Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026

घारगाव बहुचर्चित खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! मुख्य आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय… न्यायालयीन युक्तिवादात काय घडले वाचा सविस्तर

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » विद्यार्थ्यांना महाविद्यालयातच ‘जात प्रमाणपत्र’ मिळवून देण्यासाठी सहाय्य करणार : समिती अध्यक्ष विकास पानसरे
प्रशासन

विद्यार्थ्यांना महाविद्यालयातच ‘जात प्रमाणपत्र’ मिळवून देण्यासाठी सहाय्य करणार : समिती अध्यक्ष विकास पानसरे

महाविद्यालयांना मार्गदर्शन करण्यासाठी 'ऑनलाईन वेबीनार' चे आयोजन
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar15/11/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

११ विज्ञान व १२ विज्ञान शाखेमधील प्रवेशीत सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना ‘जात प्रमाणपत्रा’अभावी ‘जात वैधता प्रमाणपत्र’ मिळण्यात अडचणी येतात. तेव्हा ’मंडणगड पॅटर्न‘ च्या धर्तीवर अहमदनगर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती विद्यार्थ्यांना ‘जात प्रमाणपत्र’ मिळवून देण्यासाठी सहाय्य करणार आहे. यामुळे विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ऐनवेळी विद्यार्थ्याची होणारी धावपळ वाचणार आहे. अशी माहिती अहमदनगर जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी (निवड श्रेणी) विकास मारूती पानसरे यांनी आज येथे दिली.

‘मंडणगड पॅटर्न’ च्या धर्तीवर महाविद्यालयातच ”जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र” देण्याचा उपक्रमास अहमदनगर जिल्ह्यात सुरूवात करण्यात येणार आहे. यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक व संबंधित काम पाहणारे कर्मचारी यांना मार्गदर्शन करण्यासाठी ‘ऑनलाईन वेबीनार’ आज घेण्यात आला. ऑनलाईन मार्गदर्शन करतांना पानसरे बोलत होते. अहमदनगर येथील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयातून सदस्य तथा उपायुक्त अमीना शेख आणि सदस्य सचिव तथा संशोधन अधिकारी भागवत खरे सहभागी झाले होते. जिल्ह्यातील सुमारे २०० महाविद्यालयांचे प्राचार्य, कर्मचारी व प्रतिनिधींनी या ‘ऑनलाईन वेबनार’मध्ये सहभागी होऊन मार्गदर्शनाचा लाभ घेतला.

पानसरे म्हणाले, राज्याचे समाजकल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील ‘मंडणगड पॅटर्न’नुसार महाविद्यालयातच ”जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र” वितरित करण्याच्या सूचना केल्या आहेत. यानुसार अहमदनगर जिल्ह्यात काम करण्यात येणार आहे.

जात प्रमाणपत्र वितरित करण्याचे काम ‘महसूल विभाग’ करत असते. आणि त्या जात प्रमाणपत्राची पडताळणी करण्याचे काम जाती प्रमाणपत्र पडताळणी समित्या करतात. मात्र अनेक विद्यार्थ्यांकडे ‘जात प्रमाणपत्र’ उपलब्ध नसते. त्यामुळे त्यांच्या जातीची पडताळणी करणे जिकिरीचे होते. आता समाज कल्याण विभागाच्या या समित्या प्रांताधिकारी यांच्याशी संपर्क साधून मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य करणार आहेत.

श्रीमती शेख म्हणाल्या, विद्यार्थ्यांना महाविद्यालयातच ”जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र” मिळवून देण्यासाठी पुढील महिन्यापासून जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये शिबिरे घेण्यात येणार आहेत. यासाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी समन्वय अधिकारी म्हणून ‘समतादूतां’ची नेमणूक करण्यात आली आहे.

‘जात प्रमाणपत्र’ व ‘जात वैधता प्रमाणपत्र’ मिळविण्यासाठी कशा प्रकारे अर्ज करावा व त्यासाठी कोणते दस्ताऐवज जोडावेत, जाती दावा सिध्द करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे व पुरावे इत्यादीबाबत संशोधन अधिकारी भागवत खरे यांनी यावेळी मार्गदर्शन केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 265
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

जिल्हा पोलीस दलात फेरबदल, संगमनेर शहर, घारगाव पोलीस निरीक्षकांच्या बदल्या; आर्थिक गुन्हे शाखेला मिळाले नवे पोलीस निरीक्षक, वादग्रस्त एलसीबीत बदल नाही

13/08/2024

काम झाले तर रस्ता वाहतुकीला सुरू करण्याची मागणी

12/08/2024

अहमदनगर जिल्ह्यात १९ ऑगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश, यासाठी असेल बंदी

09/08/2024
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

By Annant Ppangarkar16/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अहिल्यानगरच्या युनियन अध्यापक विद्यालयातून सन १९८४ ते १९८६ च्या वर्गातून बाहेर…

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026

घारगाव बहुचर्चित खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! मुख्य आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय… न्यायालयीन युक्तिवादात काय घडले वाचा सविस्तर

16/10/2026

शुक्रवार १६ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.