Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » महाज्योतीच्यावतीने जिल्ह्यात ७०२ विद्यार्थ्यांना मोफत टॅब; खासदार डॉ. ‌सुजय विखे पाटील यांच्या हस्ते वाटप
शिक्षण

महाज्योतीच्यावतीने जिल्ह्यात ७०२ विद्यार्थ्यांना मोफत टॅब; खासदार डॉ. ‌सुजय विखे पाटील यांच्या हस्ते वाटप

इतर मागास बहूजन कल्याण विभागाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar12/02/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
अहमदनगर
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपूर यांच्या मार्फत अहमदनगर जिल्ह्यातील ७०२ विद्यार्थ्यांना खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांच्या हस्ते मोफत टॅबचे रविवारी वितरण करण्यात आले.
यावेळी इतर मागासवर्ग बहूजन कल्याण विभागाचे नाशिक विभाग उपसंचालक डॉ. भगवान वीर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुनील पठारे, जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप, समाजकल्याण सहायक आयुक्त राधाकिसन देवढे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
महाज्योती या संस्थेमार्फत महाराष्ट्रातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास-प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक युगात समान संधी प्राप्त व्हावी या हेतूने पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण, जीईई, नीट, एमएचटी-सीईटी, एमपीएससी, युपीएससी आदी स्पर्धात्मक परीक्षांचे प्रशिक्षण देण्यात येते.
या योजनेअंतर्गत अहमदनगर जिल्हयातील विदयार्थ्यांसाठी महाज्योतीमार्फत ९६१ टॅब प्राप्त झाले आहेत. यापैकी ७०२ टॅबचे आज वितरण करण्यात आले. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्याला ऑनलाईन शिक्षणासाठी मोफत टॅबलेट सोबत दररोज ६ जीबी इंटरनेटचा डाटा मोफत दिला जातो.
उर्वरित २५९ टॅबचे अद्याप वितरण बाकी आहे. हे टॅब प्राप्त करून घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःचे व पालकांचे आधारकार्ड, नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, इयत्ता १० वीचे गुणपत्रक व बोनाफाईड प्रमाणपत्रासह अहमदनगरच्या सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन श्री. देवढे यांनी केले आहे.
डॉ. वीर म्हणाले, महाज्योती मोफत टॅबलेट योजना राज्यातील विद्यार्थ्यांना डिजिटली दुनियेत एक पाऊल पुढे जाण्यासाठी उपयुक्त ठरेल. राज्यातील विद्यार्थ्यांचे जीवनमान सुधारेल. या योजनेअंतर्गत राज्यातील विद्यार्थी सशक्त व आत्मनिर्भर बनतील.

खासदार डॉ. विखे पाटील यावेळी म्हणाले की,
महाज्योतीच्या टॅबमुळे अभ्यासासाठी उपयुक्त असलेल्या प्रशिक्षणाची पुस्तके अपलोड करता येणार आहेत‌. ऑनलाईन पद्धतीने स्वतःचा अभ्यास पूर्ण करता येणार आहे. विद्यार्थी दुसऱ्या विद्यार्थ्यांसोबत तसेच आपल्या शिक्षकांसोबत अभ्यासासंबंधीच्या प्रश्नांची उत्तरे मिळवू शकणार आहेत‌. टॅब हे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी वरदान ठरणार आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 130
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अमृतवाहिनी विद्यापीठाचे नाव गुणवत्तेमुळे देशात मोठे राहील: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

18/08/2026

यू डायस अहवाल: राज्यातील हजारो शाळा पायाभूत सुविधांअभावी अंधारात, डिजिटल शिक्षणाचा दावा ठरतोय फोल

17/07/2026

मंदिरांप्रमाणेच ‘ज्ञानमंदिरांना’ दान द्या, तरच सामर्थ्यशाली देश उभा राहील: डॉ. दत्तात्रय आहेर

16/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सांत्वन

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

By Annant Ppangarkar02/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: जवळेकडलग येथील अकरा वर्षीय बालक कृष्णा वसंत पवार याचा…

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026

सत्याचा आवाज, लेखणीचा पहारेकरी – ज्येष्ठ पत्रकार अनंत पांगारकर यांचा आंबेडकरी चळवळीच्यावतीने हृद्य सत्कार

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.