Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पैशाऐवजी उद्दिष्टांसाठी व्यवसाय करा: निलेश चव्हाण
शिक्षण

पैशाऐवजी उद्दिष्टांसाठी व्यवसाय करा: निलेश चव्हाण

भिकुसा विद्यालयात उद्योजक आपल्या भेटीला प्रकल्प
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar05/02/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
२० लाख रुपयांनी तोट्यात असलेला व्यवसाय वार्षिक १०० कोटींचा होतो. आपत्ती आली तरी आपण सकारात्मक वृत्तीने सामोरे गेल्यास ही प्रगती होते. उघड्या डोळ्यांनी स्वप्न पहा, भावना जपून व्यवसाय करण्याऐवजी बुध्दी चातुर्याने करा, प्रत्येक संधीचा लाभ घ्या, आपला इगो शून्य करा, पैशांसाठी व्यवसाय करण्यापेक्षा उद्दिष्टांसाठी व्यवसाय करा असे प्रतिपादन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे सदस्य व साई ऍक्युम्युलेटर इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड संगमनेरचे व्यवस्थापकीय संचालक निलेश चव्हाण यांनी केले.
सिन्नर येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या भिकुसा हायस्कूल येथे करियर मार्गदर्शन उपक्रमांतर्गत ‘ उद्योजक आपल्या भेटीला ‘ या कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक सोमनाथ जगदाळे होते.
निलेश चव्हाण म्हणाले, व्यवसायासाठी योजना हवी. अनेक नवीन व्यवसाय सुरू होतात १०० पैकी ९५ व्यवसायांमध्ये लोकांना अपयश येते. मात्र ५ टक्के लोक वेगळ्या योजनेनुसार व्यवसाय करतात. त्यांना यश प्राप्त होते. व्यवसायासाठी आत्मविश्वासच आपल्याला तारतो. आपल्या व्यवसायाची वेगळी ओळख आपण निर्माण केली पाहिजे त्यासाठी आपल्याकडे संवाद कौशल्य असणे आवश्यक आहे. आत्मविश्वासासाठी पैसे मोजावे लागत नाही. व्यवसायातील कर्मचाऱ्यांना आपण जपले पाहिजे. पैशांसाठी व्यवसाय करण्याऐवजी उद्दिष्टांसाठी व्यवसाय करायला हवा. ज्या गोष्टीचा आपण सातत्याने विचार करतो त्याच गोष्टी आपण आकर्षित करतो म्हणून आपल्या डोक्यात नेहमी व्यवसायाचाच विचार हवा. आपत्ती आली तरी खचून न जाता नियतीने आपली परीक्षा बघितली आहे असे समजून आपण आपत्तीला सामोरे गेले पाहिजे.
व्यवसायामध्ये वेळेची किंमत महत्त्वाची असते. व्यवसाय करत असतानाही आपण मित्र जपले पाहिजेत. आयुष्यात एखादी आपत्ती आल्यानंतर मित्रच संकट दूर करण्यासाठी खंबीरपणे उभे राहतात. याप्रसंगी भिकुसा विद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील दैदीप्यमान यशाबद्दल निलेश चव्हाण यांनी क्रीडा शिक्षक रामनाथ जाधव व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविक भाषणात सुनील कडलग म्हणाले, प्रेरणादायी व यशस्वी उद्योजकांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांच्या जीवनाला दीपस्तंभासारखे दिशादिग्दर्शन करेल. म्हणूनच या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आपल्या अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक सोमनाथ जगदाळे म्हणाले, स्पर्धेच्या युगामध्ये कौशल्य असतील तर आपण यश प्राप्त करू शकतो. विद्यालयाच्या करिअर मार्गदर्शन उपक्रमातून विद्यार्थ्यांना जीवनाचा मार्ग मिळू शकतो.
याप्रसंगी साक्षी बाहीकर, प्रगती घोरपडे, पायल होलगीर, दिव्या आंधळे, भगेश मोहिते, सुश्मित कोळगे, रोहित कापडणे, सुयोग गोरे, अस्मिता सांगळे, गौरव मगर आदी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना निलेश चव्हाण यांनी उत्तरे दिली. शितल भसे यांनी आभार व्यक्त केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 159
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अमृतवाहिनी विद्यापीठाचे नाव गुणवत्तेमुळे देशात मोठे राहील: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

18/08/2026

यू डायस अहवाल: राज्यातील हजारो शाळा पायाभूत सुविधांअभावी अंधारात, डिजिटल शिक्षणाचा दावा ठरतोय फोल

17/07/2026

मंदिरांप्रमाणेच ‘ज्ञानमंदिरांना’ दान द्या, तरच सामर्थ्यशाली देश उभा राहील: डॉ. दत्तात्रय आहेर

16/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सांत्वन

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

By Annant Ppangarkar02/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: जवळेकडलग येथील अकरा वर्षीय बालक कृष्णा वसंत पवार याचा…

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026

सत्याचा आवाज, लेखणीचा पहारेकरी – ज्येष्ठ पत्रकार अनंत पांगारकर यांचा आंबेडकरी चळवळीच्यावतीने हृद्य सत्कार

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.