Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

17/10/2026

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांकडून जिल्हा प्रशासनाची झाडाझडती; अधिकाऱ्यांना कारभार सुधारण्यासाठी दिला महिनाभराचा अवधी
प्रशासन

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांकडून जिल्हा प्रशासनाची झाडाझडती; अधिकाऱ्यांना कारभार सुधारण्यासाठी दिला महिनाभराचा अवधी

संगमनेरच्या क्रीडा संकुलातील गाळेधारकाकडे लाखो रुपयांची थकबाकी
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar20/11/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

जिल्हा नियोजन समितीच्या निधीच्या आढावा बैठकीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हा प्रशासनाची चांगलीच झाडाझडती घेतली. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आपला कारभार सुधारण्यासाठी त्यांनी महिनाभराचा अवधी दिला आहे त्यानंतर मात्र अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेत त्यांनी दिले.

पालकमंत्री विखे यांच्या उपस्थितीत शनिवारी जिल्हा नियोजन समितीच्या कामासंदर्भातील आढावा बैठक झाली. यावेळी माजी मंत्री आमदार राम शिंदे, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार बबनराव पाचपुते, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, शिवाजी कर्डिले, वैभव पिचड, बाळासाहेब मुरकुटे, भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

गतवेळच्या बैठकीत विखे यांनी क्रीडा विभागाच्या कारभारासंदर्भात नाराजी व्यक्त केली होती. याही बैठकीत त्यांनी क्रीडा विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत थेट कारवाईचा इशारा दिला आहे. संगमनेरच्या क्रीडा संकुलाचा वापर राजकीय कारणासाठी होत असून तेथे एका गाळेधारकाकडे असलेली लक्षावधी रुपयांची थकबाकी वसूल करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले जात नाहीत. कोपरगाव क्रीडा संकुलाचा निधी अखर्चित आहे. व्यायाम शाळा नसलेल्या ठिकाणी साहित्य देण्यात आले असून साहित्याचा पुरवठा करताना सरपंचाची ना हरकत घेतली नाही तसेच, ते साहित्य खासगी व्यक्तीच्या घरी पडून असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

क्रीडा, कृषी, पशुसंवर्धन विभागांनी त्यांचा निधी खर्च करण्या व्यतिरिक्त काय चांगले केले याचा अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. जंगलातील प्राणी वन्यजीव माणसाळतात मात्र वनविभाग माणसाळत नाही, वनविभागाचे अधिकारी केवळ टाईमपास करण्यासाठी काम करतात. अधिकारी लोकांना भेटत नाही. लोकांची कामे होत नाहीत, अशा शब्दात वनविभागाबद्दल नाराजी व्यक्त केली.

आमदार शिंदे, माजी आमदार मुरकुटे यांनी विज वितरण कंपनी संदर्भात प्रश्न उपस्थित केला असता विखे यांनी विज तोडण्याची घाई करू नका असे आदेश अधीक्षक काकडे यांना दिले.

पोलीस अधिकाऱ्यांची पुढील आठवड्यात घेणार स्वतंत्र बैठक

तर खासदार विखे यांनी पोलीस विभागाचे स्वतंत्ररीत्या बैठक घेऊन त्यांना सूचना देण्याची मागणी केली. पोलीस विभागात भ्रष्टाचार माजला असून लोकप्रतिनिधींचे गुन्हे अधिकारी दाबत आहेत. मृतदेह सापडतात मात्र गुन्हे दाखल होत नाहीत. अशा आरोपांच्या तक्रारी पालकमंत्र्यांकडे केल्या. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी टाळ्या वाजवत खासदार विखे यांच्या या आरोपाला दुसरा दिला. यावर पालकमंत्र्यांनी पोलीस अधिकाऱ्यांची पुढील आठवड्यात स्वतंत्र बैठक घेणार असल्याचे सांगितले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 208
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

जिल्हा पोलीस दलात फेरबदल, संगमनेर शहर, घारगाव पोलीस निरीक्षकांच्या बदल्या; आर्थिक गुन्हे शाखेला मिळाले नवे पोलीस निरीक्षक, वादग्रस्त एलसीबीत बदल नाही

13/08/2024

काम झाले तर रस्ता वाहतुकीला सुरू करण्याची मागणी

12/08/2024

अहमदनगर जिल्ह्यात १९ ऑगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश, यासाठी असेल बंदी

09/08/2024
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धांदरफळ बुद्रुक गावाच्या शिवारातील बाजारतळावर नवरात्रोत्सवानिमित्ताने…

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

17/10/2026

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026

शनिवार, १७ ऑक्टोंबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.