Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज शुक्रवार, ०४ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

04/09/2026

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संस्कृतच्या अभ्यासासाठी शब्दज्ञान अत्यावश्यक : डॉ. रवींद्र मुळे
शिक्षण

संस्कृतच्या अभ्यासासाठी शब्दज्ञान अत्यावश्यक : डॉ. रवींद्र मुळे

महाविद्यालय शाळा समूह योजना व श्री दामोदर मालपाणी मेमोरियल ट्रस्ट विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar13/03/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेरः
संस्कृत भाषेच्या अभ्यासासाठी शब्दकोष समृद्ध करून शब्दज्ञान अत्यावश्यक आहे.  असे प्रतिपादन डॉ. रवींद्र मुळे यांनी केले.

श्री दामोदर मालपाणी मेमोरिअल ट्रस्ट, संस्कृत संवर्धन मंडळ व महाविद्यालय शाळा समूह योजना संगमनेर केंद्र व संगमनेर महविद्यालयातील संस्कृत भाषा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने संस्कृत विविध गुणदर्शन मराठी, इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर दामोदर मालपाणी मेमोरिअल ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त व शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी, श्रीमती सुवर्णा मालपाणी, प्राचार्य डॉ. प्रो. डॉ. अरुण गायकवाड, प्राचार्य मुकुंद डांगे, प्रा. अरुण लेले, संस्कृत विभाग प्रमुख डॉ. अनिरुद्ध मंडलिक, स्पर्धा समन्वय अधिकारी डॉ. रोशन भगत आदी उपस्थित होते.

डॉ. मुळे म्हणाले, वर्णोच्चारण स्थानाचे ज्ञान, आवाजातील चढ-उतार, शब्दस्वरूप या गोष्टी आत्मसात करणे गरजेचे आहे. संस्कृत भाषेच्या अभ्यासासाठी शब्दज्ञान, शब्दसंग्रह, शब्दांचे प्रभावी उच्चारण अत्यावश्यक आहे.

डॉ.संजय मालपाणी यांनी आपल्या भाषणात प्रमुख अतिथींचा गौरव करत स्पर्धांच्या परंपरेची माहिती दिली. तसेच महाविद्यालय शाळा समूह योजनेच्या केंद्राद्वारे संस्कृत, मराठी व इंग्रजी विषयांच्या कथाकथन, वक्तृत्व स्पर्धा प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावर घेणारे संगमनेर महाविद्यालय हे एकमेव महाविद्यालय आहे. कथा सादर करताना श्वासावर योग्य नियंत्रण असणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रतिदिन आेंकार उच्चारण करावे. याबाबत त्यांनी सोदाहरण प्रतिपादन केले.

प्रास्ताविक करताना महाविद्यालय शाळा-समूह योजनेचे केंद्राध्यक्ष प्राचार्य प्रो. डॉ. अरुण गायकवाड म्हणाले की, महाविद्यालय, शाळा समूह योजने अंतर्गत होणाऱ्या संस्कृत, मराठी व इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा सुरळीत सुरू राहण्यामध्ये श्री दामोदर मालपाणी मेमोरियल ट्रस्ट व ट्रस्टचे विश्वस्त डॉ. संजय मालपाणी यांचा मोलाचा वाटा आहे.

अतिथींचा परिचय व स्वागत कु. अनुजा मुलंची यांनी केले. पारितोषिक निवेदन प्रा. सुरेखा भवर, प्रा. योगीता पाटील यांनी केले. सूत्रसचांलन कु. मधुरा भंडारी यांनी केले तर आभार कु. वैष्णवी भागवत यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संगमनेर महाविद्यालयातील संस्कृत विभागातील प्रा. डॉ. शशिकांत बांगर, प्रा. विजय भोर, तसेच श्रीमती ललितादेवी मालपाणी शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर सहकारी आणि दामोदर मेमोरिअल ट्रस्टचे सर्व सहकारी, राधेश्याम राठी व त्यांचे सहकारी यांनी परिश्रम घेतले. तसेच कु. वैष्णवी मैड, कु. प्रियंका रहाणे, कु.काजल काळे, कु. क्रांती एखंडे, कु. ऋतुजा मुळे या विद्यार्थिनींनी सक्रीय सहभाग घेतला.

गेल्या ४२ वर्षापासून मराठी, ३५ वर्षापासून संस्कृत व १६ वर्षापासून इंग्रजी स्पर्धांचे आयोजन केले जाते. दि. २२ जानेवारी २०२३ व २९ जानेवारी २०२३ अशा दोन टप्प्यात श्रीमती ललितादेवी मालपाणी शिक्षणशास्त्र महाविद्यालयात सदर स्पर्धा पार पडल्या. एकूण ७१ शाळांमधून १५०५ विद्यार्थ्यांनी स्पर्धांमध्ये यशस्वी सहभाग नोंदविला. पारितोषिक स्वरूपात एकूण दोन लाख रूपये किमतीच्या पुस्तकांचे वाटप विद्यार्थ्यांना केले गेले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 348
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अमृतवाहिनी विद्यापीठाचे नाव गुणवत्तेमुळे देशात मोठे राहील: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

18/08/2026

यू डायस अहवाल: राज्यातील हजारो शाळा पायाभूत सुविधांअभावी अंधारात, डिजिटल शिक्षणाचा दावा ठरतोय फोल

17/07/2026

मंदिरांप्रमाणेच ‘ज्ञानमंदिरांना’ दान द्या, तरच सामर्थ्यशाली देश उभा राहील: डॉ. दत्तात्रय आहेर

16/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज शुक्रवार, ०४ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar04/09/20260

आजचे राशिभविष्य: मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जादायी आणि उत्साहवर्धक राहील. प्रलंबित कामे पूर्ण…

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.