Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » राष्ट्र उभारणीत शिक्षकांचे महत्त्वपूर्ण योगदान; पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील
शिक्षण

राष्ट्र उभारणीत शिक्षकांचे महत्त्वपूर्ण योगदान; पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील

इनरव्हील राष्ट्रबांधणीचे शिल्पकार पुरस्काराचे वितरण
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar13/02/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
राष्ट्राच्या उभारणीत ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांचे मोठे योगदान आहे. म्हणूनच सामर्थ्य संपन्न राष्ट्र निर्मिती करणाऱ्या शिक्षकांना राष्ट्र बांधणीचे शिल्पकार पुरस्काराने सन्मानित करण्याचे इनरव्हीलचे कार्य कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखरपाटील यांनी केले.
येथील इनरव्हील क्लब ऑफ संगमनेरतर्फे जिल्ह्यातील ४२ शिक्षकांना इनरव्हील राष्ट्रबांधणीचे शिल्पकार पुरस्काराने व पाच शाळांना पर्यावरण पूरक, उपक्रमशिल व आनंदी शाळा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्या प्रसंगी शेखर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इनरव्हील क्लबच्या प्रेसिडेंट वृषाली कडलग, प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, इनरव्हील जिल्हा ३१३ च्या प्रेसिडेंट रचना मालपाणी, ज्ञानेश्वर काजळे, गणेश काजळे, गटशिक्षणाधिकारी सुवर्णा फटांगरे, प्रकल्पप्रमुख सुनीता कोडे, शुभलक्ष्मी बेलापुरकर उपस्थित होत्या. या कार्यक्रमादरम्यान डॉ. बी.जी. शेखर पाटील यांच्या शूरवीर सरसेनापती संताजी या ग्रंथाचे प्रकाशनही करण्यात आले.
डॉ. शेखर पुढे म्हणाले, सद्यस्थितीत समाजात कुटुंब व्यवस्था धोक्यात आल्याचे चित्र दिसत आहे. पोलिसांना विभक्त पती-पत्नींना समुपदेशन करून एकत्र आणण्याचे कार्य करावे लागत आहे. कुटुंब व्यवस्था चांगली राखण्यासाठी शिक्षक विद्यार्थ्यांवर संस्कार करू शकतात. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये वेगवेगळे गुण असतात ते हेरून त्यांना प्रोत्साहन दिल्यास व त्यांचा आत्मविश्वास वाढविल्यास बलशाली राष्ट्रनिर्मिती होईल. आपण शिक्षणाकडे गुंतवणूक म्हणून बघितले पाहिजे.
माजी आ. सुधीर तांबे म्हणाले, शिक्षक ही राष्ट्राची संपत्ती आहे. गावोगावी मंदिरे बांधली जातात त्याला माझा विरोध नाही. मात्र शिक्षण मंदिरांची अवस्था बिकट होत असताना ती बांधण्यासाठी समाजाने पुढे आले पाहिजे. इतर शाळांपेक्षा जिल्हा परिषदेच्या शाळांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली असल्याचा दावा त्यांनी केला.
आपल्या प्रास्ताविक भाषणात इनरव्हील क्लबच्या प्रेसिडेंट वृषाली कडलग यांनी कार्यक्रमाचा हेतू विषद केला. आंतरराष्ट्रीय पातळीवर सामाजिक काम करणाऱ्या क्लबकडून शिक्षकांचा सन्मान होणे ही महत्त्वपूर्ण बाब असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मालपाणी म्हणाल्या, ज्या समाजात शिक्षकांना प्रतिष्ठा दिली जाते त्या समाजाचे व राष्ट्राचे भवितव्य उज्वल असते.
यावेळी ज्ञानेश्वर काजळे, सुवर्णा फटांगरे यांचीही भाषणे झाली. सूत्रसंचालन स्मिता गुणे यांनी केले. शुभलक्ष्मी बेलापूरकर यांनी इनरव्हील प्रार्थना सादर केली. सुनिता कोडे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. तर आभार वैशाली खैरनार यांनी मानले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 502
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अमृतवाहिनी विद्यापीठाचे नाव गुणवत्तेमुळे देशात मोठे राहील: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

18/08/2026

यू डायस अहवाल: राज्यातील हजारो शाळा पायाभूत सुविधांअभावी अंधारात, डिजिटल शिक्षणाचा दावा ठरतोय फोल

17/07/2026

मंदिरांप्रमाणेच ‘ज्ञानमंदिरांना’ दान द्या, तरच सामर्थ्यशाली देश उभा राहील: डॉ. दत्तात्रय आहेर

16/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

By Annant Ppangarkar03/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: जिल्ह्यातील अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिलेल्या…

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.