Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » श्रीमंतीपेक्षा दातृत्वाचा ठेवा महत्त्वपूर्ण: गटशिक्षणाधिकारी सुवर्णा फटांगरे
शिक्षण

श्रीमंतीपेक्षा दातृत्वाचा ठेवा महत्त्वपूर्ण: गटशिक्षणाधिकारी सुवर्णा फटांगरे

कडलग व इनरव्हीलच्या माध्यमातून रामवाडीच्या शाळेत डिजिटल शिक्षण
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar11/02/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
संगमनेर
श्रीमंतीपेक्षा दातृत्वाचा ठेवा सर्वाधिक महत्त्वाचा असून या दातृत्वाने कडलग परिवाराने नावलौकिक प्राप्त केला आहे, असे प्रतिपादन पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी सुवर्णाताई फटांगरे यांनी केले.
इनरव्हील क्लबच्या संकल्पनेतून सुनील कडलग व वृषाली कडलग यांनी आपल्या मातोश्री स्व. शकुंतला किसनराव कडलग यांच्या स्मरणार्थ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामवाडी या शाळेला दिलेल्या डिजिटल सॉफ्टवेअर उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. मान्यवरांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना चित्रकला वही, रंगपेटी व गोष्टींची पुस्तके बक्षीस म्हणून देण्यात आली.
फटांगरे म्हणाल्या, या डिजिटल सॉफ्टवेअरमुळे रामवाडीच्या विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावणार आहेत. दुर्गम शाळेतील विद्यार्थी डिजिटल सॉफ्टवेअरमुळे आपल्या अभ्यासात नक्कीच प्रगती करतील.
कडलग परिवार व इनरव्हील क्लब या विद्यार्थ्यांच्या व शाळेच्या पाठीशी नेहमी भक्कमपणे उभे असेल, असे मत इनरव्हील क्लबच्या अध्यक्ष वृषाली कडलग यांनी व्यक्त केले.
केंद्रप्रमुख अशोक गोसावी यांनी शाळेतील उपक्रमांचे कौतुक करत विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.
इनरव्हील क्लब व कडलग परिवाराने औदार्य दाखवत रामवाडीच्या जिल्हा परिषद शाळेला दिलेले सॉफ्टवेअर येथील विद्यार्थ्यांच्या जीवनात क्रांती घडवून आणेल. इनरव्हील क्लब व कडलग परिवाराचे आभार मानत शाळेत चालू असणाऱ्या उपक्रमांची माहिती प्रास्ताविकातून मुख्याध्यापक केशव घुगे यांनी सांगितली.
याप्रसंगी ग्रामस्थांमार्फत व्यवस्थापन समिती सदस्य संजय खरात व भास्कर गोसावी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपाध्यापिका सुरेखा आंधळे यांनी केले तर आभार व्यवस्थापन समिती अध्यक्ष रविना खरात यांनी मानले.
शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष संतोष खरात यांनी सर्व विद्यार्थी व उपस्थित पालकांना गुळलापशी,भात व कढी असे सुंदर मिष्टान्न भोजन दिल्याबद्दल त्यांच्या सौभाग्यवती मोहिनी खरात यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी इनरव्हील क्लबच्या सदस्या सुनीता गाडे, सरपंच सुवर्णाताई घुगे, उपसरपंच दत्तू खरात,ग्रामसेविका रुपाली कहाणे, व्यवस्थापन समिती अध्यक्ष रविना खरात, संदिप खरात, सोमनाथ खरात, भागवत नागरे, योगिता खरात, प्रकाश खरात,अनिल खरात, सन्तु खरात, सुखदेव खरात, आनंदा खरात, मधुकर खरात, अंगणवाडी सेविका संगीता मुंतोडे, स्वप्नाली भालेराव, सुरेश भालेराव, सतीश गिरी, मदतनीस खरातताई, विशेष शिक्षक महेश काळे तसेच परिसरातील सर्व पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 326
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अमृतवाहिनी विद्यापीठाचे नाव गुणवत्तेमुळे देशात मोठे राहील: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

18/08/2026

यू डायस अहवाल: राज्यातील हजारो शाळा पायाभूत सुविधांअभावी अंधारात, डिजिटल शिक्षणाचा दावा ठरतोय फोल

17/07/2026

मंदिरांप्रमाणेच ‘ज्ञानमंदिरांना’ दान द्या, तरच सामर्थ्यशाली देश उभा राहील: डॉ. दत्तात्रय आहेर

16/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सांत्वन

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

By Annant Ppangarkar02/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: जवळेकडलग येथील अकरा वर्षीय बालक कृष्णा वसंत पवार याचा…

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026

सत्याचा आवाज, लेखणीचा पहारेकरी – ज्येष्ठ पत्रकार अनंत पांगारकर यांचा आंबेडकरी चळवळीच्यावतीने हृद्य सत्कार

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.