Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026

शनिवार, १७ ऑक्टोंबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल

17/10/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » डाॅ. अमेय अनिल देशमुख यांनी वाचविले तरूणीचे प्राण
आरोग्य

डाॅ. अमेय अनिल देशमुख यांनी वाचविले तरूणीचे प्राण

श्वसननलिकेतील कानाची रिंग बाहेर काढून केले वेळेत उपचार
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar06/01/2023Updated:06/01/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

संगमनेर : तरुणीच्या श्वासनलिकेत अडकलेली कानातील सोन्याची रिंग दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करत काढण्यात आणि तरुणीचे प्राण वाचविण्यात संगमनेरमधील डॉक्टरांना यश आले आहे. श्वसन विकार व छाती रोग तज्ञ डॉ. अमेय अनिल देशमुख यांनी ही यशस्वी शस्त्रक्रिया केली.

फुफ्फुसाच्या संसर्गाने अत्यवस्थ असलेल्या तरुणीला श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे तिला उपचारासाठी येथील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तरुणीची प्रकृती खालावत चालल्याने हॉस्पिटल प्रशासनाने येथील श्वसन विकार व छाती रोग तज्ञ अमेय देशमुख यांना संपर्क केला होता.

देशमुख यांनी रुग्णालयात रुग्णाची प्राथमिक तपासणी केली. मात्र त्यातून निदान होत नसल्याने सिटीस्कॅन तपासणी करण्याचे ठरले. तपासणीअंती रुग्णाच्या उजव्या फुफ्फुसामध्ये गोल वस्तू अडकली असल्याचे दिसून आले. यामुळे श्वसन नलिकेमध्ये अडथळा निर्माण होऊन त्या खालील भागात कफ अडकल्याने या तरुणीला न्यूमोनिया झाला असल्याचे निदान झाले.

त्यामुळे श्वासनलिकेत निर्माण झालेला अडथळा दूर करणे आवश्यक होते. हा अर्थ दूर न केल्यास त्या खालील फुफ्फुस खराब होऊन तरुणीच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे रुग्ण तरुणीवर तातडीने शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. डॉ. देशमुख यांनी समय सूचकता दाखवत ब्राँकोस्कोपीच्या (दुर्बीण) तपासणीद्वारे श्वसनमार्गातील अडथळा दूर करण्याचा निर्णय घेतला.

ऑपरेशन थिएटरमध्ये तरूणीस तात्पुरती भूल देऊन ब्राँकोस्कोपी तपासणी करण्यात आली. उजव्या फुफ्फुसाच्या खालच्या श्वसन नलिकेमध्ये अडकलेली सोन्याची कानातील रिंग काढण्यात डाॅ. अमेय देशमुख यांना यश आले. त्यामुळे रुग्ण तरुणीचा श्वसनमार्ग पुन्हा खुला झाल्याने न्युमोनिया कमी होण्यास मदत झाली व या तरूणीचा जीव वाचला. यात देशमुख यांना भूलतज्ज्ञ डाॅ. घनकुटे व फिजिशियन डाॅ. सुशांत गिते यांची मोलाची मदत मिळाली.

रिंग कशी फुफ्फुसामध्ये गेली याचा उलगडा होईना

अत्यवस्थ वाटू लागल्याने तरुणी उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाली. तिला न्युमोनिया झाल्याचे निदान झाले. मात्र दिवशीची प्रकृती खालावत चालल्याने सी. टी. स्कॅन केल्याने पुढील निदान झाले. मात्र ही रिंग या तरुणीच्या फुफ्फुसामध्ये कशी गेली. हे अद्यापही स्पष्ट होऊ शकले नाही.

कोण आहेत देशमुख

डाॅ. अमेय अनिल देशमुख हे देशमुख मल्टिस्पेशालिटी हाॅस्पिटलचे संचालक असून येथे पूर्णवेळ कार्यरत आहेत. श्वसनसंस्थेच्या आजारांवर उपचार करण्यात त्यांचा हातखंडा असून कोव्हिडच्या काळात अनेक रूग्णांची त्यांनी सेवा केली. दुर्बिणीद्वारे श्वसनसंस्थेमध्ये अडकलेले धान्य, शेंगदाणे, नथ आदी वस्तू काढण्यामध्ये ते निष्णात आहेत. दमा, न्यूमोनिया, घोरण्याची समस्या, टी.बी., श्वसनसंस्थेचे सर्व विकार आदी उपचारांमध्ये ते निष्णात आहेत.     

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 459
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

19/07/2026

मध्यरात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रुग्णालयात दाखल; आगामी दौरे आणि कार्यक्रम तूर्तास पुढे ढकलले

04/07/2026

केमिकलयुक्त दूषित पाण्यामुळे बदापूर येथील शेती धोक्यात; विहिरींचे पाणी दूषित, तलावातील मासे मृत

11/06/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – सामान्य माणसाने स्थानिक पातळीवर न्याय मागायचा, तिथे न्याय मिळाला नाही…

शनिवार, १७ ऑक्टोंबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल

17/10/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.