Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

01/09/2026

आज सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

31/08/2026

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर पोलिसांनी दरोडाच्या तयारीत असलेली टोळी पकडली; चौघे अटकेत एक जण फरार
गुन्हेगारी

संगमनेर पोलिसांनी दरोडाच्या तयारीत असलेली टोळी पकडली; चौघे अटकेत एक जण फरार

दरोडाच्या साहित्यासह अडीच लाखाचा मुद्देमाल हस्तगत
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar10/03/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज
दरोडाच्या तयारीत असलेली टोळी पकडण्यात पोलीस उपाधीक्षक आणि शहर पोलिसांच्या पथकाला यश आले आहे. टोळीतील चौघांना पोलिसांनी घातक शस्त्रास्त्रासह पकडले तर त्यांचा एक साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाला. गेल्या अनेक दिवसानंतर संगमनेर पोलिसांनी केलेली कामगिरी दिलासादायक ठरली आहे. त्यामुळे येथील कायदा व सुव्यवस्था सुरळीत करण्यासाठी पोलीस निरीक्षक भगवान मथुरे पाऊले टाकतील अशी आशा निर्माण झाली आहे.

अधिक माहिती अशी, पोलीस उपाधीक्षक संजय सातव, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या आदेशावरून दोन दिवसांपूर्वीच्या एका गुन्ह्याच्या तपासासाठी प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक फराहनाज पटेल, पोलीस उपाधीक्षकांच्या पथकातील पोलीस कर्मचारी प्रमोद गाडेकर, अण्णासाहेब दातीर शहर पोलीस ठाण्याचे वाहनचालक अजय आठरे, अमृत आढाव, सुभाष बोडखे होमगार्ड थोरात यांचे पथक हिवरगाव पावसा येथे जात असताना दोन वाजण्याच्या सुमारास नाशिक पुणे महामार्गावर संगमनेर खुर्द गावच्या शिवारात सूर्या बार पासून काही अंतरावर पाठीमागून विना क्रमांकाची एक स्विफ्ट कार संशयास्पदरित्या उभी होती. पथकातील कर्मचारी कारजवळ जात असताना कार बाहेर उभा असलेला एक जण पोलिसांना पाहून जवळच्या शेतात पळून गेला. त्यामुळे पोलीस पथकाने स्विफ्ट कारची तपासणी सुरू केली असता त्यामध्ये चौघेजण संशयास्पद स्थितीत बसलेले असल्याचे त्यांना आढळून आले.

पथकाने त्यांना बाहेर येण्यास सांगितले असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला त्यामुळे पथकाने त्यांना लगेचच पकडले. पकडलेल्या चौघांकडे पथकाने चौकशी केली असता त्यांनी उत्तरे दिल्याने पोलीस अधिकारी पटेल यांनी लगेचच पंचांच्या मदतीने गाडीची तपासणी केली असता या सर्वांची टोळी दरोडाच्या तयारीत असल्याचे निष्पन्न झाले.

पथकाने याप्रकरणी चारही आरोपींकडे आढळलेले मोबाईल ताब्यात घेतले. कारच्या तपासणीअंती पोलिसांना कुऱ्हाड, सत्तुर, चार करवती, कागदामध्ये बांधलेली मिरची पावडर, नायलॉन दोरी, लोखंडी गज, कानस असे दरोड्यासाठी आवश्यक असणारे साहित्य आढळून आले. तसेच आरोपींनी वापरलेली स्विफ्ट कार (एम.एच. 02 सी.डी. 8148) देखील पोलिसांनी जप्त केली आहे.

पोलिसांनी याप्रकरणी महेंद्र लक्ष्मण मधे (वय 25 रा. अभंग वस्ती, नारायणगाव, ता. जुन्नर, जि. पुणे), अविनाश चंद्रकांत जाधव वय 26 वर्ष, प्रवीण चंद्रकांत जाधव वय 24 वर्ष (दोघे रा. शिरोली (बोरी) डावखर मळा, ता. जुन्नर जि. पुणे आणि रोहन रामदास गिऱ्हे (वय 30 वर्ष हल्ली रा. खोडद, तालुका जुन्नर, जि. पुणे, मूळ रा. शिंदोडी ता. संगमनेर जि. अहमदनगर) या चौघांना अटक केली असून त्यांचा पाचवा साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाला. सोन्या (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) असे पाचव्या आरोपीचे नाव आरोपींनी सांगितले असल्याची माहिती मिळाली.

या संदर्भात पोलीस उपाधीक्षकांच्या पथकातील कर्मचारी प्रमोद गाडेकर यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सर्व आरोपीं विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर पोलीस या संदर्भात पुढील तपास करत आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 540
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026

वाळू तस्करांवर कारवाई, ट्रॅक्टरसह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक तर तिघे फरार

30/08/2026

स्थानिक गुन्हे शाखेकडून सराईत गुन्हेगाराला बेड्या

29/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar01/09/20260

आजचे राशिभविष्य  मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. नवीन कामाची सुरुवात…

आज सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

31/08/2026

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.