Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

17/10/2026

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » घारगाव पेट्रोल पंप लूट प्रकरणातील आरोपी पकडण्यात यश; खुनासारख्या गंभीर गुन्ह्याचाही झाला उलगडा
गुन्हेगारी

घारगाव पेट्रोल पंप लूट प्रकरणातील आरोपी पकडण्यात यश; खुनासारख्या गंभीर गुन्ह्याचाही झाला उलगडा

नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar04/03/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज
रिव्हॉल्वरचा धाक दाखवून पेट्रोल पंपावरील अडीच लाख रुपयांचे लूट करणारे, पंचर दुकानदारावर हल्ला करून त्याचे मोटरसायकल लांबविणारे तीन गुन्हेगार नगरच्या स्थानिक पुणे शाखेला पकडण्यात यश आले. पेट्रोल पंपावरील लुटी सोबतच नगरच्या कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका खून प्रकरणाचाही उलगडा या आरोपींकडून करण्यात पोलिसांना यश आले आहे.

गेल्या रविवारी (ता. २६ फेब्रुवारी) संगमनेरच्या पठार भागात साकुर मांडवे रस्त्यावरील भगवान पेट्रोलियम या पेट्रोल पंपावर तिघा सशस्त्र चोरट्यांनी आपल्याकडील दोन्ही दुचाकीमध्ये पेट्रोल भरत पेट्रोल पंपावरील केबिनमध्ये घुसून तेथील कर्मचाऱ्यांना रिव्हॉल्वरचा धाक दाखवून अडीच लाखाची लूट केली होती.

तत्पूर्वी याच आरोपींनी माहूली गावच्या शिवारात एका पंचर दुकानदाराला रिव्हॉल्वरचा धाक दाखवत त्याच्यावर चाकू हल्ला करत त्याला जखमी केले. त्याच्याकडील रोकड आणि मोटर सायकल घेऊन पोबारा केला होता त्यानंतर या तिघांनीही पेट्रोल पंपावर लूट केली असल्याचे समोर आले होते. या दोन्ही घटने संदर्भात घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते.

या घटनेच्या अनुषंगाने स्थानिक घारगाव पोलीस, अहमदनगरच्या गुन्हे शाखेचे पोलीस तपास करत होते. तपासांती पोलिसांना या प्रकरणात राहुरी येथील गुन्हेगारांचा सहभाग असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे पोलीस या संशयित तीनही गुन्हेगारांच्या मागावर होते. ते घरी परतल्याची माहिती मिळतच मागावर असलेल्या पोलीस पथकाने छापा टाकत तिघांनाही ताब्यात घेतले आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केलेल्या चौकशीअंती आरोपींनी साकुर मांडवे रस्त्यावरील भगवान पेट्रोल पंप लुटल्याचे, माहुली येथील पंचर दुकानदारावर हल्ला करून त्याची मोटार सायकल नेल्याचे कबूल केले.

तसेच चौकशीमध्ये आणखी एक धक्कादायक बाब समोर आली असून आरोपींनी गतवर्षी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये बाह्यवळण मार्गावर केलेल्या एका खून प्रकरणाचा उलगडा करण्यात गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाला यश आले आहे. आरोपीची गुन्हे शाखेचे पथक कसून चौकशी करत असून चौकशीअंती आरोपींना तोफखाना (अहमदनगर) आणि घारगाव (संगमनेर) पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार असल्याची माहिती मिळते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 620
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धांदरफळ बुद्रुक गावाच्या शिवारातील बाजारतळावर नवरात्रोत्सवानिमित्ताने…

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

17/10/2026

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026

शनिवार, १७ ऑक्टोंबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.