Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026

शनिवार, १७ ऑक्टोंबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल

17/10/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » नाशिक पदवीधरसाठी आत्तापर्यंत दहा उमेदवारी अर्ज; काँग्रेस उमेदवार डॉ. सुधीर तांबे गुरुवारी अर्ज भरणार
महाराष्ट्र संवाद विशेष

नाशिक पदवीधरसाठी आत्तापर्यंत दहा उमेदवारी अर्ज; काँग्रेस उमेदवार डॉ. सुधीर तांबे गुरुवारी अर्ज भरणार

तर भाजपचा उमेदवार शेवटच्या क्षणी निश्चित होणार
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar11/01/2023Updated:11/01/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

नाशिक : विधान परिषदेच्या नासिक पदवीधर मतदार संघासाठी बुधवार पर्यंत सात उमेदवारांनी दहा उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे आत्तापर्यंतची उमेदवारी अर्ज यांची संख्या तेरा झाली. पदवीधर मतदार संघाचे विद्यमान आमदार डॉक्टर सुधीर तांबे गुरुवारी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. तर त्यांच्या विरोधातील भाजपचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही.

पदवीधर मतदार संघासाठी नाशिक वगळता उर्वरित मतदार संघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार जाहीर झाले आहेत. मात्र नाशिकमध्ये अद्याप उमेदवाराची घोषणा झालेली नाही. शेवटच्या क्षणी भारतीय जनता पक्ष आपला उमेदवार जाहीर करेल असे सध्याचे चित्र आहे. असे असले तरी शुभांगी भास्कर पाटील यांनी भाजपकडून अर्ज दाखल केला आहे.

दरम्यान बुधवारपर्यंत तेरा नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ तथा उपायुक्त रमेश काळे यांनी दिली आहे.Advt

बुधवारी नामनिर्देशन अर्ज दाखल करणाऱ्यामध्ये सुरेश भिमराव पवार, नाशिक यांनी अपक्ष व नॅशनल ब्लॅक पँथर पार्टी या दोन पक्षातून अर्ज सादर केले. अन्सारी रईस अहमद अब्दुल कादिर, धुळे व सुभाष निवृत्ती चिंधे, अहमदनगर यांनी अपक्ष म्हणून अर्ज सादर केला आहे. रतन कचरु बनसोडे, नाशिक यानी वंचित बहूजन आघाडी पक्षातून तर शुभांगी भास्कर पाटील, धुळे यांनी भारतीय जनता पक्षातून अर्ज सादर केला आहे. ईश्वर उखा पाटील, धुळे यांनी अपक्ष व आम आदमी पार्टी या पक्षातून दोन अर्ज सादर केले आहे. सुभाष राजाराम जंगले, श्रीरामपूर यांनी देखील अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज सादर केला आहे.

१० व ११ जानेवारी या दोन दिवसात तेरा उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज सादर केले आहे. गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून प्रमुख उमेदवारांचे अर्ज उद्या शेवटच्या दिवशी दाखल होतील. तसेच विद्यमान महाविकास आघाडीचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या विरोधातील भारतीय जनता पक्षाचा उमेदवार देखील निश्चित होऊन लढतीचे चित्र स्पष्ट होईल.

सत्यजित तांबे भाजप उमेदवार चर्चेला पूर्णविराम

दरम्यान नाशिक मतदार संघातून भारतीय जनता पक्ष ऐनवेळी युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष, युवा नेते सत्यजित तांबे यांना उमेदवारी देणार असल्याची चर्चा होती. आमदार तांबे यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला नसल्याने या चर्चेला पेव फुटले होते. मात्र तांबे यांनी आपण गुरुवारी दुपारी साध्या पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे ट्विट करून स्पष्ट केले. त्यामुळे भाजपकडून सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

उमेदवारीबद्दल तांबे यांनी केलेले ट्विट

नाशिक पदवीधर मतदारसंघात कॉंग्रेसच्या वतीने उद्या उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे. अतिशय साध्या पध्दतीने हा उमेदवारी अर्ज भरणार असल्याने कुणीही गर्दी करु नये. लवकरच सर्व नेत्यांच्या उपस्थितीत भव्य मेळावा आयोजित करणार असून यात आपण सर्व निमंत्रित आहात.

धन्यवाद!

— Dr Sudhir Tambe (@DrSudhir_Tambe) January 11, 2023

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 352
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – सामान्य माणसाने स्थानिक पातळीवर न्याय मागायचा, तिथे न्याय मिळाला नाही…

शनिवार, १७ ऑक्टोंबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल

17/10/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.