभूत सुविधा विकासाला चालना देण्यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांच्या…

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.