Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

17/10/2026

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » धूम्रपान करणाऱ्या 87 वर्षीय वृद्धाची कर्करोगावर मात; तीन तास सुरू होती गुंतागुंतीची शस्त्रक्रिया
आरोग्य

धूम्रपान करणाऱ्या 87 वर्षीय वृद्धाची कर्करोगावर मात; तीन तास सुरू होती गुंतागुंतीची शस्त्रक्रिया

एसएमबीटी कॅन्सर इन्स्टिट्यूट ठरतेय रुग्णांसाठी वरदान
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar12/11/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

८७ वर्षीय कर्करोगग्रस्त वृद्ध रुग्णावर गुंतागुंतीची शस्रक्रिया करण्यात एसएमबीटीच्या कर्करोग तज्ञांना यश आले आहे. विशेष म्हणजे शस्त्रक्रियेच्या दुसऱ्याच दिवशी या रुग्णाने फेरफटका मारत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.

सकारात्मकता, दुर्दम्य इच्छाशक्ती आणि कुटुंबियांची साथ असेल तर कुठल्याही आजारावर मात करणे शक्य होते, असे म्हटले जाते. याच उक्तीचा प्रत्यय नाशिकमधील एसएमबीटी कॅन्सर इन्सिट्यूटमध्ये आला.

धूम्रपान करणाऱ्या कोपरगाव येथील ८७ वर्षीय अजीज मन्सुरी यांना गेल्या काही दिवसांपसून खोकल्याचा त्रास होता. अनेक ठिकाणी त्यांनी वैद्यकीय उपचार केले मात्र निदान झाले नाही. काही दिवसांनी त्यांच्या खोकल्यातून रक्तदेखील पडू लागल्याने मन्सुरी यांच्या कुटुंबीयांनी त्यांना नाशिकमधील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र रुग्णाची स्थिती लक्षात घेता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णाला एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यास सांगितले.

एसएमबीटी मधील तपासणीत मन्सुरी यांच्या डाव्या बाजूच्या फुफ्फुसामध्ये कॅन्सरची गाठ निदर्शनास आली. आयुष्यातील अखेरचे दिवस अत्यंत आनंदायी जीवन जगत असतानाच अचानक कॅन्सरची फुप्पुसात गाठ आढळणे त्यांच्या कुटुंबियांसाठी मोठा धक्का होता. त्यातच त्यांची आर्थिक परिस्थिती बेताचीत असल्यामुळे खर्च पेलवेल की नाही याचीही त्यांना धास्ती होती.

मन्सुरी यांच्या कुटुंबियांना धीर देत त्यांच्यावर लवकरात लवकर उपचार कसे केले जातील, यासाठी येथील हॉस्पिटल प्रशासनाने प्रयत्न केले. रुग्णाला एका फुफ्फुसावर ठेवून दुसरे फुफ्फुस पूर्णपणे बंद करावे लागणार होते. वय आणि शस्रक्रीयेची जागा यामुळे एसएमबीटी हॉस्पीटलमधील डॉक्टरांपुढे मोठे आव्हान असतानाही अतिशय अभ्यासपूर्ण आणि कौशल्याने तब्बल तीन तास त्यांच्यावर यशस्वी शस्रक्रिया करण्यात आली.

१५ दिवसांनी मन्सुरी यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. यावेळी त्यांनी हॉस्पिटल प्रशासनाचे आभार मानत एसएमबीटीच्या डॉक्टरांनी मला पुनर्जन्म दिल्याचे सांगितले. धुम्रपान हे फुफ्फुसाचा कर्करोग होण्यामागील महत्वाचे कारण आहे. फुफ्फुसाच्या कर्करोगामुळे जवळपास ८० टक्के मृत्यू होतात असे येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

कॅन्सरबद्दल फारसे काही माहिती नव्हते. दोन महिन्यांपूर्वी काकांना कॅन्सर असल्याचे समजले. नाशिकला चेकअप करून एसएमबीटीत दाखल केले. परिस्थिती हलाखीची होती मात्र योजनेत बसल्यामुळे संपूर्ण उपचार मोफत झाला. रुग्णालयातील डॉक्टरांसह सर्वांनीच खूप चांगली साथ आम्हाला दिली त्याबद्दल सर्वांचे आभार.

अझहरुद्दीन मन्सुरी, रुग्णाचे नातेवाईक

रुग्णाचे वय आणि शस्रक्रियेची जागा बघता मोठी रिस्क होती. रुग्णावर थोरॅसिक सर्जरी व लोबेक्टॉमी सर्जरी करून रुग्णाला एका फुफ्फुसावर ठेवून दुसरे फुफ्फुस पूर्णपणे बंद करावे लागले. दुर्दम्य इच्छाशक्ती, सकारात्मकता, उपचारांना दिलेला प्रतिसाद यामुळे रुग्णावर तीन तासांची शस्रक्रिया यशस्वी झाली. दुसऱ्याच दिवशी रुग्णाने वार्डमध्ये फेरफटका मारला.

डॉ. अल्ताफ सय्यद, कर्करोग तज्ञ, एसएमबीटी कॅन्सर इन्सिट्यूट.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 131
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

19/07/2026

मध्यरात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रुग्णालयात दाखल; आगामी दौरे आणि कार्यक्रम तूर्तास पुढे ढकलले

04/07/2026

केमिकलयुक्त दूषित पाण्यामुळे बदापूर येथील शेती धोक्यात; विहिरींचे पाणी दूषित, तलावातील मासे मृत

11/06/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धांदरफळ बुद्रुक गावाच्या शिवारातील बाजारतळावर नवरात्रोत्सवानिमित्ताने…

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

17/10/2026

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026

शनिवार, १७ ऑक्टोंबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.