Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

शिक्षकांची तळमळ, ग्रामस्थांचा लोकसहभाग अन् माजी विद्यार्थ्यांचे योगदान; शिंदेवाडी शाळेचा प्रेरणादायी कायापालट!

12/11/2026

गुरुवार, १२ नोव्हेंबर २०२६ — जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

12/11/2026

संगमनेरच्या राजकारणात ‘भाऊबीजे’चा अनोखा ट्विस्ट! धुळ्याहून आलेल्या शुभांगी पाटलांकडून अमोल खताळांचे औक्षण!

11/11/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शिक्षकांची तळमळ, ग्रामस्थांचा लोकसहभाग अन् माजी विद्यार्थ्यांचे योगदान; शिंदेवाडी शाळेचा प्रेरणादायी कायापालट!
शिक्षण

शिक्षकांची तळमळ, ग्रामस्थांचा लोकसहभाग अन् माजी विद्यार्थ्यांचे योगदान; शिंदेवाडी शाळेचा प्रेरणादायी कायापालट!

संगणक कक्ष व सांस्कृतिक कला मंचाच्या इमारतीचे आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या हस्ते भूमिपूजन; न्यायाधीश चंद्रकांत दातीर व अधिकारी योगेश आंबरे यांच्याकडून प्रत्येकी ५१ हजारांची देणगी
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar12/11/2026No Comments4 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-
शिक्षकांची शाळेप्रती असलेली निष्ठा, ग्रामस्थांचा सक्रिय लोकसहभाग आणि माजी विद्यार्थ्यांचे योगदान एकत्र आले, तर ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेचाही कायापालट घडू शकतो, याचा आदर्श अकोले तालुक्यातील गणोरे येथील शिंदेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने निर्माण केला आहे. एकेकाळी अवघ्या नऊ विद्यार्थ्यांवर सुरू असलेल्या या शाळेची विद्यार्थीसंख्या आज समाधानकारक वाढली असून, शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच भौतिक सुविधांच्या बाबतीतही शाळेने उल्लेखनीय प्रगती केली आहे. उपक्रमशील मुख्याध्यापिका वृषाली कडलग आणि त्यांच्या सहकारी शिक्षकांच्या समर्पित कार्याला ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती व माजी विद्यार्थ्यांची भक्कम साथ लाभल्याने शिंदेवाडी शाळा ग्रामीण शिक्षणाचे प्रेरणादायी केंद्र बनत आहे, असे गौरवोद्गार आमदार डॉ. किरण लहामटे यांनी काढले.
गणोरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिंदेवाडी येथे नव्याने उभारण्यात येणाऱ्या संगणक कक्ष व सांस्कृतिक कला मंचाच्या इमारतीचा भूमिपूजन सोहळा आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडला. यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परमपूज्य योगी केशव बाबा चौधरी होते. प्रमुख अतिथी म्हणून विस्तार अधिकारी अनिल गायकवाड, शाळेचे माजी विद्यार्थी तथा न्यायाधीश चंद्रकांत सावळेराम दातीर, अर्थ व वित्त सेवा अधिकारी योगेश हरिभाऊ आंबरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिगंबर दातीर, मुख्याध्यापिका वृषाली कडलग, केंद्रप्रमुख बाळासाहेब आरोटे, सरपंच संतोष आंबरे, राजेंद्र आंबरे, दत्तात्रय हांडे, मदन आंबरे, विजय दातीर आणि संतोष भालेराव आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून भूमिपूजन सोहळ्याची सुरुवात करण्यात आली.
आमदार डॉ. किरण लहामटे म्हणाले की, शिक्षकांनी आपल्या कामावर आणि शाळेवर मनापासून प्रेम केले, तर लोकसहभागातून शाळेचे चित्र बदलू शकते. शिंदेवाडी शाळेने हे प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध केले आहे. शाळेचा विकास हा केवळ एका संस्थेचा विकास नसून संपूर्ण गावाच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी आहे. मंदिरांप्रमाणेच किंबहुना त्याहून अधिक महत्त्व जीवन घडविणाऱ्या शिक्षण मंदिरांना दिले पाहिजे. प्रत्येक गावात गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी आणि आधुनिक सुविधांनी युक्त शाळा असणे ही काळाची गरज आहे. शिंदेवाडी शाळेने उभा केलेला आदर्श इतर शाळांसाठीही दिशादर्शक ठरेल.
अध्यक्षीय भाषणात परमपूज्य योगी केशव बाबा चौधरी म्हणाले की, समृद्ध समाजनिर्मितीमध्ये शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. स्वतःच्या खिशाला झळ सोसून शाळेत शैक्षणिक आणि भौतिक सुविधा निर्माण करण्याचे शिवधनुष्य शिंदेवाडी शाळेतील शिक्षकांनी उचलले आहे. शिक्षकांची ही तळमळ आणि समर्पण संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी आहे. अकोले तालुका ही विचारवंतांची आणि सामाजिक परिवर्तनाला दिशा देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांची भूमी आहे. या भूमीत शिक्षकांनी उभा केलेला शिंदेवाडीचा आदर्श निश्चितच कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
