महाराष्ट्र संवाद न्यूज
यश प्राप्ती आणि सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी विद्यार्थ्यांनी कौशल्य आत्मसात करण्याची आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांना ही कौशल्य आत्मसात करता येतील, यासाठी शिक्षकांनी योगदान देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन इनरव्हील क्लबच्या डिस्ट्रिक्ट ३१३ च्या व्हाईस प्रेसिडेंट रचना मालपाणी यांनी केले.
इनरव्हील क्लबच्या माध्यमातून संगमनेर नगरपालिका शाळांमधील ५३९ विद्यार्थ्यांना लेखन साहित्य म्हणून मालपाणी यांच्या हस्ते वह्या वाटप करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संगमनेर इनरव्हील क्लबच्या प्रेसिडेंट वृषाली कडलग होत्या. व्यासपीठावर व्हॉइस प्रेसिडेंट डॉ. श्रद्धा वाणी, सेक्रेटरी ज्योती पलोड, वैशाली खैरनार, उपस्थित होत्या.
वृषाली कडलग म्हणाल्या, गरजू, हुशार व होतकरू विद्यार्थ्यांसाठी संगमनेर इनरव्हील क्लब मदतीसाठी नेहमीच तत्पर असतो. इनरव्हील क्लबने जागतिक पातळीवरही स्वार्थ विरहित सेवेने केलेले सामाजिक कार्य समाजासाठी प्रेरणादायी ठरले आहे.
प्रास्ताविक करतान शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी राजेश डामसे यांनी इनरव्हील क्लबच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचे कौतुक करत क्लबकडे नगरपालिका शाळेसाठी क्रीडा साहित्याची मागणी केली. त्या मागणीस इनरव्हील क्लबच्या डिस्ट्रिक्ट ३१३ च्या व्हाईस प्रेसिडेंट रचना मालपाणी व संगमनेर प्रेसिडेंट वृषाली कडलग यांनी त्वरीत प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कांता शेंडे व पुष्पा राहणे यांनी केले. यावेळी शिक्षण मंडळाचे जाहीद शेख, शिक्षक समितीचे कैलास गीते, मुख्याध्यापिका चंद्रभागा जाधव, सप्तसिंधू खोसे, भारती भवार, परविन मॅडम, फुलचंद लेंडे, वामनराव कळसकर, अर्जुन भवार, अरविंद सगभोर आदी उपस्थित होते.

