Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » भररस्त्यात महिलेला मारहाण करणे पोलीस निरीक्षकाला भोवले; मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांनी केले निलंबन
प्रशासन

भररस्त्यात महिलेला मारहाण करणे पोलीस निरीक्षकाला भोवले; मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांनी केले निलंबन

अहमदनगरमधील सुपा येथे घडली होती घटना
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar01/03/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज
पोलीस अधिकारी असूनही भर रस्त्यात गुंडा सारखे वर्तन करत महिलेला मारहाण करण्याचे प्रकरण सुपा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकाच्या चांगलेच अंगलट आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यातील पोलीस दलात फेरबदल करताना या निरीक्षकाची उचल बांगडी केली होती. मात्र आता काही तासातच पोलीस निरीक्षक गोकावे याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निलंबन केल्याची माहिती समोर येत आहे.

मंगळवारी सुपा टोल नाक्यावर पोलीस निरीक्षक गोकावे यांनी एका महिलेला बेदम मारहाण करण्याचा प्रकार घडला होता. याबाबतचे सीसीटीव्ही फुटेज समाज माध्यमात व्हायरल झाल्यानंतर अहमदनगर मधील दैनिक ‘नगर सह्याद्री’ने या प्रकरणाला वाचा फोडली होती. राज्यभर या प्रकरणाने खळबळ उडाली होती.

भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रमुख चित्रा वाघ यांनी देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेत याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास हा प्रकार आणला होता. याची दखल शिंदे-फडणवीस सरकारला घ्यावी लागली. पोलीस निरीक्षक नितीनकुमार गोकावे यांचे निलंबन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ घेतला.

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी यासंबंधीची माहिती दिली. त्या म्हणाल्या, अहमदनगर जिल्ह्यातील सुपा येथे मंगळवारी अतिशय संताप जनक घटना घडली. सुप्याचा पीआय गोकावे याने एका महिलेला भर रस्त्यात मारहाण केली. या घटनेचे तात्काळ दखल घेत शिंदे फडणवीस सरकारने संबंधित पोलीस निरीक्षक गोकावे याला सस्पेंड केले आहे.

महाराष्ट्रात महिला आणि मुलींकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्यांची गय केली जाणार नाही. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये भयमुक्त आणि भीती मुक्त महाराष्ट्राचे दर्शन होताना दिसते. यापूर्वी देखील बऱ्याच घटनांमध्ये दोन डझनहून अधिक पोलिस अधिकाऱ्यांना सस्पेंड करण्याचे काम शिंदे-फडणवीस सरकारने केले आहे. महाराष्ट्राच्या मातृशक्तीकडून शिंदे-फडणवीस सरकारचे आभार.

पोलीस अधीक्षकांनी काही तासांपूर्वीच केली होती बदली…
अहमदनगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी मंगळवारी सायंकाळी जिल्ह्यातील पोलीस दलात मोठे फेरबदल केले. या फेरबदलात पोलीस निरीक्षक नितीनकुमार गोकावे यांची देखील बदली करण्यात आली होती. मात्र नवीन बदलीचा पदभार स्वीकारण्यापूर्वीच त्यांचे निलंबन करण्यात आले आहे.
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 476
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

उसनवारीवरील कर्मचाऱ्यांना १० सप्टेंबरपर्यंत मूळ विभागात पाठवा; मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर मुख्य सचिवांचे कडक आदेश

25/08/2026

राज्यात खळबळ..! तहसीलदार निलंबित; ‘ते’ प्रकरण भोवलं

14/08/2026

स्वातंत्र्यदिनी भंडारदरा, कळसूबाई फिरण्याचा प्लॅन आहे? आधी पोलिसांचे ‘हे’ नवीन वाहतूक नियम नक्की वाचा!

12/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

By Annant Ppangarkar03/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: जिल्ह्यातील अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिलेल्या…

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.