Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026

घारगाव बहुचर्चित खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! मुख्य आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय… न्यायालयीन युक्तिवादात काय घडले वाचा सविस्तर

16/10/2026

शुक्रवार १६ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » हिमाचलमध्ये 26 नेत्यांनी काँग्रेसचा ‘हात’ सोडत भाजपचे ‘कमळ’ घेतले हाती
राजकारण

हिमाचलमध्ये 26 नेत्यांनी काँग्रेसचा ‘हात’ सोडत भाजपचे ‘कमळ’ घेतले हाती

विधानसभा निवडणुकीआधीच काँग्रेसला दिला धक्का
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar08/11/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

हिमाचलमधील काँग्रेसचे माजी सरचिटणीस धर्मपाल ठाकूर यांच्यासह काँग्रेसच्या सहवीस नेत्यांनी काँग्रेसची साथ सोडली आहे. या सर्वांनी मंगळवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश करत भाजपचे कमळ हाती घेतले आहे. निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या घडामोडीमुळे हिमाचलमध्ये काँग्रेसला निवडणुकीपूर्वीच मोठा झटका बसला आहे.

हिमाचल प्रदेशमध्ये निवडणुका जाहीर झालेल्या असून येत्या चार दिवसात म्हणजेच 12 नोव्हेंबरला विधानसभा निवडणूक होत आहे. तत्पूर्वीच या नेत्यांनी ऐन निवडणुकीच्या माहोलमध्ये मुख्यमंत्री जयराम ठाकूर आणि भाजपचे राज्य निवडणूक प्रभारी सुधन सिंह यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश केला आहे. यावेळी सिमला येथील भाजप उमेदवार संजय सुद हे देखील उपस्थित होते. निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात तब्बल 26 नेते काँग्रेस मधून बाहेर पडल्याने काँग्रेस पिछाडीवर गेली आहे.

काँग्रेस सोडून भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये काँग्रेसचे माजी सरचिटणीस धर्मपाल ठाकूर, माजी सचिव आकाश सैनी, माजी नगरसेवक राजन ठाकूर, माजी जिल्हा उपाध्यक्ष अमित मेहता, मेहेरसिंग कंवर, युवक काँग्रेसचे राहुल नेगी, जय माँ शक्ती सामाजिक संस्थेचे अध्यक्ष जोगिंदर ठाकूर, नरेश वर्मा, चमयाना प्रभाग सदस्य योगेंद्र सिंह, टॅक्सी युनियनचे सदस्य राकेश चौहान, इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज सिमलाचे अध्यक्ष धर्मेंद्र कुमार, वीरेंद्र शर्मा, राहुल रावत, सोनू शर्मा, अरुण कुमार, शिवम कुमार, गोपाल ठाकूर, चमन लाल, जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव देवेंद्र सिंह, महेंद्र सिंह, माजी युवक काँग्रेसचे सरचिटणीस मुनीश मंडला, बाळकृष्ण बॉबी, सुनील शर्मा, सुरेंद्र ठाकूर, संदीप समता आणि रवी यांचा समावेश आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर एवढ्या मोठ्या संख्येने काँग्रेसची साथ सोडत भाजपमध्ये या नेत्यांनी प्रवेश केल्याने हिमाचल प्रदेशमध्ये भाजपची ताकद वाढली आहे.

मुख्यमंत्री ठाकूर म्हणाले, ‘भाजपच्या ऐतिहासिक विजयासाठी काम करूया’!

भाजपमध्ये आलेल्या या सर्व काँग्रेस जणांचे हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी जोरदार स्वागत केले असून भाजपच्या ऐतिहासिक विजयासाठी एकत्र काम करूया असे ते म्हणाले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 103
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

By Annant Ppangarkar16/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील शिरसगाव धुपे येथील आदिवासी बांधवांनी आमदार अमोल खताळ यांच्या…

घारगाव बहुचर्चित खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! मुख्य आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय… न्यायालयीन युक्तिवादात काय घडले वाचा सविस्तर

16/10/2026

शुक्रवार १६ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

16/10/2026

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.