Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » तुकाराम मुंढे, भाग्यश्री बानायत यांच्यासह राज्यातील सात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; मुंढेंना शिर्डी संस्थान मिळण्याची चिन्हे
प्रशासन

तुकाराम मुंढे, भाग्यश्री बानायत यांच्यासह राज्यातील सात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; मुंढेंना शिर्डी संस्थान मिळण्याची चिन्हे

अवघ्या दोन महिन्यात मुंढेंची तर दीड वर्षात बानायत यांची बदली
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar29/11/2022Updated:29/11/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मुंबई | महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

राज्य सरकारने मंगळवारी आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले. यात अवघ्या दोन महिन्यांपूर्वी राज्याच्या आरोग्य आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आलेल्या तुकाराम मुंढे, शिर्डी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांच्यासह आणखी काही अधिकाऱ्यांचा समावेश आहे. दुपारी काढण्यात आलेल्या आदेशामध्ये तुकाराम मुंढे यांना ‘कार्यमुक्त व्हा आणि पुढील आदेशाची वाट पहा’ असे आदेश देण्यात आले असले तरी, त्यांची नियुक्ती शिर्डी संस्थांनच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी करण्यात आली असल्याचे दैनिक सामनाने म्हटले आहे.

तर शिर्डी संस्थांनच्या कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांची बदली नागपूरला सदस्य सचिव, विदर्भ वैधानिक विकास मंडळ या पदावर करण्यात आली आहे. अवघ्या दोन महिन्यात मुंढे यांची बदली करण्यात आली असून सोळा वर्षात त्यांच्या अठराहून अधिक बदल्या झाल्या आहेत. तर दीड वर्षात बानायत यांची बदली करण्यात आली आहे.

अन्य बदल्या झालेले अधिकारी व त्यांना मिळालेले नियुक्तीचे ठिकाण पुढील प्रमाणे

डॉ. व्ही. एन. सूर्यवंशी अतिरिक्त आयुक्त MMRDA, मुंबई यांची आयुक्त, उत्पादन शुल्क, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

भाग्यश्री बानायत मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डी यांची सदस्य सचिव, विदर्भ वैधानिक विकास मंडळ, नागपूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

विनय सदाशिव मून मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, भंडारा यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद परभणी या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

सुनील एस. चव्हाण यांची नियुक्ती आयुक्त, कृषी, पुणे म्हणून करण्यात आली आहे.

एस. एम. कुर्तकोटी यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद भंडारा म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

श्रीमती सौम्या शर्मा सहाय्यक जिल्हाधिकारी, देगलूर उपविभाग नांदेड यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नागपूर या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

शिर्डी देवस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बानायत यांनी गेल्या दीड वर्षांमध्ये अनेक धाडसी निर्णय घेतले होते. ग्रामस्थ व प्रशासन यांच्यामध्ये दरी निर्माण झालेली होती, त्यामध्ये मार्ग काढून शिर्डी देवस्थानचा कारभार चांगल्या पद्धतीने करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. त्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. देवस्थानामध्ये प्रशासकीय शिस्तही त्यांनी चांगल्या पद्धतीने लावली होती.

तर अवघ्या दोन महिन्यात बदली झालेल्या तुकाराम मुंढे यांनी आपल्या कडक शिस्तीतून आरोग्य विभागाच्या कारभार सुधारण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या नियुक्तीचा आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी चांगलाच धसका घेतला होता. मुंढे यांच्या कार्यकाळात आरोग्य विभागाला शिस्त लागून रुग्णांना सेवा मिळेल असा आशावाद निर्माण झालेला असतानाच अचानकपणे त्यांच्या बदलीचे आदेश राज्य शासनाने काढले आहेत त्यांना नवीन नियुक्तीचे ठिकाण दिलेले नसले तरी त्यांची नियुक्ती शिर्डी संस्थानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी झाल्याचे वृत्त दैनिक सामनाने दिले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 303
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

जिल्हा पोलीस दलात फेरबदल, संगमनेर शहर, घारगाव पोलीस निरीक्षकांच्या बदल्या; आर्थिक गुन्हे शाखेला मिळाले नवे पोलीस निरीक्षक, वादग्रस्त एलसीबीत बदल नाही

13/08/2024

काम झाले तर रस्ता वाहतुकीला सुरू करण्याची मागणी

12/08/2024

अहमदनगर जिल्ह्यात १९ ऑगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश, यासाठी असेल बंदी

09/08/2024
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहरालगतच्या गुंजाळवाडी परिसरात अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावर स्थानिक गुन्हे…

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.