Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अकोलेतील ‘या’ उपकरणाची विभागीय पातळीवर तंत्र प्रदर्शनासाठी निवड
शिक्षण

अकोलेतील ‘या’ उपकरणाची विभागीय पातळीवर तंत्र प्रदर्शनासाठी निवड

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar30/11/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अकोले | महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

अहमदनगर मधील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनात सहभागी झालेल्या २७ शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या उपकरणाने यश मिळविले आहे. या उपकरणाची विभागीय पातळीवर होणाऱ्या तंत्र प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली असल्याची माहिती अकोले आयटीआयचे प्राचार्य विद्याचंद्र सातपुते यांनी दिली.

कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मुंबई आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने या प्रदर्शनाचे उद्योजक किशोर कुलकर्णी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी कृषी, पारंपारिक ऊर्जा, पाणीबचत, फॅशन, खाद्यपदार्थ, यांत्रिक मॉडेल्स यावर आधारित जवळपास ७० उपकरणे मांडण्यात आली होती.

अभियांत्रिकी गटामध्ये अकोले तालुका आयटीआय संस्थेच्या ‘हँडी मल्चिंग मशीन’या शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या उपकरणाची नासिक येथे एक डिसेंबरला होणाऱ्या विभागीय पातळीवरील प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली आहे. प्रदर्शनात द्वितीय क्रमांक मिळविलेले हे उपकरण वेल्डर निदेशक बाबासाहेब धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ओम साबळे यांच्यासह अन्य विद्यार्थ्यांनी बनविले होते.

अकोले आयटीआयच्या या यशाबद्दल संस्थेचे कार्यकारी विश्वस्त माजी मंत्री मधुकरराव पिचड, विश्वस्त माजी आमदार वैभव पिचड, गिरीजाजी जाधव, सुरेश कोते, संपतराव वैद्य, मधुकरराव सोनवणे संस्थेचे अध्यक्ष अभियंता सुनील दातीर, सुधाकर देशमुख, धनंजय संत, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यशवंतराव आभाळे, ॲड. आनंदराव नवले, डॉ. डी. के. सहाणे, कल्पना सुरपुरीया, शरद देशमुख, सुधाकर आरोटे, रमेश जगताप, मच्छिंद्र धुमाळ, शिक्षणाधिकारी संपतराव मालुंजकर, उद्योजक माणिकराव डावरे आदींनी अभिनंदन केले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 204
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अमृतवाहिनी विद्यापीठाचे नाव गुणवत्तेमुळे देशात मोठे राहील: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

18/08/2026

यू डायस अहवाल: राज्यातील हजारो शाळा पायाभूत सुविधांअभावी अंधारात, डिजिटल शिक्षणाचा दावा ठरतोय फोल

17/07/2026

मंदिरांप्रमाणेच ‘ज्ञानमंदिरांना’ दान द्या, तरच सामर्थ्यशाली देश उभा राहील: डॉ. दत्तात्रय आहेर

16/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सांत्वन

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

By Annant Ppangarkar02/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: जवळेकडलग येथील अकरा वर्षीय बालक कृष्णा वसंत पवार याचा…

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026

सत्याचा आवाज, लेखणीचा पहारेकरी – ज्येष्ठ पत्रकार अनंत पांगारकर यांचा आंबेडकरी चळवळीच्यावतीने हृद्य सत्कार

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.