Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज बुधवार, २ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

02/09/2026

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » वृषाली कडलग यांच्या सिग्नल झोनला प्रथम पारितोषिक
शिक्षण

वृषाली कडलग यांच्या सिग्नल झोनला प्रथम पारितोषिक

४७ वे संगमनेर तालुका विज्ञान-गणित प्रदर्शन
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar08/01/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

संगमनेर : धांदरफळच्या देशमुख मळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या उपशिक्षिका वृषाली सुनील कडलग यांच्या प्रदूषण विरहित सिग्नल झोन या उपकरणास प्रथम पारितोषिक प्राप्त झाले आहे.

संगमनेर तालुक्यातील चिखली येथे ५ ते ७ जानेवारी दरम्यान झालेल्या ४७ व्या तालुकास्तरीय विज्ञान गणित प्रदर्शन पार पडले. इयत्ता सहावी ते आठवी आणि नववी ते बारावी असे दोन गट त्याचबरोबर प्राथमिक शिक्षक गट, माध्यमिक शिक्षक गट, परिचर गट अशा विविध गटांमधून शालेय साहित्यांची स्पर्धा झाली. संगमनेर तालुक्यातील विविध शाळांतील विद्यार्थी शिक्षक परिचारक यांनी या प्रदर्शनात सहभाग नोंदवला.

प्राथमिक शिक्षक गटात “कार्बन डाय-ऑक्साइड वायूचे सिग्नल परिसरातील नियंत्रण” या विषयावरील मॉडेलला प्रथम क्रमांक मिळाला. सदरचे मॉडेल उपशिक्षिका वृषाली कडलग यांनी तयार केले आहे. सद्यस्थितीत सर्व जगभर वायू प्रदूषणाची समस्या भेडसावत आहे. विशेषतः सिग्नल जेथे आहेत, त्या ठिकाणी गाड्या जेव्हा थांबतात. तेव्हा बऱ्याच गाड्या सुरू अवस्थेत असतात. अशावेळी त्या परिसरामध्ये एकाच वेळी जास्तीत जास्त कार्बन मोनॉक्साईड हा बाहेर पडतो. त्याचा त्रास आजूबाजूच्या सर्व लोकांना होत असतो.

हा कार्बन मोनॉक्साईड आणि इतर घातक वायू यांना सिग्नलच्या वरच्या बाजूला असलेल्या पाईपमधून पाण्याच्या प्रेशरने विरघळवले जाते. आणि विरघळलेला कार्बन आणि इतर वायू सिग्नलच्या खाली जमिनीत एकत्र केले जातात. त्यानंतर त्याची विल्हेवाट लावली जाते. सदरचे हे मॉडेल सद्यस्थितीत जपानमध्ये वापरले जाते.

अर्थात प्रदूषण कमी करण्याचा हा एक उत्तम आणि सोपा पर्याय आहे आणि हे मॉडेल भारतात वापरले गेल्यास वायू प्रदूषणाची समस्या मोठ्या प्रमाणात सुटेल असे कडलग यांचे मत आहे. वायू प्रदूषणामुळे ग्लोबल वॉर्मिग वाढत असून पर्यावरणात मोठ्या प्रमाणात बदलही होत आहेत. अवेळी पाऊस पडतो आहे, पुर येत आहेत. त्या समस्या सोडविण्यासाठी प्रदूषण रोखले पाहिजे. यासाठी हे उपकरण महत्वपूर्ण ठरेल. अनेक विद्यार्थी आणि शिक्षकांनी या मॉडेलची माहिती घेत कौतुक केले.

गटविकास अधिकारी अनिल नागणे, गट शिक्षणाधिकारी सुवर्णा फटांगरे यांनीही या मॉडेलची माहिती घेतली. प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी गणित-विज्ञान अध्यापक मंडळ, प्रदर्शन संयोजन समिती, कलेक्टर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ देणगीदार, पालक, विद्यार्थी यांनी मोलाचे सहकार्य केले.

पारितोषिक वितरण कार्यक्रमासाठी माजी कलेक्टर देशमुख साहेब, जिल्हा परिषदेचे सदस्य रामहरी कातोरे, संगमनेर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष संतोष हासे, गटशिक्षणाधिकारी सुवर्णा फटांगरे, राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त दत्तात्रय आरोटे, संगमनेर तालुका गणित अध्यापक संघाचे अध्यक्ष संतोष बैरागी संगमनेर तालुका विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष शशांक खोजे आदी उपस्थित होते.

कडलग यांचे गटशिक्षणाधिकारी सुवर्णा फटांगरे, स्वदेश उद्योग समूहाचे संस्थापक बाळासाहेब देशमाने, उद्योगपती बाबूभाई डेरे, विस्ताराधिकारी मंदा दुर्गुडे, केंद्रप्रमुख दशरथ धादवड, मुख्याध्यापक हनुमंत अडांगळे, अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश देशमुख यांनी अभिनंदन केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 285
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अमृतवाहिनी विद्यापीठाचे नाव गुणवत्तेमुळे देशात मोठे राहील: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

18/08/2026

यू डायस अहवाल: राज्यातील हजारो शाळा पायाभूत सुविधांअभावी अंधारात, डिजिटल शिक्षणाचा दावा ठरतोय फोल

17/07/2026

मंदिरांप्रमाणेच ‘ज्ञानमंदिरांना’ दान द्या, तरच सामर्थ्यशाली देश उभा राहील: डॉ. दत्तात्रय आहेर

16/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज बुधवार, २ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar02/09/20260

Annant Ppangarkar आजचे राशीभविष्य- मेष – आजचा दिवस आपल्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. कामाच्या…

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.