Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अभ्यासू सृजनशील व्यक्तीमत्व : आ. डॉ. सुधीर तांबे
महाराष्ट्र संवाद विशेष

अभ्यासू सृजनशील व्यक्तीमत्व : आ. डॉ. सुधीर तांबे

महाराष्ट्र संवाद न्यूज # वाढदिवस विशेष लेख
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar17/01/2023No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

निरोगी समाजानिर्मीतीसाठी जयहिंद लोकचळवळीच्या माध्यमातून युवा संघटन,युवा उपक्रम, आरोग्य शिबीरे, बचत गट चळवळ, क्रिडा स्पर्धा, सांस्कृतीक स्पर्धा, नोकरी विषयक मेळावे, व्यक्तीमत्व विकास शिबिरे, वाचन मंडळ, अभ्यास मंडळ असे विविध उपक्रम राबवून समाजातील अज्ञान, अंधश्रध्दा, अस्वच्छता या विषयांवर जागृती करुन करुन निकोप व निरोगी समाज निर्मीतीसाठी कार्यरत असणारे नाशिक पदवीधर मतदार संघाचे मनमिळावू स्वभावाचे आ. डॉ. सुधीर तांबे हे समाजकारणातील अभ्यासू व सृजनशील व्यक्तीमत्व म्हणून संपुर्ण महाराष्ट्राला परिचीत आहे.

प्रत्येकासाठी आरोग्य हि जगातील सर्वात मोठी संपत्ती असून वैद्यकिय सेवाही जनसेवा म्हणून काम करतांना जनतेच्या आग्रहाखातर नगराध्यक्ष ते विधान परिषद सदस्य या काळात साहित्य संस्कृती वाचन यांची आवडही त्यांनी जपली. 2009 मध्ये नाशिक पदवीधर मतदार संघातून पुरोगामी विचारांच्या व टीडीएफच्यावतीने निवडणूक लढविणारे आ. डॉ. तांबे यांनी 2010 मध्ये पुन्हा एकदा याच मतदार संघातून ऐतिहासिक विजय मिळविला. संगमनेर तालुक्याला थोर स्वातंत्र्य सेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या समृध्द विचारांचा वारसा लाभला आहे. त्याच्या विचारांवर काम करत राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी महसूलसारख्या महत्वाच्या खात्याची जबाबदारी सांभाळतांना संपुर्ण नगर जिल्ह्याला अभिमानास्पद असे काम राज्यात केले आहे. आज उभा महाराष्ट्र त्यांच्या सुस्कृंत नेतृत्वाकडे मोठ्या आशेने पाहतो आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आ. डॉ. तांबे यांनी काम करतांना तळागळातील माणसाला केंद्रबिंदु मानुन विकासाची गंगा त्यांच्या घरापर्यंत पोहचविण्याचे काम केले आहे.

सुसंस्कृत राजकारणाचा वसा त्यांनी जपला आहे. म्हणून तर खान्देशातील चोपडा, रावेर ते नगरमधील जामखेडपर्यंत ते लोकप्रिय ठरले आहेत. सतत हसतमुख स्वभाव, सहज होणारा संपर्क आणि कामाच्या पाठपुराव्याची पध्दत यामुळे पाच जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात साहेब लोकप्रिय झाले असून या तालुक्यांमधील कार्यकर्त्यांचा सतत ओघ त्यांच्याकडे दिसतो.

विधान परिषदेत काम करतांना शिक्षक सेवकांच्या मानधनाची वाढ, सर्वांसाठी आरोग्य विमा योजना, बेरोगार महामंडळ, 1 जाने 2005 पासून सर्व कर्मचार्‍यांना निवृत्ती वेतन योजना लागू अशा विविध महत्वांच्या प्रश्‍नासाठी सातत्याने पाठपुरावा करुन त्यांनी प्रश्न मार्गी लावले आहे. विनाअनुदानीत शाळांचे प्रश्‍न तसेच तेथे काम करणारे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे प्रश्‍न सातत्याने आग्रहपुर्वक मांडणी करुन मार्गी लावले आहे. डॉक्टर, वकील, शासकीय, निमशासकीय कर्मचारी, शेतकरी, विद्यार्थी, महिला, तरुण अशा अनेकांच्या विविध अडचणी तत्परतेने सोडवितांना संबधीत प्रश्‍नांसाठी केलेला पाठपुरावा प्रत्येकाच्या आयुष्यात ठेवा म्हणून जपला जात आहे. यामुळे सातत्याने त्यांच्यासोबत माणसं जोडली जात आहे. काम करतांना तांबे कधीच कोणताही भेदभाव करत नाही. यामुळे पक्षविरहीत अनेक कार्यकर्ते जिवलग मित्र झाले आहेत.

संपूर्ण खानदेशात डॉ. तांबे यांच्या रुपाने जनतेला हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात राज्यात महत्चाची जबाबदारी सांभाळत असताना खानदेशातील अनेक प्रश्‍न तांबे साहेबांच्या माध्यमातून मार्गी लागलेली आहे. त्यांची अफाट स्मरणशक्ती ही सर्वांना अचंबित करणारी आहे. एकदा भेट झाली की नाव घेवुन हाक मारण्याची पध्दत यामुळे उत्तर महाराष्ट्रात अनेक युवक पहिल्या भेटीतच साहेबांचे चाहते झाले आहेत. नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांची साहेबांना अनमोल साथ मिळाली साहेबांच्या यशात महत्वपुर्ण वाटा उचलतांना महिला सबलीकरणासाठी जयहिंद महिला मंचच्या माध्यमातून अनेक उपक्रम त्यांनी राबविले आहेत.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या प्रेरणेतून सुरु झालेल्या दंडकारण्य अभियानाचे मुख्य प्रवर्तक असणार्‍या तांबे यांनी हे अभियान सातपूडा पर्वतांपर्यत पोहचविले. एक प्रेमळ मनाचा माणूस म्हणून सर्व युवापीढी तांबे यांच्याकडे बघत आहे. प्रत्येक गोष्टीतील अभ्यास, नवीन तंत्रज्ञानाची माहिती, मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व यामुळे युवकांचे आयकॉन म्हणून तांबे साहेब हे सर्वांपुढे आदर्शवत आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त अमृतवाहिनी परीवाराच्या लाख लाख शुभेच्छा!

नामदेव कहांडळ

 

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 194
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

By Annant Ppangarkar16/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहराच्या पायाभूत सुविधा विकासाला चालना देण्यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांच्या…

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.