Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » भिडे गुरुजींचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य; महिला पत्रकाराला म्हणाले, भारत माता विधवा नाही, तू आधी कुंकू लाव मग तुझ्याशी बोलतो!
महाराष्ट्र संवाद विशेष

भिडे गुरुजींचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य; महिला पत्रकाराला म्हणाले, भारत माता विधवा नाही, तू आधी कुंकू लाव मग तुझ्याशी बोलतो!

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar02/11/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

प्रश्न विचारणाऱ्या महिला पत्रकारास, “भारत माता ही विधवा नाही त्यामुळे तू आधी कुंकू लाव मगच मी तुझ्याशी बोलतो”, अशा शब्दात महिला पत्रकाराशी वादग्रस्त विधान करत संभाजी भिडे गुरुजींनी आज पुन्हा एकदा वाद ओढवून घेतला आहे.

सातत्याने वादग्रस्त विधाने करत चर्चेत राहणाऱ्या संभाजी भिडे गुरुजींनी आज पुन्हा एकदा महिला पत्रकाराशी बोलताना केलेले वादग्रस्त वक्तव्य चर्चेत आले आहे. त्यांच्या या विधानामुळे महिला वर्गातून संताप व्यक्त होत आहे.

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याकरता मंत्रालयात आले होते. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांशी झालेल्या भेटी संदर्भात संभाजी भिडे गुरुजी यांच्याशी बोलण्याकरता एक महिला पत्रकार पुढे आली. त्यांनी संभाजी भिडे यांना प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. मात्र, त्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्याआधी तू आधी कुंकू लाव, मगच तुझ्याशी बोलेन असं प्रतित्युतर संभाजी भिडे यांनी दिलं. प्रत्येक स्त्री भारतमातेस्वरुप असते. भारतामाता ही विधवा नाही. त्यामुळे तू आधी कुंकू लाव, मगच मी तुझ्याशी बोलतो, असं संभाजी भिडे म्हणाले.

महिला पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर न देता भिडे गुरुजींनी महिला पत्रकाराचा जाहीर अपमान केल्याने आश्चर्य व्यक्त होत असुन महिला वर्गातून संताप देखील व्यक्त होत आहे. दरम्यान संबंधित महिला पत्रकाराने संभाजी भिडे यांच्या या वक्तव्याचा एक ट्विट करत निषेध केला आहे.

आपल्या ट्विटमध्ये त्या म्हणाल्या, आज माझ्यासोबत घडलेला हा सगळा प्रकार… आपण एखाद्याचं वय बघून त्याला मान देतो, मात्र समोरची व्यक्ती देखील त्या पात्रतेची असावी लागते. मी टिकली लावावी – लावू नये किंवा कधी लावावी हा माझा अधिकार आहे. आपण लोकशाही असलेल्या देशात राहतोय.

दरम्यान भिडे यांनी केलेल्या वक्तव्याची दखल महिला आयोगाकडून घेण्यात आली आहे. आपल्या भूमिके संदर्भात तात्काळ खुलासा करण्याची नोटीस त्यांना बजावण्यात आली आहे. महिला पत्रकाराने तिच्या कपाळावर टिकली लावली नाही म्हणून आपण प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. स्त्रीचा दर्जा तिच्या कर्तुत्वाने सिद्ध होत असतो. आपले वक्तव्य स्त्री सन्मानाला आणि सामाजिक दर्जाला ठेच पोहोचविणारे आहे, असे आयोगाने म्हटले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 113
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

By Annant Ppangarkar16/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहराच्या पायाभूत सुविधा विकासाला चालना देण्यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांच्या…

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.