विस्तार अधिकारी अनिल गायकवाड यांनी शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांच्या लोकसहभागातून शाळेचा विकास साधण्यात शिंदेवाडीने आदर्श निर्माण केला असल्याचे सांगितले. इतर शाळांनीही शिंदेवाडी पॅटर्नचा आदर्श घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
शाळेचे माजी विद्यार्थी तथा न्यायाधीश चंद्रकांत सावळेराम दातीर यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देताना, “शिंदेवाडी शाळेने मला घडविले. आज मी न्यायाधीश झालो, यामागे या शाळेने दिलेले संस्कार आणि शिक्षण यांचा मोठा वाटा आहे,” असे भावनिक उद्गार काढले. शाळेचे बदललेले स्वरूप पाहून आपण भारावून गेल्याचे सांगत त्यांनी शाळेच्या भौतिक विकासासाठी ५१ हजार रुपयांची देणगी जाहीर केली. शिंदेवाडी शाळेपासून सुरू झालेला गणोरे ते मुंबईपर्यंतचा प्रवास हा आपल्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असल्याचे त्यांनी नमूद केले. शिक्षण हे वाघिणीचे दूध असून, ते प्रत्येकाच्या आयुष्यात क्रांतिकारक परिवर्तन घडवू शकते. त्यामुळे शाळांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचेही त्यांनी सांगितले.
अर्थ व वित्त सेवा अधिकारी योगेश हरिभाऊ आंबरे यांनीही शाळेतील शैक्षणिक आणि भौतिक सुविधांचे कौतुक केले. शाळेच्या पुढील विकासासाठी त्यांनी ५१ हजार रुपयांची देणगी जाहीर केली. या दोन्ही माजी विद्यार्थ्यांच्या योगदानामुळे शाळेच्या विकासाला आणखी बळ मिळणार आहे.
शिक्षकांची तळमळ, ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग, शाळा व्यवस्थापन समितीचे सहकार्य आणि माजी विद्यार्थ्यांची सामाजिक बांधिलकी या चारही घटकांच्या एकत्रित प्रयत्नांतून शिंदेवाडी शाळेने विकासाची नवी दिशा निर्माण केली आहे. नव्याने उभारण्यात येणारा संगणक कक्ष विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देण्यास, तर सांस्कृतिक कला मंच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आणि सर्जनशीलतेला व्यासपीठ उपलब्ध करून देण्यास महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे शाळेच्या शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सर्वांगीण विकासाला नवी गती मिळणार आहे.
यावेळी उमेश काळे, गणेश खतोडे, रामकृष्ण दातीर, माजी विद्यार्थी सुनील आंबरे, विकास दातीर, प्रशांत शिंदे, प्रवीण आंबरे, डॉ. प्रशांत शिंदे, दत्तात्रय आहेर, राहुल शिंदे, श्रीकांत शिंदे, राहुल भालेराव, शुभम आंबरे, रविंद्र काळे, प्रकाश आहेर, विठ्ठल दातीर, जयश्री मोरे, मनीषा हाडवळे, कपाली नाईकवाडी, पल्लवी कडलग, दीपाली खतोडे, अमित दातीर, दीपाली दातीर, राजेंद्र कुमार खतोडे, गणेश आंबरे, प्रकाश काळे, नवनाथ पवार, सुनील हरिभाऊ आंबरे, श्वेता दातीर, जयश्री काळे, पूनम दातीर, शीतल आंबरे, संजीवनी दातीर, माया दातीर, मीनाक्षी हांडे आणि अनिता हांडे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पल्लवी भालेराव कडलग यांनी केले, तर कल्पना पाटील यांनी आभार प्रदर्शन केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 62
भूमिपूजन वृषाली कडलग शिक्षण शिंदेवाडी शाळा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळांच्या जिल्हा परिषदेच्या शाळा भेटीमध्ये समोर आले हे गंभीर वास्तव! नेमकं काय घडलं…

05/11/2026

आमची शाळा कोणत्याही कॉन्व्हेंटपेक्षा कमी नाही! जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिकेने अशी बदलली शाळेची रूपरेषा, वृषाली कडलग यांना ‘आयडॉल शिक्षक पुरस्कार’ जाहीर

03/11/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शिक्षण

शिक्षकांची तळमळ, ग्रामस्थांचा लोकसहभाग अन् माजी विद्यार्थ्यांचे योगदान; शिंदेवाडी शाळेचा प्रेरणादायी कायापालट!

By Annant Ppangarkar12/11/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- शिक्षकांची शाळेप्रती असलेली निष्ठा, ग्रामस्थांचा सक्रिय लोकसहभाग आणि माजी विद्यार्थ्यांचे योगदान…

गुरुवार, १२ नोव्हेंबर २०२६ — जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

12/11/2026

संगमनेरच्या राजकारणात ‘भाऊबीजे’चा अनोखा ट्विस्ट! धुळ्याहून आलेल्या शुभांगी पाटलांकडून अमोल खताळांचे औक्षण!

11/11/2026

आमदार अमोल खताळ यांनी कुटुंबीयांसमवेत साजरी केली भाऊबीज; बहिणीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हाच सणाचा खरा संदेश

11/11/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.