Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » महसूल मंत्री विखेंच्या पुढाकारातून महसूल अधिकारी पुण्याऐवजी प्रथमत:च लोणीत गिरविणार नवीन कायदे सरकारी धोरणाचे धडे
प्रशासन

महसूल मंत्री विखेंच्या पुढाकारातून महसूल अधिकारी पुण्याऐवजी प्रथमत:च लोणीत गिरविणार नवीन कायदे सरकारी धोरणाचे धडे

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत यावर्षीची महसूल परिषद 'यशदा'ऐवजी मेडिकल कॉलेजमध्ये
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar20/02/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
पुण्यासारख्या मोठ्या शहरात होणारी महसूल परिषद यावर्षी पुण्यामध्ये न होता महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारातून पहिल्यांदाच ग्रामीण भागात लोणी येथील मेडिकल कॉलेजमध्ये होत आहे.

महसूल विभागातील अधिकाऱ्यांना नवीन कायदे आणि सरकारी धोरणाबाबत प्रशिक्षण देण्यासाठी दरवर्षी महसूल परिषद घेतली जात असते. यावर्षी येत्या 22 आणि 23 फेब्रुवारी असे दोन दिवस ही परिषद होत असून या परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. तर समारोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होईल.

महसूल विभागाच्या वतीने या परिषदेचे आयोजन करण्यात आले असून राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील दोन्ही दिवस या परिषदेला उपस्थित राहणार आहे. याशिवाय महसूल विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांपासून सर्व महसूल विभागाचे आयुक्त, राज्यातील 36 जिल्हाधिकारी, 36 अप्पर जिल्हाधिकारी, जमाबंदी आयुक्त, नोंदणी महानिरीक्षक, मंत्रालयातील महसूल विभागाचे सर्व उपसचिव, काही विभागांचे अप्पर मुख्य सचिव आणि प्रधान सचिव असे जवळपास राज्यातील शंभराहून जास्त अधिकारी या परिषदेला उपस्थित राहतील.

शासनाकडून दिले जाणारे प्रशिक्षणाचे कार्यक्रम हे पुण्यातील यशदा या संस्थेमध्ये होत असतात. त्यामुळे आत्तापर्यंत महसूल परिषदेचे आयोजनही यशदामध्येच केले जात होते. महसूल अधिकाऱ्यांना पुणे मुंबई येथे होणारे प्रशिक्षण कार्यक्रम सोयीचे वाटत असते. जाण्या-येण्याची सोय राहण्याची व्यवस्था या दृष्टीने पुण्याची निवड केली जाते. मात्र यावेळी महसूल मंत्री विखे यांनी हा प्रघात मोडून यशदा ऐवजी अहमदनगर जिल्ह्यात थेट आपल्या लोणी गावातील प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स या संस्थेत परिषदेचे आयोजन केले आहे.

महसूल खात्याचा संबंध हा बहुतांशी शेतीशी येतो, पुण्या मुंबईत बसणाऱ्या आयुक्त आणि सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांनी यानिमित्ताने ग्रामीण भागात येऊन तळागाळातील महसूल कर्मचाऱ्यांशी संवाद साधने अपेक्षित आहे. शेतकरी आणि सामान्य माणसाला सातत्याने भेडसावणाऱ्या समस्या या निमित्ताने सोडविणे सोपे जाईल हा या मागचा हेतू असल्याचे सांगितले जाते.

मंत्री विखे पाटील हे नेहमी आपल्या आगळ्यावेगळ्या कार्यशैलीसाठी परिचित आहेत. याच दृष्टिकोनातून त्यांनी हा निर्णय घेतला आहे. परिषदेसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांची राहण्याची गैरसोय टाळण्यासाठी त्यांची शिर्डीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. यानिमित्ताने राज्यातील महसूल अधिकाऱ्यांना साई दर्शन देखील होईल.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 172
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

उसनवारीवरील कर्मचाऱ्यांना १० सप्टेंबरपर्यंत मूळ विभागात पाठवा; मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर मुख्य सचिवांचे कडक आदेश

25/08/2026

राज्यात खळबळ..! तहसीलदार निलंबित; ‘ते’ प्रकरण भोवलं

14/08/2026

स्वातंत्र्यदिनी भंडारदरा, कळसूबाई फिरण्याचा प्लॅन आहे? आधी पोलिसांचे ‘हे’ नवीन वाहतूक नियम नक्की वाचा!

12/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

By Annant Ppangarkar30/08/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर : खरीप हंगामातील पिकांची वाढती गरज आणि पिण्याच्या…

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026

वाळू तस्करांवर कारवाई, ट्रॅक्टरसह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक तर तिघे फरार

30/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.