Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » खुनाच्या आरोपावरून अटकेत असलेल्या आरोपीची न्यायालयाने केली मुक्तता
न्यायालय

खुनाच्या आरोपावरून अटकेत असलेल्या आरोपीची न्यायालयाने केली मुक्तता

अकोले तालुक्यातील घटना
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar22/01/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
संगमनेर : व्याजाचे पैसे मागितल्याच्या कारणातून झालेल्या बाचाबाचीची परिणती खुनामध्ये झाली होती. खुनाच्या आरोपावरून अटकेत असलेल्या आरोपीची न्यायालयाने मुक्तता केली आहे. तसेच तुरुंगात असलेल्या आरोपीला तात्काळ सोडण्याचे आदेश संगमनेरचे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश वाय. पी. मनाठकर यांनी दिले आहे.
तुकाराम बुधा उघडे रा. उंचखडक खुर्द, ता. अकोले याने गावातील कैलास यशवंत घोडके याला नऊ ते दहा वर्षांपूर्वी व्याजाने दहा हजार रुपये दिले होते. घोडके याने ही रक्कम उघडे यांना परत केली होती. मात्र त्यावरील व्याज दिलेले नव्हते, त्यामुळे तुकाराम उघडे हे घोडके यांच्याकडे व्याजाची मागणी करत असत. १ ऑगस्ट २०२० रोजी संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास गावातील बस स्टँडवर व्याजाच्या पैशावरून वाद झाले. या वादात आरोपी कैलास घोडके याने खाली पडलेली वीट उचलून ती तुकाराम उघडे यांच्या डोक्यात मारली होती. तुकाराम उघडे यांना काही लोकांनी अकोले येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले होते.
मात्र तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचा अहवाल वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला होता. यासंदर्भात मृताचा भाऊ नामदेव बुधा उघडे याने अकोले पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी कैलास घोडके यांच्या विरोधात खुनाचा आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी आरोपी घोडके याला अटक करून त्याच्या विरोधात न्यायालयात आरोप पत्र दाखल केले होते. आरोपी घोडके याने त्याच्यावरील आरोप नाकारले. संगमनेरच्या अतिरिक्त सत्र न्यायालयात या खटल्याची सुनावणी दोन वर्षांपासून सुरू होती. न्यायाधीश वाय. पी. मनाठकर यांच्यासमोर चाललेल्या या खटल्यात आरोपी विरोधात दोषारोप सिद्ध करण्यासाठी सरकार पक्षाच्या वतीने पाच साक्षीदार तपासण्यात आले होते.
न्यायालयासमोर सरकार पक्षाला आरोपी विरोधात दोषारोप सिद्ध करता आले नाही. न्यायालयासमोर आलेल्या साक्षी पुराव्यांचा विचार करत न्यायाधीश वाय. पी. मनाटकर यांनी आरोपी कैलास यशवंत घोडके याची सर्व आरोपातून मुक्तता केली आहे. तसेच तुरुंगात असलेल्या आरोपीला तात्काळ सोडण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 346
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026

अहिल्यानगरमध्ये वकिलाच्या हत्येप्रकरणी ७ आरोपींना मरेपर्यंत जन्मठेप; जिल्हा न्यायालयाचा मोठा निकाल

28/08/2026

चेक बाऊन्स प्रकरणी संगमनेर येथील सराफाला ६ महिने कारावास आणि साडेसहा लाखांच्या भरपाईचा आदेश

19/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

By Annant Ppangarkar01/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  (विशेष प्रतिनिधी): संगमनेर शहरातील खांडेश्वर मंदिरात दर्शनासाठी आलेल्या एका…

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026

आज मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

01/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.