Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » चांगले काम करणाऱ्याचा सन्मान आणि आवश्यक तेथे पदाधिकाऱ्यांमध्ये बदल करणार
राजकारण

चांगले काम करणाऱ्याचा सन्मान आणि आवश्यक तेथे पदाधिकाऱ्यांमध्ये बदल करणार

युवा सेनेचे शिर्डी लोकसभा विस्तारक मितेश साटम यांची संगमनेरमध्ये ग्वाही
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar13/11/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषद निवडणुकीसाठी युवा सैनिकांनी सज्ज राहावे

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

युवा सेनेच्या कामाला गती येण्यासाठी जेथे पदाधिकाऱ्यांमध्ये बदल आवश्यक आहे तेथे, निश्चित बदल केला जाईल. मात्र ज्याचे काम चांगले आहे त्याचा देखील सन्मान केला जाणार असल्याचे प्रतिपादन युवा सेनेचे शिर्डी लोकसभा विस्तारक मितेश साटम यांनी केले.

साटम यांच्या उपस्थितीत शनिवारी संगमनेरच्या शासकीय विश्रामगृहामध्ये युवा सेनेची बैठक पार पडली. यावेळी युवा सेनेचे जिल्हा प्रमुख अमित चव्हाण, शिवसेना उपजिल्हाप्रमुख मुजीब शेख, शिवसेना तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे, शिवसेना शहर प्रमुख अमर कतारी, कोपरगाव येथील युवा नेते भैय्या तिवारी, पठार भागातील ज्येष्ठ शिवसैनिक रंगनाथ फटांगरे, माजी शहर प्रमुख संजय फड, उपशहर प्रमुख इम्तियाज शेख, अपंग सहाय्य सेनेचे जिल्हाप्रमुख जालिंदर लहामगे, युवा सेनेचे शहर प्रमुख अमोल डुकरे, युवा सेना पठारबाग प्रमुख योगेश खेमनर, युवा सेना तालुकाप्रमुख राजू सातपुते, अजित मोमीन, फैसल सय्यद, शोएब शेख, गोविंद नागरे, विधानसभा प्रमुख अक्षय बिल्लाडे, लक्ष्मण सोन्नर, अक्षय गुंजाळ, पप्पू कानकाटे, सागर भागवत, दानिश पारवे, संभव लोढा, वैभव अभंग, सिद्धेश पवार, परवेझ शेख, अक्षय गाडे यांच्यासह शिवसेना आणि युवा सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

शिवसेना आणि युवा सेनेचे ध्येयधोरणे स्पष्ट करत पदाधिकारी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना साटम म्हणाले, शिवसेना तळागाळात, सामान्य मतदारापर्यंत पोहोचविण्यासाठी युवा सैनिकांनी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या पाठीशी खंबीर उभे राहण्याची आवश्यकता आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक युवा सैनिकांनी काय केले पाहिजे यासंबंधी मार्गदर्शन केले.

नव्याने होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषद निवडणुकीसाठी शिवसेनेसोबत युवा सेनेने देखील सज्ज राहिले पाहिजे. हेवे-दावे युवा सैनिकांमध्ये चालणार नाही. आपण सर्वजण एक आहोत, मी देखील सामान्य शिवसैनिकच आहे. त्यामुळे सर्वांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिक म्हणून काम करणे अपेक्षित आहे. आपल्या कामातून पक्षाला बळकटी मिळणार आहे.

यावेळी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बोलताना युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे व शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहू. आपसातील मतभेद ठेवत मितेश साटम यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना व युवा सेना वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 115
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- खाजगी बँकेच्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी सतत फोन करून धमकावणे, घरी येऊन…

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.