Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज बुधवार, २ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

02/09/2026

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ज्ञानप्राप्तीसाठी विज्ञानाची कास आवश्यक : हिरालाल पगडाल
शिक्षण

ज्ञानप्राप्तीसाठी विज्ञानाची कास आवश्यक : हिरालाल पगडाल

गणित विज्ञान प्रदर्शनात तालुक्यातील ७४ शाळांचा सहभाग
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar08/01/2023No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

संगमनेर : मानवी जीवनात विज्ञानाचे मोठे महत्त्व आहे. मानवाला अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेण्याचे काम विज्ञान करत असते. त्यामुळे ज्ञानप्राप्तीसाठी विज्ञानाची कास धरणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन शिक्षक नेते हिरालाल पगडाल यांनी केले.

४७ वे संगमनेर तालुका विज्ञान गणित प्रदर्शन ५ ते ७ जानेवारी दरम्यान तालुक्यातील चिखली येथील नूतन माध्यमिक विद्यालयात पार पडले. प्रदर्शनाचे उद्घाटन पगडाल यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अनिल नागणे होते. गटशिक्षणाधिकारी सुवर्णा फटांगरे, जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे, ग्राम विकास संस्थेचे अध्यक्ष सोपान सहाने, उपाध्यक्ष बाळासाहेब देशमुख नंदकुमार हासे आदी उपस्थित होते.

गटविकास अधिकारी नागणे म्हणाले, कोविड परिस्थितीमुळे तालुका प्रदर्शनास उपलब्ध झालेला निधी अतिशय तुटपुंज असला तरी शिक्षक, संगमनेर तालुका विज्ञान व गणित अध्यापक संघ, चिखली ग्रामस्थ, विविध संस्था यांच्या माध्यमातून पुरेसा निधी उपलब्ध करता आला.

कातोरे म्हणाले, या प्रदर्शनाच्या माध्यमातून चिखली ग्रामस्थ शैक्षणिक कार्यासाठी नेहमी तत्पर असल्याचे यातून दिसून आले. ज्यावेळी त्यांनी प्रदर्शन खर्चापोटी वैयक्तिक ११ हजार रुपयांची देणगी जाहीर केली.

मुख्याध्यापिका अलका आहेर यांनी भारताचे माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या लहानपणीचे प्रसंग सांगत जिज्ञासू वृत्तीतून विविध प्रकारचे शोध कसे लागतात याची माहिती देत गणित विज्ञान प्रदर्शनाचे महत्त्व विशद केले.

प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी सुवर्णा फटांगरे यांनी केले. संगमनेर तालुका विज्ञान संघटनेचे अध्यक्ष शशांक खोजे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

संगमनेर तालुक्यातील ७४ शाळांनी आपली उपकरणे प्रदर्शनात मांडून सहभाग घेतला होता. इयत्ता सहावी ते आठवी, इयत्ता नववी ते बारावी असे दोन गट विज्ञान व गणित विषयासाठी होते. प्रत्येक गटातून पाच बक्षिसे जाहीर करण्यात आली. प्राथमिक शिक्षक माध्यमिक शिक्षक व प्रयोगशाळा परिचर या गटातही सहभाग नोंदविला गेला. बक्षीसपात्र विद्यार्थी व शिक्षकांना सन्मानपत्र व रोख रकमेचे पारितोषिक उपस्थितांच्या हस्ते देण्यात आले. तर जिल्हा प्रदर्शनासाठी निवड झालेल्या पंधरा उपकरणांना स्व. देविदास तुळशीदास बैरागी (नाशिक) यांच्या स्मरणार्थ रेखा संतोष बैरागी यांनी ट्रॉफी प्रदान केल्या.

प्रदर्शन समारोप आणि पारितोषिक वितरणावेळी गावचे सुपुत्र माजी जिल्हाधिकारी निर्मलकुमार देशमुख, राज्य विज्ञान अध्यापक महामंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय आरोटे, गटशिक्षणाधिकारी सुवर्ण फटांगरे, विज्ञान गणित संघटनेचे माजी पदाधिकारी विजय कोडुर, अरविंद कडलग, भारत सातपुते, दिलीप लांडगे, अविनाश कानवडे, रमेश कानवडे, विनायक क्षीरसागर, वसंत नेहे उपस्थित होते. समारोप कार्यक्रमाचे प्रास्ताविक संगमनेर तालुका गणित संघटनेचे अध्यक्ष संतोष बैरागी यांनी केले. त्यांनी प्रकल्प, प्रदर्शन पाहण्यासाठी आलेल्या शाळा, शिक्षक, ग्रामस्थांची सांख्यिकीय माहिती देत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शिक्षकांचे विविध उपक्रमांना असलेले योगदान, विविध स्पर्धा परीक्षा, शासकीय उपक्रम याची माहिती दिली.

प्रमुख अतिथी दत्तात्रय आरोटे यांनी प्रदर्शनाचे महत्त्व सांगून शास्त्रज्ञ कसे घडतात, विद्यार्थ्यांच्या उपक्रमांना पेटंट कसे मिळते, राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद, इन्स्पायर अवॉर्ड या योजनेतील सहभागी विद्यार्थी बक्षिसे कशी मिळवतात याविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी कलेक्टर निर्मलकुमार देशमुख यांनी विद्यालयातून कलेक्टर्स घडावे यासाठी नूतन माध्यमिक विद्यालयाचे नाव कलेक्टर्स हायस्कूल आहे असे सांगितले त्यांच्या योगदानातून विद्यालयाची सुसज्ज अशी नवीन इमारत उभी आहे. आपल्या भावी जीवनाच्या गरजा ओळखून विज्ञानाचा अभ्यास करावा असे त्यांनी सांगितले. आभार विज्ञान गणित अध्यापक संघटनेचे सचिव मनोज उपरे यांनी मानले तर सूत्रसंचालन अहमदनगर जिल्हा विज्ञान अध्यापक संघाचे प्रतिनिधी सुनील दाभाडे यांनी केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 175
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अमृतवाहिनी विद्यापीठाचे नाव गुणवत्तेमुळे देशात मोठे राहील: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

18/08/2026

यू डायस अहवाल: राज्यातील हजारो शाळा पायाभूत सुविधांअभावी अंधारात, डिजिटल शिक्षणाचा दावा ठरतोय फोल

17/07/2026

मंदिरांप्रमाणेच ‘ज्ञानमंदिरांना’ दान द्या, तरच सामर्थ्यशाली देश उभा राहील: डॉ. दत्तात्रय आहेर

16/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज बुधवार, २ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar02/09/20260

Annant Ppangarkar आजचे राशीभविष्य- मेष – आजचा दिवस आपल्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. कामाच्या…

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.