Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अहिल्यानगर व संगमनेरात एलसीबीची धडक कारवाई; अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त, चाळीस गोवंशीय जनावरांची सुटका!

18/10/2026

रविवार विशेष लेख — निवडणूक आयोग: गेंडा आणि गेंड्याची कातडी!

18/10/2026

रविवार, १८ ऑक्टोबर —- वाचा तुमचे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

18/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » नाशकात २३ ते २८ जानेवारी दरम्यान महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबीर
आरोग्य

नाशकात २३ ते २८ जानेवारी दरम्यान महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबीर

मोफत पॅप स्मीयर व मॅमोग्राफी (स्तनांची सोनोग्राफी); स्रीरोग तज्ञांची उपस्थिती
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar16/01/2023No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

नाशिक : उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे चॅरीटेबल हॉस्पिटल असलेल्या एसएमबीटी (SMBT) हॉस्पिटलच्या कॅन्सर इन्स्टीट्युटमार्फत महिलांसाठी भव्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबीर एसएमबीटी हॉस्पिटल नंदी हिल्स धामणगाव (ता. इगतपुरी) व नाशिक शहरातील मुंबई नाका येथील एसएमबीटी क्लिनिकमध्ये आयोजित करण्यात आले आहे. येत्या २३ जानेवारीपासून या शिबिरास सुरुवात होणार असून २८ जानेवारीपर्यंत सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत जास्तीत जास्त महिलांनी प्रतिबंधात्मक तपासणी करून घ्यावी असे आवाहन हॉस्पिटलकडून करण्यात आले आहे.

महिलांमधील कर्करोगाची समस्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. अनेक महिला सततच्या होणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे आजाराची लक्षणे बळावतात. यामुळे गर्भाशय, स्तनांशी निगडीत महिलांना त्रास जाणवत असेल तर त्यांनी तात्काळ या शिबिरात सहभागी होऊन आपली तपासणी करून घ्यावी असेही आवाहन करण्यात आले आहे.

भारतात दर एक लाख लोकवस्तीत 100 कर्करोगग्रस्त व्यक्ती असे प्रमाण सांगण्यात येते. पन्नाशी, साठीनंतर कर्करोग होण्याची शक्यता अधिकच वाढते. महिलांमध्ये गर्भाशयाचे व स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. कर्करोगाचे जितक्या लवकर निदान होईल तितक्या लवकर तो बरा होऊ शकतो. सध्याच्या अद्ययावत तंत्रज्ञानामुळे या आजारातून अनेक रुग्ण बरे होऊ लागले आहेत. कर्करोग त्वचा, स्नायू, अस्थी, सांधे, पचनसंस्था, श्वसनसंस्था, रक्ताभिसरणसंस्था, मज्जासंस्था, जननसंस्था, अंतःस्त्रावी ग्रंथी, रक्तपेशी, डोळा, कान, जीभ, स्तन, रससंस्था, इत्यादी कोणत्याही ठिकाणी कर्करोग निर्माण होऊ शकतो.

हा आजार लगतच्या भागांत वाढत जातो किंवा रक्तवाटे पसरू शकतो. भारतामध्ये काही प्रकारचे कर्करोग विशेष प्रमाणात आढळतात. स्त्री-पुरुषांमध्ये कर्करोगाचे प्रमाण थोडे बदलते. भारतात कर्करोगाच्या एकूण रुग्णांपैकी 50 टक्के रुग्ण-तोंडाचा अंतर्भाग, घसा व गर्भाशयाचे तोंड या भागाशी संबंधित असतात असे तज्ञ सांगतात.

एसएमबीटी कॅन्सर इन्स्टीट्युटचा टाटा मेमोरियल कॅन्सर सेंटरसोबत गेल्या दोन वर्षांपासून तांत्रिक करार झाला आहे. यामुळे मोठ्या संख्येने तज्ञ डॉक्टर याठिकाणी उपलब्ध झाले असून अनेक जटील शस्रक्रिया एसएमबीटी कॅन्सर इन्स्टीट्युटमध्ये पार पडलेल्या आहेत. अद्ययावत आणि अत्याधुनिक साधनसामुग्री याठिकाणी उपलब्ध झाल्यामुळे खर्चिक समजल्या जाणाऱ्या अनेक शस्रक्रिया कमीत कमी खर्चात होत आहेत.

या शिबिरात स्रीरोग तज्ञ डॉक्टरांची टीम आलेल्या महिलांची तपासणी करणार आहे. यासोबतच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मोफत पॅप स्मीयर (Pap smear) टेस्ट व स्तनांची सोनोग्राफी म्हणजेच मॅमोग्राफी केली जाणार आहे.

ही आहेत कर्करोगाची लक्षणे

अचानक रक्त पांढरे होणे. भूक मरणे. शरीरात कोठेही अचानक गाठ किंवा बरा न होणारा व्रण तयार होणे. उतारवयात मासिक पाळी थांबल्यावर रक्तस्राव होणे, स्तनांमध्ये गाठ, व्रण होणे, आवाज बदलणे, आवाज बसणे, खोकल्यातून रक्त पडणे, अन्न गिळताना अडकल्यासारखे वाटणे, पोट जड वाटणे, न पचलेले अन्न उलटणे, तोंडात न दुखणारा चट्टा, व्रण अथवा गाठ तयार होणे, लघवीतून किंवा शौचातून रक्तस्राव, बध्दकोष्ठतेची तक्रार, काखेत, जांघेत, गळयात, कडक गाठींचे अवधाण येणे ही लक्षणे असलेल्या रुग्णांनी अधिक माहितीसाठी आमच्या +91 91450 01630 क्रमांकावर संपर्क साधावा किंवा एसएमबीटी हॉस्पिटल धामणगाव आणि नाशकातील एसएमबीटी क्लिनिकला अवश्य भेट देऊन तपासणी करून घ्यावी असे आवाहन हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आले आहे.

एसएमबीटी हॉस्पिटलमधील सुविधा

प्रशस्त १ हजार बेडचे हॉस्पिटल

१०० आयसीयू बेड्स

१७ मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर्स

अद्ययावत कॅथलॅब

१० एनआयसीयू व पीआयसीयू बेड

२४ तास डायलिसिस व औषधालय सुविधा

रुग्णांसाठी मोफत बससुविधा (नाशिक, कसारा व कल्याण येथून दरदिवशी)

पहिल्या तीन दिवसांचे औषधे मोफत

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 283
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

19/07/2026

मध्यरात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रुग्णालयात दाखल; आगामी दौरे आणि कार्यक्रम तूर्तास पुढे ढकलले

04/07/2026

केमिकलयुक्त दूषित पाण्यामुळे बदापूर येथील शेती धोक्यात; विहिरींचे पाणी दूषित, तलावातील मासे मृत

11/06/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अहिल्यानगर व संगमनेरात एलसीबीची धडक कारवाई; अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त, चाळीस गोवंशीय जनावरांची सुटका!

By Annant Ppangarkar18/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- स्थानिक गुन्हे शाखेने अहिल्यानगर (तोफखाना) आणि संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील…

रविवार विशेष लेख — निवडणूक आयोग: गेंडा आणि गेंड्याची कातडी!

18/10/2026

रविवार, १८ ऑक्टोबर —- वाचा तुमचे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

18/10/2026

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.