महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
संगमनेर: ग्रामीण भागातील विद्यार्थी आजच्या प्रगत विज्ञानवादी स्पर्धेत टिकला पाहिजे, यासाठी त्याच्यातील व्यवहार ज्ञानाचा विकास होणे आवश्यक आहे, हे ओळखून तालुक्यातील देवगड विद्यालयात “बाल आनंद मेळावा” आयोजित करण्यात आला होता.
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास डोळ्यांसमोर ठेवून अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात हे विद्यालय नेहमीच अग्रेसर असते. मेळाव्यात विद्यालयातील विद्यार्थ्यांनी 43 खाऊची, 38 भाजीपाल्याची छोटी-छोटी दुकानं लावली होती. तसेच घोडसवारीदेखील या बाल आनंद मेळाव्यात करण्यात आली होती. कार्यक्रमाची सुरवात सरस्वती पूजन व पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.
संस्थेचे रजिस्ट्रार एम. एम.फटांगरे यांनी आजची बदलेली शिक्षण प्रणाली व आपली जबाबदारी या संदर्भात मार्गदर्शन करताना शाळा ही आदर्श नागरिक घडवणारी प्रयोगशाळा असल्याचे सांगितले. डॉ. प्रमोद पावसे, आनंदराव कढणे यांनी आपल्या भाषणात शाळा, विद्यार्थी आणि त्यांचा सर्वांगीण विकास या बद्दल मत व्यक्त केली.
बाल आनंद मेळाव्यात आपल्या संस्कृतीतील विविध सण उत्सव यांची माहिती देणारे देखावे अनिता दिवटे यांच्या मदतीने विद्यालयातील विद्यार्थिनींनी केले. विद्यार्थ्यांनी कांदा, मुळा, बटाटा, मेथी, पालक,बटाटा,पेरू, मिरची, हावरी, चिंचा, शेवगा, पतंग, मसाला दूध, चहा, वडापाव, चुलीवरची भजी, पाव भाजी, भेळ, गुलाबजामुन, पुरीभाजी, कच्छी दाबेली, तसेच अनेक घरुपयोगी पदार्थ विक्रीसाठी आणले होते. या मेळाव्यात ४७७५२/- रुपयाची उलाढाल झाली. बालगोपालांच्या मंडईमध्ये त्यांचे मनोरंजनासाठी आर्मी, शक्तिमान, स्पायडरमॅन, पोतराज, हनी-बनी, बाहुला, जोकर अशा अनेक वेशभूषा करून विद्यार्थी सहभागी झाले होते. पाहुणे, विविध पदाधिकारी ग्रामस्थ यांनी खरेदीचा आनंद घेतला.
कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष आनंदराव कढणे, उपाध्यक्ष रामदास राहणे, रजिस्ट्रार एम. एम. फटांगरे,सेक्रेटरी अनिल कढणे, खजिनदार विठ्ठल कढणे, सह सेक्रेटरी अशोक राहणे तसेच हिवरगाव पावसाचे सरपंच सुभाष गडाख, उपसरपंच सुजाता दवंगे, तंटामुक्तीचे अध्यक्ष डॉ. विजय पावसे, डॉ. प्रमोद पावसे, निमगाव टेंभीचे सरपंच नानासाहेब वर्पे, देवगड देवस्थानचे विश्वस्त काशिनाथ पावसे, ग्रामपंचायत सदस्य भीमाशंकर पावसे, किरण पावसे , सामाजिक कार्यकर्ते यादवराव पावसे, गणपत पावसे, डॉ. संदीप पावसे, चंद्रशेखर गडाख, कैलास दिवटे, सोमनाथ दवंगे, सुधाकर दवंगे, शांताराम वर्पे, संतोष शिंदे, रघुनाथ गुळवे, बबनराव शिंदे, सचिन सस्कर, विद्युत पावसे, चंद्रकांत भालेराव, अनिल वर्पे, गणेश वर्पे, जी. एन. राहणे, सी. एल. राहणे, चंदनेश्वर विद्यालयाचे प्राचार्य अशोक खेमनर, उपमुख्याध्यापक एस. व्ही. कढणे, एस. एम. राहणे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, ग्रामस्थ, पालक, माजी विद्यार्थी आदी उपस्थित होते.
सूत्रसंचालन सर्जेराव वाघ, अध्यक्षीय सूचना व अनुमोदन श्रीमती हांडे व संतोष तातळे तसेच प्रास्ताविक मदन माने यांनी केले. सांगता मुख्याध्यापक रमेश पावसे यांनी केली. कार्यक्रम, मुलांच्या निरागस हावभावांचे छायाचित्रीकरण ड्रोन कॅमेराच्या साहाय्याने विकास घोगरे व दिनेश थोरात यांनी केले.

