महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
संगमनेर : महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत संगमनेर तालुक्यातील सुकेवाडी येथील शुक्लेश्वर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे.
पाचव्या इयत्तेमध्ये शिकणाऱ्या साहिल सातपुते याच्यासह इयत्ता आठवीमध्ये शिकणारे चार विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र ठरले आहेत, अशी माहिती शाळेच्यावतीने देण्यात आली.
गुणवत्ता यादीत चमकलेल्या आकांक्षा सोमनाथ कुटे हिने अहमदनगर जिल्ह्यात १४३ वा, श्रेयस रमेश सातपुते यांने अहमदनगर जिल्ह्यात २३० वा, श्रावणी संजय गुंजाळ हिने भूमिहीन पालकांचे पाल्य या गटात तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला तर ज्ञानेश्वरी जालिंदर सातपुते हिने भूमिहीन पालकांचे पाल्य या गटात तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळविला. या विद्यार्थ्यांना एकनाथ भांड यांचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक कैलास कुऱ्हे यांच्या हस्ते बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, लक्ष्मण कुटे, दत्तात्रय चासकर, बाबुराव गवांदे यांच्यासह स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष, संचालक, सुकेवाडीचे सरपंच, उपसरपंच ग्रामस्थांसह विविध संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास सातपुते यांनी, प्रास्ताविक पानसरे सर यांनी केले. तर श्रीमती कोटकर यांनी आभार मानले.

