महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर
संगमनेर शहरातील कोष्टी गल्ली या ठिकाणी जागतिक महिला दिन व शिवजयंती निमित्त शुक्रवार दिनांक १० मार्च रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
जयहिंद लोकचळवळ अंतर्गत जयहिंद महिला मंच, मेडीकव्हर हॉस्पिटल, संगमनेर एसएमबीटी दंत रुग्णालय, अहमदनगर डिस्ट्रीक को. ऑप बँक, रोटरी क्लब, रोटरी आय केअरचे दर्शन रोटरी नेत्र रुग्णालय यांच्या सहकार्याने जागतिक महिला दिन व छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने शुक्रवारी मोफत आरोग्य तपासणी शिबीर सकाळी ९ ते दुपारी १ वाजे पर्यंत कोष्टी गल्ली येथे आयोजित केले आहे.
यामध्ये ब्लड प्रेशर, ब्लड शुगर, ईसीजी (डॉ. सल्ल्यानुसार), हिमोग्लोबीन, कॅल्शियम, शरिरातील ऑक्सिजनचे प्रमाण, पल्सरेट, हॉस्पिटल डिस्काऊंट कुपन, सीपीआर ट्रेनिंग, तज्ञ डॉक्टरांकडून सल्ला व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
डॉ. जतीन ढोबळे (त्वचारोग तज्ज्ञ) यांच्या जनशांती क्लिनिकच्यावतीने त्वचा विकार मोफत तपासणी फंगल (बुरशीजन्य आजार), संसर्गजन्य आजार, सोरायसीस , नायटा, खरुज, इसब, रोटरी क्लब रोटरी आय केअरचे ‘दर्शन रोटरी नेत्र रुग्णालय वतीने मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदु शस्त्रक्रिया शिबीर सल्ला व मार्गदर्शन, एसएमबीटी दंत महाविद्यालय दात काढणे, दातांमध्ये सिमेंट भरणे, दातांची प्राथमिक तपासणी, दात साफ करणे, सवलतीच्या दरात दातांवरील शस्त्रक्रिया सल्ला व मार्गदर्शन अशा पद्धतीने विविध मोफत तपासण्या करण्यात येणार आहे.
यावेळी शिबिराला येताना जुने रिपोर्ट, फाईल सोबत घेवून येणे. तसेच महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजने अंतर्गत मोफत उपचार व शस्त्रक्रिया देखील करण्यात येणार आहे. तरी या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

