Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

रविवार विशेष लेख — निवडणूक आयोग: गेंडा आणि गेंड्याची कातडी!

18/10/2026

रविवार, १८ ऑक्टोबर —- वाचा तुमचे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

18/10/2026

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » १५,५०० रुपयांची लाच घेताना सहकार विभागाचा सहाय्यक निबंधक पकडला
गुन्हेगारी

१५,५०० रुपयांची लाच घेताना सहकार विभागाचा सहाय्यक निबंधक पकडला

पतसंस्थेच्या कर्ज वसुली संदर्भात प्रमाणपत्र देण्यासाठी मागितली होती लाच
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar02/03/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज
पतसंस्थेच्या थकीत कर्जदारांना कर्ज वसुलीची नोटीस बजावणीचे कलम 101 प्रमाणे प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात पंधरा हजार पाचशे रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या सहकारी संस्थेच्या सहाय्यक निबंधकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडले आहे.

लाच लुचपत विभागाकडे तक्रार करणारे तक्रारदार हे पाथरे बुद्रुक ता. सिन्नर जि. नाशिक येथील साई लक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेत वसुली विभागात काम करतात. थकीत कर्जदारांवर संस्थेमार्फत कलम 101 प्रमाणे कारवाई करण्यासाठी सहकार विभागाचे प्रमाणपत्र आवश्यक असते.

सिन्नरच्या सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक एकनाथ प्रताप पाटील यांनी या प्रमाणपत्रासाठी एका नोटीस करिता प्रत्येकी दीड हजार रुपयांची मागणी केली होती. सतरा नोटीस करिता पाटील यांनी पंचवीस हजार पाचशे रुपयांची मागणी केली होती.

या संदर्भात तक्रारदाराने नाशिकच्या लाच लुचपत विभागाशी संपर्क साधत तक्रार दिली होती. लाच लचपतच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक एन. एस. न्याहाळदे, वाचक पोलीस उपाधीक्षक नरेंद्र पवार, पोलीस उपाधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक फौजदार सुखदेव मुरकुटे, पोलीस हवालदार पंकज पळशीकर, पोलीस नाईक मनोज पाटील यांच्या पथकाने पाटील याला पंधरा हजार पाचशे रुपयांची लाच स्वीकारताना गुरुवारी पकडले.

पाटील याने स्वीकारलेली लाचेची रक्कम पथकाने ताब्यात घेतली आहे. पाटील याच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

▶️ आवाहन
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी किंवा त्यांच्यावतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ टोल फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क साधावा, असे आवाहन नाशिक अँन्टी करप्शन ब्युरोच्यावतीने करण्यात आले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 703
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
रविवार विशेष

रविवार विशेष लेख — निवडणूक आयोग: गेंडा आणि गेंड्याची कातडी!

By Annant Ppangarkar18/10/20260

प्रवीण पुरो- भारतीय संविधानाने घटनात्मक अधिकार दिलेल्या कोणत्याही संस्थेवर पक्षपातीपणाचा वा राजकीय वरदहस्ताचा आरोप झाला,…

रविवार, १८ ऑक्टोबर —- वाचा तुमचे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

18/10/2026

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.